Sunday, 20 November 2016

जैनकलार समाजाची सभा उत्साहात

 गोंदिया-  जैन कलार समाज जिल्हा गोंदियाच्या कार्यकारिणी ची सभा आज पिंडकेपार रोड स्थित समाज भवानात उत्साहात पार पडली.

 सभेच्या अध्यक्षस्थानी  तेजरामजी मोरघडे अध्यक्ष हे होते. यावेळी समाजातील युवक, महिला, सल्लागार व मुख्य कार्यकारी मंडळाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.  समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक विषयांवर चर्चा  करण्यात आली.  यामध्ये  समाजाचे सर्वेक्षण पत्रक भरण्याविषयी सुद्धा चर्चा करण्यात आली. ज्यांचे पत्रक अपूर्ण आहे त्यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे, आजीवन सदस्य बनण्यासाठी  25 डिसेंबर पर्यत मुदतवाढ करण्यात आली. आजीवन सदस्यांना मताधिकाराचा अधिकार राहील , म्हणून समाजाच्या प्रत्येक सभासदांना आजीवन सदस्यत्व घेण्यास प्रवृत करावे, असे ही ठरविण्यात आले. गोंदिया शहराव्यतिरिक्त इतर गावातील समाज बांधवांची माहिती कुटूंबपत्रकात भरून समाजाला सहकार्य करणे. समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहचविण्या करिता फोन, वाट्सअॅप, मेसेज किंवा व्यक्तिश: भेटून संदेश पोहचविणे.  विवाह योग्य मुला मुलींनी विवाह नोंदणी फार्म  भरून देणे.  नोंदणी फी  100/- रू.  राहील. परिचय संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी युद्ध स्तरावर काम सुरू आहे त्याकरिता  समाजाच्या सर्व सभासदांनी सहकार्य करण्याचे आवाहन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...