Wednesday, 2 November 2016

रोड रोमिओने केला चाकूहल्ला

नागपूर,दि.02-मुलीकडे एकटक बघणाऱ्याला हटकल्यामुळे आरोपींनी तिघांवर चाकुने वार केल्याची घटना सिताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत तेलीपुरा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून १ आरोपी फरार आहे.
निखिल हरिष नागा (वय २१), अजय शिवनाथ विश्वकर्मा (वय २२) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर संतोष मनोज पटेल (वय ३२), रजत बाबुराव उंभारे (वय २५) व प्रशांत चोखुराम तोंडंरे (वय ३४) अशी जखमींची नावे आहेत.
शिला संतोष पटेल (वय २९) या त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांसह घरासमोर बोलत उभ्या होत्या. या दरम्यान १ आरोपी रस्त्याने जात असताना शिला पटेल यांच्यासोबत सोबत उभ्या असलेल्या एका मुलीकडे एकटक बघत होता. यामुळे शिला व त्यांच्या नातेवाईकांनी आरोपीला हटकले असता आरोपीने पळ काढला. मात्र, परत मित्रांसोबत पटेल यांच्या घरासमोर येऊन आरोपींनी संतोष, मनोज तसेच त्यांचा एक मित्र प्रशांत यांच्यावर चाकू हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले.आरोपी हे सिताबर्डी परिसरातील जयसन लॉज येथे थांबले होते. शहरात मिटींगकरिता आल्याचे त्यांनी लॉजच्या रजिस्टरमध्ये नोंद केली आहे. अटकेतील आरोपीने एका प्रायव्हेट कंपनीत कामाला असल्याची माहिती दिली आहे. मात्र, आरोपी चाकू घेऊन लॉजवर कसे थांबले, त्यांचा शहरात येण्याचा उद्देश काय, असे अनेक प्रश्न सध्या पोलिसांसमोर उपस्थित झाले आहेत, तरी सीताबर्डी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...