अमरावती,(ता.6) - संविधानाने देऊ केलेले अधिकार अद्यापही ओबीसींना मिळालेले नाही. परिणामी, ओबीसींची प्रगती खुंटलेली आहे. आज प्रत्येक राजकीय पक्ष हा ओबीसींना आपली मक्तेदारी समजत आला आहे. ओबीसींचे हक्क प्रस्थापित लाटत आले आहेत. परिणामी, आज ओबीसी समाज खडबडून जागा होत आहे. ओबीसी आपल्या हक्कासाठी एकवटत असल्याचे पाहून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यामुळे ते ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा फुट पाडू पाहत आहेत. ओबीसी जनतेने आता त्यांच्या फुटीच्या राजकारणाला बळी पडण्याचे कारण नाही. येत्या 8 डिसेंबरला महामोर्च्याच्या माध्यमातून ओबीसींची शक्ती राज्यकर्त्यांना दाखवून द्यायची आहे. युवा स्वाभिमान संघटना यासाठी नेहमी अग्रस्थानी राहील, असे प्रतिपादन आमदार रवी राणा यांनी आज अमरावती येथे बोलताना केले.
स्थानिक बडनेरा रोड वरील नवाथे चौकातील जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रात आयोजित ओबीसी कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक बबनराव तायवाडे, राजकीय पक्ष समन्वयक डॉ. खुशालचंद्र बोपचे, माजी आमदार पांडुरंग ढोले, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, सचिन राजुरकर, मनोज चव्हाण,संजय कन्नाके, खेमेंद्र कटरे, नगरसेवक विजयराव नागपुरे, अरूण ढोबे, विजय कातरे, डी डी पटले आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment