Friday 18 November 2016

विधान परिषद निवडणूक : उद्या मतदान


गोंदिया,18 : विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया मतदार संघात उद्या 19 तारखेला मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी भंडारा-गोंदियातील चारही मतदान केंद्र वेबकास्टद्वारे जोडले जाणार आहे. हे मतदान नागरिकांना भंडारा व गोंदिया जिल्हयाच्या www.bhandara.gov.inwww.gondia.gov.in या संकेतस्थळावर लाईव्ह उपलब्ध होतील.   
भंडारा व गोंदिया जिल्हयाच्या www.bhandara.gov.inwww.gondia.gov.in या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया यु ट्युबवर लाईव्ह पाहता येणार आहे. जिल्हयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर होमपेजच्या उजव्या बाजूला चालू घडामोडी असा मथळा असलेली चौकट आहे. त्या चौकटीत MLC ELECTION 2016 LIVE WEB ही लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यास भंडारा व गोंदिया जिल्हयातील विधान परिषद निवडणूकीच्या चारही मतदान केंद्राची यादी दिसेल. ज्या मतदान केंद्राचे मतदान लाईव्ह पहायचे आहे. त्या मतदान केंद्रास क्लिक केल्यास मतदानाची थेट प्रक्रिया पहावयास मिळणार आहे. विधान परिषद निवडणूकीसाठी मतदानाचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याची जिल्हयात ही पहिलीच वेळ आहे.
या निवडणुकीसाठी भंडारा जिल्हयात उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारा, मंडळ अधिकारी उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली, गोंदिया जिल्हयात तहसिल कार्यालय सडक अर्जुनी  रुम क्र. 8 व जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया असे 4 मतदान केंद्र  आहेत. भंडारा- गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी 19 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उपरोक्त मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येईल.
या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या 393 एवढी आहे. यात जिल्हा परिषद भंडारा 59, नगर परिषद भंडारा -35, नगर परिषद तुमसर-25, नगर परिषद पवनी-19, नगर पंचायत मोहाडी-19, नगर पंचायत लाखनी- 19, नगर पंचायत लाखांदूर-19 असे भंडारा जिल्हयातील 195 व गोंदिया जिल्हयातील- जिल्हा परिषद गोंदिया-59. नगर परिषद गोंदिया -44, नगर परिषद तिरोडा-19, नगर पंचायत गोरेगांव -19, नगर पंचायत सडकअर्जुनी -19,नगर पंचायत देवरी-19 व नगर पंचायत अर्जुनी/मोर-  19 असे एकूण 198 स्थानिक प्राधिकारी संस्थेचे सदस्य मतदार आहेत.
            मतमोजणी 22 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 8 वाजतापासून करण्यात येईल. मतपेटया ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे स्ट्राँगरुम निश्चित करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...