Wednesday, 16 November 2016

'बिभीषण'कार मुकेश रावल यांचा रेल्वे ट्रॅकवर सापडला मृतदेह

मुंबई, दि. 16 - रामानंद सागर दिग्दर्शित रामायण या मालिकेत बिभिषणाची भूमिका साकारणारे मुकेश रावल यांचा मृतदेह सापडला आहे. रावल यांचा मृतदेह कांदिवलीतल्या रेल्वे ट्रॅकवर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कांदिवली रेल्वे स्टेशनजवळच असलेल्या रेल्वे रुळाच्या बाजूला काल सकाळी साडेनऊच्या सुमारास रावल यांचा मृतदेह स्थानिकांच्या निदर्शनास आला. मृतदेहाच्या अवस्थेवरून रावल यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मुकेश रावल हे बँकेतून पैसे काढण्यासाठी घाटकोपरला गेले होते, मात्र ते घरी परतलेच नाहीत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. अखेर शोधाशोध केली असता मुकेश रावल यांच्या मृत्यू झाल्याची बातमी समजल्याचं कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
मुकेश रावल हे काल घरातून बाहेर गेले, ते परतलेच नाहीत. त्यामुळे चौकशीसाठी कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली, त्यावेळी फोटो दाखवून पोलिसांनी याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...