Friday 18 November 2016

दोन हजारांच्या नोटची छपाई करणारे अटकेत

अमृतसर(वृत्तसंस्था)- पंजाबमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटची बनावट छपाई करणाऱया एकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिखिविंद या गावात कॉम्युटर ऑपरेटर असलेले संदीप कुमार व हरजिंदर सिंग या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांचे गावात छोटेशे दुकान आहे. दुकानात असलेला संगणक, स्कॅनर व प्रिंटरच्या माध्यमातून दोघे दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई करत होते. याबाबतची माहती समजल्यानंतर दुकानावर छापा टाकण्यात आला. यावेळी दोन हजार रुपयांच्या पाच बनावट नोटा व इतर साहित्य जप्य करण्यात आले आहे.

संदीप व हरजिंदर यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांनी बनावट नोटांच्या माध्यमातून कोणाची फसवणूक केली आहे का, याबाबत पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक गुरदीप सिंग यांनी दिली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...