Wednesday, 2 November 2016

टायर फुटल्याने चारचाकीचा भीषण अपघात

नागपूर,दि02-नागपूर-चंद्रपूर  राज्यमहामार्गावर जाम गावानजीक एका इनोव्हा गाडीचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाला. ही गाडी छत्तीसगड राज्यातून हैद्राबादला जात होती. १२० ते १३० च्या वेगाने गाडी चालत असतांना अचानक गाडीचा टायर फुटल्यामुळे चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि गाडी सहा वेळा पलटी मारून रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसून गाडीतील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या गाडीत चार वर्षाचा लहान मुलगा ही होता तोही  किरकोळ जखमी झाला. पोलीस आणि अॅम्ब्युलन्स तातडीने घटनास्थळी पोहोचल्यामुळे जखमींना लवकरात लवकर उपचार मिळू शकले. टायर फुटल्याने होणाऱ्या अपघातामध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहकांच्या मनात बरेचशे प्रश्न निर्माण होत आहे. तसेच असे अपघात टाळण्यासाठी वाहनांच्या मेंटेनन्सकडे विशेष लक्ष देणे आवशक आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...