Wednesday, 16 November 2016

दंतेवाड्यात सहा नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगड, दि. 16 - छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा दलाच्या जवानांनी चकमकीत सहा नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यात तीन महिलांचा समावेश आहे.  
मिळालेल्या माहितीनुसार, दंतेवाडा जिल्ह्यातील गोंडापल्ली गावाजवळ सुरक्षा रक्षकांच्या सयुंक्त दलाने केलेल्या नक्षलवादविरोधी कारवाईत सहा नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यात तीन महिलांचा समावेश असल्याचे बस्तर रेंजचे  पोलीस महानिरीक्षक एसआरपी काल्लुरी यांनी सांगितले. 
या भागात नक्षलवादविरोधी ऑपरेशन काल रात्रीपासून सुरु करण्यात आले होते. यामध्ये स्पेशल टास्क फोर्स, सीआरपीएफ आणि जिल्हा राखीव पोलीस दल यांचा संयुक्तरित्या समावेश होता, असेही एसआरपी काल्लुरी यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...