Thursday 17 November 2016

जिल्हा बॅँकांना जुन्या नोटा स्वीकारु द्या !

मुंबई : जिल्हा मध्यवर्ती बँका आणि पतसंस्थांमध्ये जुन्या पाचशे-हजाराच्या नोटा स्वीकारण्यास घातलेली बंदी मागे घेण्यात यावी व तिथे शेतक-यांकडून जुन्या नोटा स्वीकाराव्यात, अशी मागणी मंत्रीमंडळ उपसमितीने रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली होती. काल सायंकाळी या समितीची बैठक मंत्रालयात झाली आणि त्यानंतर वित्त मंत्र्यांनी रात्री रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
जिल्हा बँकांवर कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे किंवा नेत्याचे वर्चस्व असते. त्यामुळे या बँकांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा होऊ नये म्हणून ही बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जाते. तथापि, या बँकांमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पैसा आहे. नोटाबंदीमुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा बँकांमध्ये जुन्या नोटा स्वीकारण्याची अनुमती द्यावी, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी मांडली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...