Thursday, 31 January 2019

नक्षल्यांकडून पेडीगुडमातील बांबू कटाई कामगारांना मारहाण

गडचिरोली,दि.31ः- – वनविकास महामंडळांतर्गत सुरू असलेल्या बांबू कटाई कामावरील कामगारांना नक्षल्यांनी मारहाण केल्याची घटना काल रात्री ११.३० वाजताच्या सुमारास पेडीगुडम येथील वनविकास महामंडळाच्या मार्कंडा डिव्हीजनमधील कंपार्टमेंट ८९,९०,९१ मध्ये घडली. यामध्ये दोन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.अरूण लक्ष्मण दसमरे (२६) रा. भिवापूर , बसंत धानसिंग वरखडे (४५) रा. जागुल जि. बालाघाट (मध्यप्रदेश) अशी गंभीर जखमी कामगारांची नावे आहेत.अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले.
अहेरी तालुक्यातील पेडीगुडम वनविकास महामंडळाच्या मार्कंडा डिव्हीजन मधील कंपार्टमेंट ८९, ९०, ९१ मध्ये स्थानिक नागरिक आणि मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट येथील ६० ते ७० नागरिकांकडून बांबू कटाईचे काम सुरू आहे. काल रात्री ११.३० वाजताच्या सुमारास बांबू कटाईसाठी मुक्कामी असलेल्या कामगारांपैकी चार- पाच कामगारांना २० ते ३० च्या संख्येत तोंडाला रूमाल बांधून आलेल्या नक्षलवाद्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक, वनपाल घटनास्थळी पोचून जखमींना उपजिल्हा रूग्णालयात उपचाराकरीता दाखल केले.

नक्षलवाद्यांकडून पुन्हा जाळपोळ, घटनास्थळी नक्षली बॅनर




गडचिरोली,दि.31(अशोक दुर्गम)- कोरची तालुक्यातील जमगावमध्ये नक्षलवाद्यांनी 2 जेसीबी आणि 4 ट्रॅक्टर जाळल्याची घटना आज घडली. उत्तर गडचिरोली डिवीजनल कमिटी या नक्षवादी संघटनेने सरकारच्या दमनविरोधी भूमिकेचा निषेध करण्यासाठी  झाडे तोडून रस्ता अडवण्यात आला आहे.ट्रकला पेटविल्यानंतर नक्षली बॅनर बांधले आहे.नक्षल्यांनी पुकारलेल्या बंद दरम्यान आठवडभरात  ५ इसमाची नक्षल्यांनी हत्या केली.
रात्री २० ते २५ चा संख्येत असलेल्या नक्षल्यांनी कोरची घाटावरील पहिल्या वळणावर चंद्र्रपूर वरून रायपूरकडे जात असलेल्या ट्रकला थांबवत त्यातीलच डिझेल वाहनावर शिंपडत पेटवून दिले. तसेच ठिकठिकाणी झाडे तोडून व दगड रस्त्यावर मांडून वाहतूक बंद पाडली. आज सकाळी वर्तमानपत्रे घेऊन कोरचीकडे जाणारे वाहन पोहचू शकले नाही.

शालेय पोषण आहारात निघाला विषारी साप

हदग़ाव/गारगव्हाण ३१
नरेश तुप्तेवार
-हदगाव तालुक्यातील  येथीलघटना
-जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेतील घटना
-पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेने साप फेकला चुलीत
-विद्यार्थीच्याच सतर्कतेमुळे 160 विद्यार्थांचा जीव वाचला
-शाळा प्रशासन व स्वयंपाकी महिलेवर कारवाई करण्याची मागणी
-संतप्त पालकांचा शाळेवर असंतोष
-स्वयंपाकी महिला ही जिल्हा परिषद सदस्यांची कुटुंबातील सदस्य
मुख्याध्यापक व शिक्षक त्याकडे लक्ष देण्यास टाळाटाळ

हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत प्राथमिक शाळेला खिचडी पोषण आहार शिवजवून प्राथमिक विध्यार्थाना दुपारच्या सुट्टीत हा पोषण आहार दिल्या जातो. हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील जि प च्या प्राथमिक शाळेत बुधवार रोजी खिचडी शिजवण्यात आली त्या खिचडीत स्वयंपाकी लता कैलास सावतकर हिने काळजी पूर्वक खिचडी न केल्यामुळे तो साप तांदुळाच्या पोत्यात असावा त्या शाळेच्या स्वयंपाकी महिलेने तसेच पोते पातेल्यात टाकून पातेल्यावर झाकण ठेवले व खालून त्या पातेल्याला जाळ लावण्यात आला काही वेळाने शाळेला दुपारची सुट्टी झाली व सदरील किचन शेड मधून बाहेर आणून त्या स्वयंपाकी महिलेने विधार्थ्यास वाढण्यास सुरुवात केली शिजलेला हा  साप काही विध्यार्थ्यांच्या लक्षात आला  त्यांनी सदरील हि बाब स्वयंपाकी महिलेस सांगले त्यामुळे तिने मुलाला वाटप केलेली खिचडी वापस घेतली व ती सर्व खिचडी त्या महिलेने पुरावा नष्ट करण्यासाठी  फेकून दिली त्या खिचडीतील तो साप त्या महिलेने काढून पुरावा नष्ट करण्यासाठी चुली मध्ये टाकला हि बाब विध्यार्थाना लक्षात येताच विधार्थानी आपल्या नातेवाईकांना आरडा अरोडा करून सांगितले  ते नातेवाईक शाळेकडे आले आणि त्यांनी  पाणी टाकून तो साप विझवला त्यामुळे खिचडीतील तो साप अधर्वट जळालेला  मिळाला त्यामुळे महिलेच्याकृत्या बद्दल गावात असंतोष निर्माण झाला होता शाळेवर ३०० ते ४०० महिला व पुरुष जमले होते 
           गारगव्हाण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ ते ५ वि पर्यंत असून एकूण विधार्थी संख्या १६० आहेत त्या शाळेचे मुख्याधापक बडेराव सर असून मुख्याध्यापकांचे काम खिचडी शिजली कि नाही सकस आहे कि नाही यांची प्रत्यक्ष पाहणी करून व चव घेऊन विध्यार्थाना देण्यात येते तर यावेळेस शाळेचे मुख्याधापक कुठे होते ? त्यांनी या आहारावर का लक्ष दिले नाही ? 
          स्वयंपाकी महिला हि जिल्हा परिषद सदस्य यांच्या कुटूंबातील असल्यामुळे त्या कडे शिक्षक व कर्मचारी लक्ष देण्यास  टाळाटाळ करीत आहेत असे प्रत्यक्ष गावकऱ्यांचे म्हणणे आहे या अगोदर दोन ते तीन वेळेस अशाच प्रकारच्या घटना झाल्या  होता पण तो दबाव आणून तिथेच मिटवण्यात आला या प्रकरणाचा योग्य तो ती चौकशी करून करावी अशा आशयाचे गावकऱ्यांच्या वतीने निवेदन हदगाव तहसील ला देण्यात आले आहे त्या निवेदनावर १०० ते १२५ पालकांनी सह्या केल्या.

सूडभावनेतून मला क्रीडा संमेलनापासून रोखले-संगीता भेलावे



प्रस्ताव दाखल करणार

देवरी,दि.31- देवरी तालुक्यातील सावली येथे शिक्षण विभागाने स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा सत्राचे आयोजन केले. या आयोजनासाठी जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिला. यासाठी सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. असे असताना मी स्थानिक पदाधिकारी असून सुद्धा राजकीय सूड भावनेतून मला पत्रिका न देता मला संमेलनात येण्यापासून रोखले. यामागे स्व.खे. मंडळाचे राजकारण जबाबदार असून मी विषयी पंचायत समितीच्या सभेत प्रस्ताव दाखल करून न्याय मागणार आहे, असा आरोप देवरी पंचायत समितीच्या माजी उपसभापती आणि पुराडा पंचायत समिती गटाच्या सदस्य संगीता भेलावे यांनी केला आहे.
सविस्तर असे की, देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सावली येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने चार दिवसीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा संमेलनासाठी जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिला. यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी सुद्धा पाठपुरावा केला. असे असताना स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र. देवरी पंचायत समितीच्या माजी उपसभापती भेलावे यांनी आयोजकांनी पत्रिका दिली नाही. त्यामुळे त्या कमालीच्या संतप्त झालेल्या आहेत. स्थानिक पदाधिकारी असून सुद्धा त्यांना पत्रिका पदाधिकाऱ्यांनी दिली नाही, असे त्यांनी बेरारटाईम्सला सांगितले. दरम्यान, स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे पदाधिकारी सुद्धा राजकारणी बनले असल्याची टीका सुद्धा त्यांन केली आहे. परिणामी, काही राजकारणी मंडळीच्या इशाऱ्यावरून त्यांनी या संमेलनापासून जाणीवपूर्वक रोखण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या अनेक आयोजनात स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचा भोंगळकारभार समोर आला आहे. त्यामुळे माजी उपसभापती यांच्या आरोपाला वजन प्राप्त झाले आहे. दरम्यान, या अपमानासंबंधी त्यांनी सभेत प्रस्ताव दाखल करून न्यायाची मागणी करण्यार असल्याचेही म्हटले आहे.
निमंत्रण द्यायला पाहिजे होते- मनोज हिरुडकर, गटविकास अधिकारी
याविषयी देवरीचे गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर यांना विचारणा केली असता त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना कोणत्याही कार्यक्रमात आमंत्रित करण्याची परंपरा आहे. स्व. खे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा श्रीमती भेलावे यांना आमंत्रित करायला पाहिजे होते. नेमकी ही चुक कोणी केली, हे सांगता येणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Wednesday, 30 January 2019

चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून मागितली ३ हजारांची लाच; पोलीस शिपाई एसीबीच्या सापळ्यात

गोंदिया दि. 30:संशयावरून मजुराला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणाऱया पोलीस शिपायाला अटक करण्यात आली. गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. भुमेश्वर देविलाल येरणे असे लाचखोर पोलिसाचे नाव आहे. 
गावात मोलमजूरी करुन आयुष्य जगणारे तक्रारदार हे मजूर आहेत. २ महिन्यापूर्वी मौजा दहेगावच्या शेतातून मोटारपंपाची चोरी झाली होती. या चोरीच्या गुन्ह्यात दहेगावच्या २ व्यक्तींना आमगावच्या पोलिसांनी अटक केली. चोरीच्या गुन्ह्यात चौकशी करण्यासाठी येरणे यांनी तक्रारदारास आमगाव पोलीस ठाण्यात नेऊन विचारपूस करुन सोडून दिले. त्यानंतर येरणे यांनी तक्रादाराच्या घरी येऊन तक्रारदारास चोरीच्या गुन्ह्यातून काढले, असे सांगून ३ हजार रुपयाची मागणी केली. पैसे न दिल्यास तक्रारदारास अटक करण्याची भीती त्यांनी दाखविली. तक्रारदारांनी येरणेंविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाकडे तक्रार नोंदविली. यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्याचे शिपाई यांच्याविरुद्ध सापळा रचला.
यात ३४ वर्षीय आरोपी भुमेश्वर देविलाल येरणे यांनी पदाचा दुरुपयोग करुन मोटारपंप चोरीच्या गुन्ह्यात तक्रारदारास अटक करण्याची भीती दाखवत लाचेची मागणी केली. नितीन ईश्वरदास तिरपुडे यांच्याकडून लाच स्वीकारली असे कबूल केले. दोन्ही आरोपींविरुद्ध आमगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सात वन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश




