Tuesday 15 November 2016

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 5 डिसेंबरपासून नागपूरमध्ये 

मुंबई, दि. 15 : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 5 डिसेंबर ते
17 डिसेंबर 2016 या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनात
विधानसभेतील प्रलंबित दोन विधेयके व विधान परिषदेतील सहा प्रलंबित
विधयेकांवर चर्चा होणार असून चार नवीन आणि 11 प्रख्यापित अध्यादेशांवर
चर्चा होणार आहे.
विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर
यांच्या अध्यक्षतेखाली तर विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक
विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळात झाली.
यावेळी विधानसभेतील बैठकीस विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, शालेय
शिक्षण मंत्री विनोद तावडे, संसदीय कार्य मंत्री विजय शिवतारे,
विधानसभेतील आमदार अजित पवार, जयंत पाटील,  गणपतराव देशमुख, राज पुरोहित,
सुनिल प्रभू यांच्यासह विधान परिषदेच्या बैठकीस उपसभापती माणिकराव ठाकरे,
परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,
परिवहन मंत्री दिवाकर रावते, आमदार नारायण राणे, निलम गोऱ्हे, जयंत
पाटील, हेमंत टकले, शरद रणपिसे, सतीश चव्हाण, संजय दत्त यांच्यासह वित्त
विभागाचे प्रधान सचिव डी.के. जैन, संसदीय कार्य विभागाचे प्रधान सचिव पी.
एच. माळी, विधीमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सचिव यु.के. चव्हाण
आदी उपस्थित होते.
   या बैठकीत विधीमंडळाचे अधिवेशन दोन आठवड्याचे ठेवण्याचे ठरविण्यात
आले. पाच डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत विविध विधेयके, शासकीय
कामकाजावर चर्चा होणार आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील
यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त विशेष चर्चासत्र होणार आहे, अशी माहिती
संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांनी आज दिली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...