
आरमोरी मार्गावर श्री.राजूरकर यांच्या मालकीचे उमाकांत सॉ मिल आहे. सध्या श्री.कोल्हे हे या सॉ मिलचे काम बघतात. आज मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास मशिन असलेल्या ठिकाणी आग लागली. त्यानंतर शेजारीच वास्तव्य करीत असलेल्या श्री.राजूरकर यांच्या घराचा वीजपुरवठा बंद झाला. त्यांनी बाहेर येऊन बघताच आरामशिनला आग लागल्याचे दिसले. पाहता-पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. काही क्षणातच नगर परिषदेचे अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु आरामशिन व सागवान लाकडे जळून खाक झाली. यामुळे सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले. आग लागलेल्या ठिकाणाशेजारीच क्रेन व कार ठेवलेली होती. मात्र दोन्ही वाहनांची क्षती झाली नाही.
No comments:
Post a Comment