Saturday 12 November 2016

नव्या नोटांना लाचखोरीची बाधा, लाचखोर अधिकारी अटकेत

कोल्हापूर,दि.12 : जुन्या नोटा बाद केल्याने काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल असे वाटत असतानाच कोल्हापुरात या नव्या नोटांनी लाच दिल्याची बातमी पुढे आली. 2 हजाराचा 17 असे 35 हजाराची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेचा वरिष्ठ सहाय्यक लाचखोर अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला.
35 हजारांची लाच स्वीकारताना जिल्हापरिषदेच्या माध्यमिक विभागातील वरिष्ठ सहाय्यक चंद्रकांत एकनाथ सावर्डेकर याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
शाळेतील मुख्याध्यापकाच्या नेमणूक पत्र देण्यासाठी एकनाथ सावर्डेकर याने 35 हजारांची लाच स्वीकारली. लाचेच्या रक्कमेत नव्या 2 हजाराच्या 17 नोटांचा समावेश होता. नव्या नोटांचा लाचखोरीचा राज्यात हा पहिला बळी ठरलाय. विशेष म्हणजे अजूनही बँकेत 2 हजाराच्या नोटा देण्याचं सुरू आहे. नव्या नोटांची नवलाई अजून संपत नाही तीच लाचखोरीची बाधा झाली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...