नागपूरदि.30 : मुरुम या गौण खनिजाच्या खाणीवर कारवाई करून खनिजासह ट्रक घेऊन गेलेल्या वन विभागाच्या सात अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर पोलिसांना दिले.
रॉयल पॉटरिज सेरॅमिक इंडस्ट्रीज कंपनीचे संचालक अब्दुल कादर हाजी अब्दुल शुभान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. झका हक यांनी हे आदेश दिले. याचिकाकर्त्यांनुसार, २००२ मध्ये जिवती तालुक्यातील मरकागोंडी येथील दोन भूखंडावर मुरुम उत्खननाचे कंत्राट त्यांनी खनिकर्म विभागाकडून घेतले. या उत्खननासाठी त्यांना खनिकर्म विभागाने ३० वर्षांचा भाडेपट्टा दिला होता. त्यानंतरही वनविभागाने  ही जमीन वनविभागाच्या अखत्यारित येत असल्याचा दावा केला. त्यावर दिवाणी न्यायालयाने ही  जमीन ही महसूल विभागांतर्गत असून वनविभागाचा त्या भूखंडावर कोणताही अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही २००९ मध्ये वनविभागाचे काही अधिकारी खाण परिसरात गेले व त्यांनी काम बंद पाडले. त्यावेळी कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.  ही जमीन महसूल विभागाच्या मालकीची असून अब्दुल शुभान यांच्याकडे उत्खननाचा भाडेपट्टा आहे. वनविभागाने कायमस्वरुपी त्या भूखंडाकडे दुर्लक्ष करावे आणि गौण खनिज उत्खननात हस्तक्षेप करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते. तेव्हापासून काम सुरूळीत सुरू असताना परीक्षेत्राच्या वनअधिकारी पूनम ब्राम्हणे, संजय राठोड, एस. जी. गरमाडे, प्रदीप मारपे, नरेंद्र देशकर, अंबादास राठोड आणि व्ही. एम. ठाकूर आणि इतर १० ते १२ जण ५ नोव्हेंबर २०१८ ला खाण परिसरात पोहोचले. त्यांनी पुन्हा जमिनीवर दावा करून खनिजांनी भरलेले चार ट्रक व पोकलेन मशीन जप्त करून सोबत नेली. त्याविरुद्ध याचिकाकर्त्यांनी जिवती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चंद्रपूरच्या अधीक्षकांनाही निवेदन दिले. पण कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केला. या प्रकरणात वन अधिकाऱ्यांनी गुन्हा केल्याचे दिसून येत असून त्यांच्याविरुद्ध शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊ शकत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.त्यानंतर याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने संबंधित अधिकारी न्यायालयाचे पूर्वीचे आदेश असतानाही अनधिकृत काम करायला गेले. त्यामुळे ते कोणतेही शासकीय काम करीत नव्हते, असे दिसून येते. या प्रकरणी शासनाच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नसून संबंधितांवर गुन्हा दाखल करून चौकशी करावी, असे आदेश जिवती पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले. 

हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यावर झाडल्या गोळ्या


Regrettably! Hindu Mahasabha activists shot at the statue of Mahatma Gandhi | संतापजनक! हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यावर झाडल्या गोळ्या
नवी दिल्ली,दि.30- आज 71 व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देशभरातून वाहण्यात आली. मात्र, हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी विकृतीचा कळस गाठत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तसेच या पुतळयाचे दहन केले. हा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशातील अलीगड येथे घडला. 
अलीगड येथे हिंदू महासभेने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी शौर्य दिवस साजरा केला. यावेळी हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय हिने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर पिस्तुलामधून गोळ्या झाडल्या. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच यावेळी नथुराम गोडसेच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण केला. तसेच मिठाई वाटण्यात आली. महात्मा नथुराम गोडसे अमर रहेच्या घोषणाही दिल्या गेल्या. 
''महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणणे योग्य नाही. जर मी नथुराम गोडसेच्या आधी जन्मले असते, तर मीच महात्मा गांधी यांची हत्या केली असती.'' असे संतापजनक वक्तव्यही पूजा  शकून पांडेय हिने केले. 
दरम्यान, या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच विविध विचारवंतांसह, सर्वसामान्यांकडून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  

