राजकोट - Ksoti पदार्पण Krnarhya Rajkotcya Madanavar Ajpasun (बुधवार) भारत आणि इंग्लंड क्रिकेट Yancyatil Ksoti तोंड पहिल्या पाच Samnyancya सुरू Maliketla Jhala Acuna, Inglndcha कर्णधार Alistr Kukne Nanefek Jinkun Flndaji Getla Krnyacha निर्णय.
भारताने या सामन्यासाठी भारताने हार्दिक पंड्या किंवा करुण नायर या दोघांनाही अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान दिलेले नाही. इंग्लंडने आपल्या संघात सलामीवीर हसीब हमीद याला स्थान दिले आहे. सलग दोन मालिका जिंकून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताला या मालिकेत हे अव्वल स्थान कायम ठेवण्याचेही आव्हान असणार आहे. त्याचबरोबर चार वर्षांपूर्वी मायदेशात गमावलेल्या कसोटी मालिकेतील अपयशाचीही परतफेड विराट कोहलीच्या संघाला करावी लागणार आहे. या मालिकेद्वारे भारतात प्रथमच डीआरएस प्रणालीचा वापर होणार आहे. त्यामुळे त्याचीही उत्सुकता आहे.
No comments:
Post a Comment