Wednesday 16 November 2016

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मात्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

नवीदिल्ली - केंद्र सरकारने ५०० व हजार रूपयांच्या नोटांवर अचानक टाकलेल्या बंदीमुळे देशात सध्या ‘चलन’कल्लोळ निर्माण झाला आहे. त्यामुळे देशातील सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कायम टीका करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मात्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे कौतुक करत नोटबंदीचा मी समर्थक असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींच्या हिमतीला मी दाद देतो. या निर्णयामुळे बनावट नोटा आपोआप नष्ट होतील. आता बेनामी संपत्तीवरही केंद्राने त्वरीत कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. विशेष म्हणजे यापूर्वीही नितीशकुमार यांनी पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर रोजी रात्री ५०० व हजार रूपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आल्याचे जाहीर केले होते. या नोटबंदीमुळे देशातील काळा पैसा बंद होईल व बनावट नोटा तयार करणारे देशद्रोही नेस्तनाबूत होतील असे म्हटले होते. नोटबंदीचा देशातील आर्थिक व्यवहारावर मात्र सध्या विपरीत परिणाम झाला आहे. नागरिकांना पैसे काढण्यास अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचा सहकारी पक्ष शिवसेनासह इतर विरोधी पक्षांनी सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...