लोकायुक्तांच्या कार्यकक्षेत आता मुख्यमंत्री




मुंबई,दि,30-ः राज्याच्या लोकायुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्रीपदाचा समावेश करण्यास मंगळवारला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासोबतच लोकायुक्त आणि उप लोकायुक्त यांच्या नेमणुकीत सर्व समावेशकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात लोकायुक्त आणि उप लोकायुक्त अधिनियम – १९७१ नुसार लोक आयुक्त आणि उप लोकायुक्त यांची निर्मिती करण्यात आली असून अशी पदे निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते. या अधिनियमाच्या तरतुदीनुसार लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय स्थापित झाले असून २५ ऑक्टोबर १९७२ पासून कार्यालयाच्या कामकाजास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाने किंवा शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या किंवा महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच शासनाच्या मालकीची किंवा नियंत्रणाखालील महामंडळे, कंपन्या यासारख्या काही प्राधिकारी संस्थातर्फे करण्यात आलेल्या प्रशासकीय कार्यवाही संबंधिच्या जनतेच्या गार्‍हाण्यांची आणि लाचलुचपत अभिकथनाच्या तक्रारींची चौकशी या अधिनियमाच्या तरतुदीनुसार लोक आयुक्त व उप लोकआयुक्त यांना करता येते. मात्र, त्यात मुख्यमंत्री या पदाचा समावेश नव्हता.
केंद्र शासनाचा लोकपाल आणि लोक आयुक्त अधिनियम २0१३ संमत करण्यात आला आहे. केंद्रीय लोकपाल अधिनियमातील तरतुदी विचारात घेऊन राज्याच्या महाराष्ट्र लोक आयुक्त व उप लोक आयुक्त अधिनियम १९७१ मध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याचा प्रस्ताव आज सादर करण्यात आला. या सुधारणेमुळे लोक आयुक्त अधिक सक्षम होणार आहे. तसेच याची कार्यकक्षा वाढून तो अधिक प्रभावी ठरणार आहे. यासोबतच लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांच्या नेमणुकीसाठी शिफारस करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्याची तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच नियुक्ती करण्याच्या दृष्टीने सहाय्य करण्यासाठी विविध क्षेत्रातील नामांकित सात सदस्यांची एक सर्च कमिटी देखील गठीत करण्याच्या तरतुदीचा देखील समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मंत्रिमडळाच्या मान्यतेने विधि व न्याय विभागाच्या सहमतीने आवश्यक ते फेरबदल करण्यासही मुभा देण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना सूचना

गोंदिया,दि.३०.: सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या सर्वप्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी (चरहरवलीं) पोर्टल १ ऑक्टोंबर २०१८ पासून नव्याने कार्यान्वीत झाले असून  https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती/फ्रिशीप योजनाकरीता आपले ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत केले आहेत. सदर अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करुन आपल्या जिल्ह्यातील सहायक आयुक्त, समाज कल्याण विभागाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहेत. महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या अर्जावर आपल्या जिल्ह्यातील सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडून ऑनलाईन मान्यता देण्यात येत आहे. सदर पोर्टलवर मान्य झालेले अर्जांची अदायगीची प्रक्रिया यशस्वी होणेकरीता पुढील बाबींची विद्यार्थ्यांच्या लॉगीनमधून ऑनलाईन पुर्तता होणे आवश्यक आहे.
प्रणालीमधील पेमेन्ट वाऊचर या स्क्रीनवरील इन्स्टीट्यूट स्टेटस व स्टूडंट स्टेटस हे पहिल्या सत्राकरीता Approved म्हणजेच मान्यता दर्शविली असल्यास आपणास Redeem हे बटन सक्रीय/ॲक्टीव झालेले दिसेल. वरील स्क्रीनमध्ये विद्यार्थी व महाविद्यालय यांना मान्य झालेल्या रकमा दर्शविण्यात येत आहेत. सदर रकमा या संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यात तसेच संबंधित महाविद्यालयाच्या बँक खात्यावर तसेच संबंधित महाविद्यालयाच्या बँक खात्यावर वितरीत करुन घ्यावयाच्या असल्यास Redeem बटन दाबणे अत्यावश्यक आहे. या प्रक्रियेस वाऊचर जनरेशन असे संबोधीत केले जाते. विद्यार्थ्यांच्या लॉगीनमधून वरील नमूद केलेली ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण न केल्यास मान्य झालेली विद्यार्थी व महाविद्यालयाची शिष्यवृत्तीची रक्कम वितरण होणार नाही याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्याचे बँक खाते क्रमांक प्रणालीमध्ये अचुक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत केलेले बँक खाते क्रमांक आपल्या आधार क्रमांकाशी सलग्न असणे आवश्यक आहे. अदायगीच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक स्तरावर एस.एम.एस. येणेस्तव मोबाईल क्रमांक हा आधार तसेच नोंदणीकृत बँक खात्याशी सलग्न असून तो अद्यावत असणे आवश्यक आहे.
सद्यस्थितीत वाऊचर जनरेशन झालेल्या अर्ज संख्येपैकी केवळ १० टक्के विद्यार्थ्यांनी वाऊचर रिडीमशन प्रक्रिया पूर्ण केली असून ९० टक्के विद्यार्थ्यांनी वाऊचर रिडीमशन प्रक्रिया अद्यापही केलेले नाही. सदर प्रक्रिया विद्यार्थ्यांमार्फत पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्याचे व संबंधित महाविद्यालयाचे शिष्यवृत्तीच्या रकमेचे वितरण पूर्ण होत नसल्याचे आढळून येत आहे.
वरील सूचनांचे पालन न केल्यास व शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या बँक खात्यावर जमा न झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी संबंधित विद्यार्थ्यांची असेल. याबाबत सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी राहणार नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया यांनी कळविले आहे.

