Sunday, 6 November 2016

छत्तीसगड मधील वाघनदीच्या ठाणेदाराची नक्षल्यानी केली हत्या

देवरी, (6)- लगतच्या छत्तीसगड राज्यातील वाघनदी पोलिस ठाण्याच्या एका पोलिस उपनिरीक्षकाची नक्षल्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना आज (ता.6) राष्ट्रीय महामार्गावर घडली.
मृत पोलिस अधिकाऱ्याचे नाव नारदसिंग बोगा (वय 45 ) असे आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड मधील वाघनदी पोलिसस्टेशन चे पोलिस पथक राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर चिरचारी नजीक झालेल्या वाहन अपघाच्या तपास कामी गेले होते. या पथकात पोलिस उपनिरीक्षक बोगा यांचेसमवेत एक उपनिरीक्षक आणि दोन अन्य पोलिस जवान गेले होते. घटनास्थळावर तपास कार्य करत असताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नक्षल्यांनी बोगा यांचेवर दोन राऊंड गोळीवार केल्याचे सांगण्यात येते. पोलिस पथकातील अन्य कर्मचारी मात्र सुखरुप असल्याचे कळते. पोलिस उपनिरीक्षक बोगा यांचा घटनास्थळावर मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र व छत्तीसगडच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून नक्षल्यांची शोध मोहीम हाती घेतल्याचे कळते. तपशील मिळू शकला नाही. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...