Thursday, 17 November 2016

देवरी येथे बिरसामुंडा जयंतीचे आयोजन

देवरी- येत्या रविवारी (ता.20) स्थानिक क्रांतिवीर बिरसा शक्ती मैदानावर बिरसामुंडा जयंती निमित्ताने आदिवासी विराट जनसंसदेचे आय़ोजन करण्यात आले आहे.
या संसदेचे उद्घाटन माजी आमदार रामरतन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आमदार संजय पुराम  यांचे हस्ते होणार आहे. यावेळी गुजरातचे माजी खासदार अमरसिंगभाई चौधरी, झारखंडचे माजी आमदार नेमील तिर्की, ओरिसाचे लेथा तिर्की, अशोकभाई चौधरी,निकलेश बारला, इंजि. मुकेश बिरुआ, टी टी वरखडे, हिरालाल भोई, अशोक मसराम, भावना पवार, प्रा. प्रकाश कुंभरे,, प्रा.मनोज मडावी, हेमराज राऊत,एस टी मानकर, माधव गावळ,कविता उइकेआदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या जनसंसदेला  आदिवासी समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व समाजसंघटनांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...