बीडीओ साबळेच्या संकल्पनेतून पदाधिकारी,अधिकारी कर्मचार्यांसाठी आरोग्य शिबीर

आमगाव,दि.30ःः येथील पंचायत समितीच्या परिसरातील सभागृहात आज(दि.30)सभागृह पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांच्या पुढाकाराने तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.चंदू वंजारे यांच्या सहयोगाने आरोग्य तपासणी शिबीर पार पडले.
 अनियमित जीवनशैली व कामाचा वाढता ताण लक्षात घेता पदाधिकारी,अधिकारी व कर्मचार्यांचा आरोग्याकडे दुर्लक्ष होतो. त्याचा कामावर विपरीत परिणाम होतो.करिता पंचायत समिति कार्यक्षेत्रात कार्यरत सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची रक्त तपासणी करून उपचार करण्यात आले. सदर तपासणी डॉ रेणुका जनईकर,डॉ मीनाक्षी कलाम,डॉ लक्ष्मीकांत वाघमारे,डॉ प्रिया चंद्रिकापूरे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र बनगाव, तिगाव व ठाणा येथील कर्मचार्यांनी सहकार्य केले.
आरोग्य शिबिराला सभापती वंदना बोरकर,पंचायत समिती सदस्य अशोक पटले,ग्रामसेवक युनियन जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन,पंचायत समितीचे अधिक्षक संजय बनकर,विस्तार अधिकारी के.एम.रहांगडाले,ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष शैलेश परिहार,रामा जमाईवार,पी.आर.चौधरी, मेश्राम, बिसेन, कोंबडीबुरे, मंजुषा चौधरी, अभियंता ठाकरे, पटले, हटवार, चारथळ, चांदेवार व ईतर कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.

30 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2019 चा बेरार टाईम्स ईपेपर अंक आपल्यासाठी क्लिक करा-berartimes.com





Tuesday, 29 January 2019

देवरी सीमातपासणीनाक्यावर दलालांचे वर्चस्व

गोंदिया,दि.29- देवरी नजीक असलेल्या परिवहन विभागाच्या आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्यावर दलालांच्या वाढलेल्या वर्चस्वामुळे राज्याच्या तिजोरीला चुना लावण्याचे काम मोठ्या प्रमाणावर फोफावले आहे. परिणामी, या दलालांना सीमा तपासणी नाक्यावरून हद्दपार करण्याची मागणी होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवरीवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.53 वर शिरपूरबांध गावानजीक पूर्ण सोईसुविधायुक्त आंतरराज्यीय सीमा तपासणी नाका बसविण्यात आला आहे. या ठिकाणी मालाची वाहतूक करणाऱ्या हजारो मालवाहू गाड्या 24 तास धावत असतात. येथील परिवहन अधिकाऱ्यांवर या गाड्यांची तपासणी करण्याची जबाबदारी आहे. या नाक्यावरून जाणाऱ्या वाहनांची योग्य तपासणी करून अतिरिक्त भार, योग्य कादगपत्रे नसणारी वाहणे वा गुन्हेगारी स्वरूपाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून दोषी वाहन चालकांवर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. या कार्यवाहीच्या माध्यमातून दोषी वाहनचालकांकडून वसूल होणारा दंड हा कोट्यवधीच्या घरात असतो.
मात्र, या भागात असलेल्या दलालांनी या सीमा तपासणी नाक्यावर आपले वर्चस्व निर्माण केल्याने हे दलाल येथे नियुक्त परिवहन अधिकाऱ्यांवर राजकीय दबाब आणून वाहन चालकांना बिनधास्त वाहतूक करण्यास मदत करतात. सूत्रांनी अशी ही माहिती दिली की, यापूर्वी येथील एका रेंस्टारेंट मध्ये काम करण्याऱ्या नोकरावर बनावट कागदपत्रे प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. परिणामी, बाह्य आणि राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याच्या तिजोरीला चुना लावण्याचे काम जोमात सुरू आहे. सदर रेस्टारेंटमध्ये पुन्हा अवैध कागदपत्रे तयार करण्याचे काम सुरू झाल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
यामुळे प्रशासनाने या प्रकरणी लक्ष देऊन तेथे कार्यरत परिवहन अधिकाऱ्यांना भयमुक्त वातावरणात काम करण्याची व्यवस्था करावी आणि बाह्य हस्तक्षेप आटोक्यात आणून राज्याचे बुडणारे महसूल वाचवून राज्याची आर्थिक घडी नीट बसविण्याचे प्रयत्न सरकार दरबारी व्हावे, अशी मागणी शिरपूर परिसरातील नागरिकासह सर्वांनी सरकारकडे केली आहे.
लाखनी,दि. 29 - प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर लाखनी येथील जिल्हा परिषद गांधी शाळेच्या विध्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे मनोरे तयार करून आकर्षणाचे केंद्र ठरले.
सदर विद्यार्थ्यांना तहसीलदार यांचे कडून सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.

परळीत जुनी पेन्शन हक्क संघटनेचा हल्लाबोल मोर्चा


बीड,दि,29- शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचा गाशा गुंडाळल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी आपल्या जुनी पेंशनच्या मागणीसाठी राज्यात सर्वत्र पालकमंत्र्यांच्या निवास आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्ला बोल आंदोलन गेल्या 27 जानेवारी आयोजित केले होते. या आंदोलनाचा एक भाग म्हणून बीड शाखेच्या वतीने पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी येथील निवासस्थानासह तहसील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन सरकारला सादर केले.

राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने अनेकदा कर्मचाऱ्यांसह धरणे, उपोषण, मोर्चे आंदोलने केली. वेळोवेळी मुख्यमंत्री, वित्तमंत्री यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला स्वतः पाचारण करून नागरी सेवा अधिनियम 1982 व 1984 अंतर्गत कुटुंब निवृत्ती वेतन योजनेचे तसेच सर्व कर्मचाऱ्यांना मृत्यू व सेवानिवृत्तीनंतर उपदानाचे लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही मंत्रिमहोदयांनी सदर लाभ देण्याच्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. उलट जुनी पेन्शनच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधील संतोष अधिक तीव्र होत आहे. हाच असंतोष आज परळीत शेकडो कर्मचाऱ्र्यांनी "जुनी पेंशन नाही तर मतदान नाही" घोषणा देत व्यक्त केला.
 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत जुनी पेन्शन चे विधेयक मंजूर करून दिल्लीतील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केली. तसेच कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या घोषणापत्रातील आश्वासनानुसार सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याची घोषणा केली. देशातील इतर पाच राज्यांमध्ये कुटुंबनिवृत्ती वेतन योजनेचा तसेच सर्व कर्मचाऱ्यांना मृत्यू व सेवानिवृत्तीनंतर उपदानचे लाभ दिले आहेत. पण महाराष्ट्रात वेळकाढू धोरण मंत्रिमंडळाद्वारे अवलंबविल्या जात आहे. या विरोधात हे हल्लाबोल आंदोलन करून महाराष्ट्रातील 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अधिनियम 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करा,अशी मागणी राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनाद्वारे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. या मोर्चाला राज्यप्रवक्ते शिवाजी खुडे, राज्य कोषाध्यक्ष कैलास आरबाड, जिल्हाध्यक्ष विष्णू आडे, विशाल घोलप आण्णा घोडके, अमोल काळे, संदीप धोंडे, माणिक राठोड, जितेंद्र दहिफळे आदींनी संबोधित केले. संचलन मोहन गीते यांनी केले तर आभार परळी तालुकाध्यक्ष अशोक भोजने यांनी मानले.

गुरूबसव पतसंस्थेत तहसिदार अर्चना पाटील यांचा सत्कार

संख (ता.जत ),दि. 29-  येथील श्री गुरूबसव नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने  अप्पर तहसिलदार अर्चना पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
नव्याने आलेले पाटील यांनी संख  अप्पर तहसिल कार्यालयाची  चांगली घडी बसविली आहे. सामान्य जनतेच्या हितासाठी काम करण्याऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव व्हावा, या उदेशाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे सभापती  सुरेखा पाटील यांनी  अप्पर तहसिदार अर्चना पाटील यांचा फेटा बांधून सत्कार केले .
यांवेळी पाटील यांनी बोलताना सर्व गावांच्या विकासाचे आश्वासन उपस्थितांना दिले.
 संस्थापक गुरूबसव आर.पाटील ,उपसभापती अहमद शेख ,सर्व  संचालक मंडळ , श्री गुरूबसव विद्यामंदिर कॉलेज चे मुख्याध्यापिका ज्योती पाटील ,प्रा.आर.बी.पाटील सर ,तमण्णा बागेळी  आदी मान्यवर उपस्थित होते .
राजेभक्षर जमादार
पाडोंझरी (ता.जत )29येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा पांडोझरी लोकनियुक्त सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विषयावर प्रदीर्घ चर्चा होऊन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
 यावेळी ग्रामस्थांनाच्या वतीने अनेक महत्त्वपूर्ण विषय मार्गी लावण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी  उपसरपंच नामदेव पुजारी यांनी अत्यंत शिस्तबद्ध व संयमी पद्धतीने कामकाज हाताळल्याने प्रत्येक प्रश्नावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
ग्रामसभेत प्रामुख्याने वैयक्तिक लाभाच्या योजनेचे लाभार्थी निवडणे, वैयक्तिक शौचालय मंजूर करणे,  चारा छावणी किंवा चारा डेपो मागणी करणे, पाणंद रस्ते मंजूर करणे, पर्यावरण संतुलित योजनेमध्ये गावाचा समावेश करणे, विकासकामांचा कृती आराखडा, व्यायाम शाळा प्रस्ताव पाठविणे अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविणेकामी निर्णय घेण्यात आले. हि सर्व माहिती ग्रामसेवक पोतदार यांनी सांगितले.
या ग्रामसभेत सरपंच जिजाबाई कांबळे उपसरपंच नामदेव पुजारी सदस्य  तुकाराम कोरे   आबासाहेब लोखंडे आपा कटरे रूकमिनी गडदे कमलाबाई पुजारी  शिवबाई मांग, माजी  जि प अध्यक्ष आण्णासाहेब गडदे,  शिवापा बाबानगर, विठोबा बिराजदार, सुभाष कांबळे ,सतीश बिराजदार , जि प शाळेचे शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी  बोलताना उपसरपंच नामदेव पुजारी म्हणाले,"मी एकटाच गावाचा सरपंच नसून, आपण सर्वच सरपंच आहोत, या भावनेतून गावाचा विकास करूया. गाव नक्कीच सुजलाम् सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही."
या ग्रामसभेला गावातील ग्रामस्थ मोठ्या , संख्येने उपस्थित होते.

सुपरमॉम - कॉलरवाली वाघीण बनली ३० बछड्यांची आई



सिवनी (मध्‍यप्रदेश)दि.29: मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाची 'राजकुमारी' म्‍हणजे 'कॉलरवाली' वाघिणीने नवा विक्रम केला आहे. ही वाघीण आठव्यांदा आई झाली आहे. तिने यावेळी ४ बछड्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे आतापर्यंत ३० बछड्यांना जन्म देण्याचा विक्रम या 'पेंचच्या राणी'ने केला आहे.

