Friday 11 November 2016

सहायक पोलिस निरीक्षकाची आदिवासी इसमास बेदम मारहाण

गडचिरोली,दि.११:धानोरा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरेगाव(रांगी) येथील एका आदिवासी इसमास बेदम मारहाण केल्याने पीडित इसमाने मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दुधराम उद्धव किरंगे असे पीडित इसमाचे नाव आहे.
दुधराम किरंगे यांनी त्यांना झालेल्या मारहाणीबाबत धानोरा येथील पोलिस निरीक्षकांना लेखी तक्रार केली आहे. त्यात किरंगे यांनी म्हटले आहे ७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास धानोरा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक श्री.मुंडे व त्यांचे सहकारी कोरेगाव येथे आले. त्यांनी पोलिस कर्मचारी श्री.घुटके तुम्हाला बोलावत आहेत, असे माझ्या वडिलांना सांगितले. यावेळी माझ्या वृद्ध वडिलांना कशाला बोलावता, असे मी विचारताच तिघांपैकी एका पोलिस कर्मचाऱ्याने भर चौकात मला मारहाण केली. यावेळी दुधरामकडे दारु असेल, असे म्हणून जोडे घालूनच घराची तपासणी केली. मात्र तेथे कुठलीही दारु आढळली नाही. त्यानंतरही त्यांनी मला बेदम मारहाण केली. माझे डोके भिंतीला आदळून भिंतीवर टांगलेला फोटो डोक्यावर आदळला. फोटोचे काच लागल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच दिवशी मी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केला असून, दुखापतीमुळे माझ्या आरोग्यास धोका आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकाराची चौकशी करुन संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दुधराम किरंगे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...