Wednesday, 9 November 2016

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष!!

वृत्तसंस्था
न्यूयॉर्क - अमेरिकेच्या बहुचर्चित अध्यक्षीय निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांचा पराभव करुन ऐतिहासिक व धक्कादायक विजयाची नोंद केल्याचे आज (बुधवार) स्पष्ट झाले.

ओहिओ, नॉर्थ कॅरोलिना आणि फ्लोरिडा या राजकीय दृष्टया अत्यंत संवेदनशील राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षास मिळालेल्या नेत्रदीपक विजयांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे नेतृत्व ट्रम्प यांच्याकडेच येणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. ट्रम्प यांचा हा विजय हिलरी समर्थकांसाठी अत्यंत धक्कादायक मानला जात आहे.

मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर हिलरी याच "फेव्हरिट‘ मानल्या जात होत्या. मात्र मतमोजणी पुढेपुढे सरकु लागल्यानंतर ट्रम्प यांच्याकडे विजय झुकू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रम्प हे आता अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष होणार आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेतील "इलेक्‍टोरल कॉलेज‘व्यवस्थेनुसार 27 राज्यांमधील 276 मते जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले. ट्रम्प यांच्या तुलनेमध्ये हिलरी यांना केवळ 218 मतेच मिळविण्यात आल्याने डेमोक्रॅट समर्थकांचा मोठाच अपेक्षाभंग झाला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...