Monday 14 November 2016

पवारांनीच राजकारणात मला बोट धरुन चालायला शिकवलं: मोदी

पुणे: ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा आदर करणाऱ्यांच्या यादीत मीही एक असून, त्यांनीच मला राजकारणात बोट धरून चालायला शिकवली.’ अशी बोलकी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. पुण्यात शुगरकेन व्हॅल्यू चेन व्हिजन या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनासाठी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी मोदीं आणि पवारांनी एकमेकांवर अक्षरश: स्तुतीसुमनं उधळली.
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर स्तुतीसुमनं उधळली. यावेळी मोदी म्हणाले की, “मी वैयक्तिक जीवनात शरद पवारांचा आदर करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे. शरद पवार म्हणजे सार्वजनिक जीवनातील एक सर्वसंपन्न व्यक्तिमत्व आहेत. मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो त्यावेळी मला अगदी बोट धरुन समजावून सांगण्याचीही जबाबदारी शरद पवारांनी पार पाडली. ही गोष्ट सार्वजनिकरित्या स्वीकारण्यात मला अभिमानच वाटतो.”मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट येथे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी मोदींवर देखील कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, “पंतप्रधान मोदी काल जपानमध्ये होते. आज सकाळी ते गोव्यात होते. दुपारी ते बेळगावमध्ये होते आणि आता ते पुण्यात आहेत. मला माहित नाहीत ह्या कार्यक्रमानंतर ते कुठे जाणार आहेत. पण ह्यावरुन आपल्याला दिसतं की, ते देशासाठी पूर्णपणे समर्पित आणि आपल्या शब्दाला कटीबद्ध आहेत.” असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या उर्जेची आणि उत्साहाची तोंडभरुन स्तुती केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...