पेंचमध्‍ये रविवारी (ता.२६ जानेवारी) या वाघींनीला चार बछड्‍यांच्‍यासोबत आधिकाऱ्यांनी पाहिले. या वाघीनींस तिच्‍या रेडिओ कॉलरमुळे कॉलरवाली असे नाव मिळाले आहे. त्‍याचप्रमाणे सुपरमॉम, पेंचची राणी, राजकुमारी या नावांनी देखील या वाघीनीला ओळखले जाते. 
कॉलरवाली वाघीणीने २००८ मध्‍ये तीन बछड्यांना जन्‍म दिला होता मात्र वातावरणामुळे तीचे बछडे जास्‍त काळ जगू शकले नाहीत. या बछड्‍यांचा २४ दिवसाच्‍या आतच मृत्‍यू झाला होता. काही तज्ज्ञांच्या मते, कॉलरवाली वाघीणीने आतापर्यंत १३ ठिकाणी बछड्यांना जन्‍म दिला आहे व ती बछड्यांना जन्‍म देण्‍यासाठी ज्‍यादातर गुहांची निवड करते. २००८ ते २०१३ या कालावधीत कॉलरवाली वाघीणीने १८ बछड्यांना जन्‍म दिला. त्‍यापैकी १४ जिवंत आहेत.

गुटखा खाऊन दूध पिल्याने तरुणीचा मृत्यू

नंदुरबार ,दि.29-गुटखा खाल्ल्यानंतर त्यावर दूध पिल्यामुळे एका तरूणीला विषबाधा झाल्‍याची घटना नंदुरबार शहरात घडली होती. यामध्येच या तरूणीचा सोमवारी 28 जानेवारीला मृत्‍यू झाला.  

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील मुजावर मोहल्ला एकता चौकी येथे राहणारी निषाद अंजूम सलीम सैय्यद या (27 वर्षीय) तरुणीने 5 दिवसांपूर्वी गुटखा खाल्ल्यावर त्‍यावर लगेच दूध पिले होते. गुटख्यावर दूध पिल्‍याने तिला विषबाधा झाली आणि त्यामुळे तिची प्रकृती अत्यवस्थ होताच, तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार चालू असताना तिचा काल सोमवार (दि. 28) जानेवारी रोजी रात्री उशिरा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन

नवी दिल्ली,दि.29(वृत्तसंस्था) – जॉर्ज फर्नांडिस नावाचे वादळ मंगळवारी सकाळी शांत झाले. ते 88 वर्षांचे होते. फर्नांडिस हे दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.कामगारांचे नेते म्हणून जॉर्ज प्रसिद्ध आहेत. ते पत्रकारही होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जॉर्ज नगरसेवक ते देशाचे संरक्षण मंत्री असा प्रवास केलेले नेते होते. त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. अल्झायमर आणि पार्किन्सन्स सारख्या आजाराने ते दीर्घकाळापासून अंथरुणाला खिळलेले होते. अखेरच्या काळात त्यांना काहीही आठवतही नव्हते.
1967 मध्ये पहिल्यांदा बनले खासदार 
3 जून 1930 ला जन्मलेले जॉर्ज कामगार संघटनेते नेते होते. फर्नांडिस 1967 मध्ये तत्कालीन दक्षिण बॉम्बेमधून काँग्रेसच्या एस.के. पाटील यांना पराभूत करून ते पहिल्यांदा खासदार बनले होते. 1975 च्या आणीबाणीनंतर फर्नांडिस बिहारच्या मुजफ्फरपूरमधून खासदार बनले होते. मोरारजी देसाई सरकारमध्ये ते उद्योग मंत्री होते. त्याशिवाय त्यांनी व्हीपी सिंह सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री पदावरही होते. अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार (1998-2004) मध्ये फर्नांडीस संरक्षण मंत्री होते. कारगिर युद्धाच्या काळातही ते संरक्षणमंत्री होते.

9 लोकसभा निवडणुकी जिंकले
फर्नांडिस 1967 पासून 2004 पर्यंत 9 लोकसभा निवडणुका जिंकले. आणीबाणीत कते शिखांच्या वेशात फिरत होते. अटकेपासून वाचण्यासाठी ते स्वतःला खुशवंत सिंह असल्याचे सांगायचे.2003 मध्ये विरोधकांनी कॅगचा हवाला देत जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर शवपेटी घोटाळ्याचे आरोप लावले होते. जॉर्ज यांनी त्नेयाला आव्हात देत म्हटले होते, तुम्ही प्रामाणिक असाल तर उद्यापर्यंत मला पुरावा द्या मी राजीनामा द्यायला तयार आहे. त्यानंतर ऑक्टोबर 2015 मध्ये सुप्रीम कोर्टाने फर्नांडिस यांना या प्रकरणी निर्दोष ठरवले होते.
कैद्यांना ऐकवायचे श्रीमद्भागवतगीता 
फर्नांडिस यांना आणीबाणीदरम्यान बडोदा डायनामाइट केसमध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी ते तुरुंगात कैद्यांना श्रीमद्भागवतगीता ऐकवायचे. फर्नांडिस यांनी संरक्षणमंत्री म्हणून 30 पेक्षा जास्त वेळा सियाचीनचा विक्रमी दौरा केला. दिल्लीचे 3, कृष्ण मेनन मार्ग त्यांचे निवासस्थान होते. येथे कोणतेही गेट नव्हते किंवा सुरक्षारक्षकही नसायचे.

महावितरणचा कार्यकारी अभियंत्यास लाच घेताना अटक




अकोल्यातील ५४ वर्षीय तक्रारदारांने घरी सोलर ऊर्जा लावण्यासाठी महावितरणकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता मोरेश्वर नारायण शिरसे याने तक्रारदारास २ हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत अकोला लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार एसीबीने २८ जानेवारीला तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर आज सकाळी कार्यालयात सापळा रचून तक्रारदारास मोरेश्वर शिरसे यांच्या कार्यालयात २ हजार रुपये लाचेची रक्कम देण्यासाठी पाठविण्यात आले.तक्रारदाराकडून लाच स्विकारताच एसीबीने कार्यकारी अभियंता शिरसे यांना ताब्यात घेतले.कारवाई एसीबीचे उपअधीक्षक संजय गोरले यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

ओबीसींच्या मागण्यांना घेऊन पुकारलेला गडचिरोली बंद यशस्वी

गडचिरोली,दि.29 : ओबीसी प्रवर्गाची जनगणना करावी, या मुख्य मागणीसाठी ओबीसी युवा महासंघ व इतर ओबीसी संघटनांनी सोमवारी गडचिरोली शहर बंदचे आवाहन केले होते. यासह ओबीसींच्य विविध मागण्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी २८ जानेवारी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ, इतर समविचारी संघटनांच्यावतीने एक दिवशीय गडचिरोली बंद पुकारण्यात आले होते. या बंदला शहरातील दुकानदार संघटना, पानठेला चालक-मालक संघटना, ऑटो चालक-मालक संघट तसेच शहरीवासीयांनी सहकार्य करीत बंदला उत्त्तम प्रतिसाद दिला.
ओबीसी युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळीच शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन बंदचे आवाहन केले. त्यामुळे शहरातील काही शाळा बंद तर काही शाळा सुरू होत्या. काही व्यापाºयांनी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवली होती. व्यापाºयांनी आंदोलकांचा अंदाज घेऊन दुकाने सुरू केली. परंतू ओबीसी युवा संघटनेच्या पदाधिकाºयांनी शहरातून बाईक रॅली काढून दुकानदारांना बंदचे आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक दुकानादारांनी व्यवहार बंद ठेवले.
देशात गुरांची, ढोरांची, कुत्र्यांची गणना होते, पंरतु ओबीसी समाजाची होत नाही. ओबीसी समाजाची जनगणना होत नसल्याने या समाजाला आरक्षण संख्येच्या प्रमाणात नसल्यामुळे या समाजाची सामाजिक, शैक्षणिक स्थिती कमकुवत होत आहे. याकरिता २0११ च्या झालेले जनगणनेतून ओबीसी समाजाची आकडेवारी घोषित करावी. जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, तीन वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मागासवगीर्य विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कमी करण्यात आली ती पूर्ववत सुरू करण्यात यावी. जिल्ह्यात ५0 टक्केचे वर गैर आदिवासी असलेली गावे अनूसचित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात बिगर अनूसचित क्षेत्र कमी झाले असून ओबीसी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. नॉन क्रिमिलेअरची अटी ही असंवैधानिक जाचक अट असल्याने ओबीसी समुहातून नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना १00 टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, जिल्ह्यात एक मतदार संघ ओबीसीसांठी खुला करण्यात यावा. ओबीसी प्रवर्गाला नॉन क्रिमिलेअर अटीतून सुट देण्यात यावी, ओबीसीसाठी मंजूर करण्यात आलेले स्वतंत्र मंत्रालय लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतूद करून तत्काळ कार्यानिवत करण्यात यावे, शेतमालाला हमी भव जाहीर करताना उत्पादन खर्च अधिक ५0 टक्के मुनाफा जोडून जाहीर करण्यात यावा, पारंपरिक पीक अणेवारीत बदल करून क्षेत्रनिहाय आणेवारी काढून सुकसानीच्या प्रमाणात आर्थिक मदत द्यावी, सिंचनासाठी साखळी बंधार्‍यांची निर्मिती करून शाश्‍वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करावी. शेतमालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र केंद्र उभारून शेतमालाचा दर ठरविण्याचा अधिकार शेतकर्‍यांना देण्यात यावा. ओबीसी कर्मचार्‍यांना सेवेत इतरांप्रमाणे पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावा, या मागण्यासाठी  राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ, इतर समविचार संघटनांनी गडचिरोली शहर बंद पुकारले होते. या बंदला शहरातील दुकानदार संघटना, पानठेला चालक-मालक संघटना, ऑटो चालक-मालक संघट तसेच शहरीवासीयांनी सहकार्य करीत उत्त्तम प्रतिसाद दिला.

‘चिरीमिरी’ घेण्यात पोलिस ‘नंबर २’

पुणे,(अमीर मुलाणी),दि.29ः- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यांत महसूल विभागापाठोपाठ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाचखोरीमध्ये सलग दुसऱ्या वर्षीही आपला ‘नंबर २’ क्रमांक कायम ठेवला. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून २०१७ च्या तुलनेत मागील वर्षी लाच घेण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. दोन वर्षांत तब्बल ८९ लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा पोलिस कर्मचारीच ‘चिरीमिरी’ घेण्यात पुढे असल्याचे दिसत आहे.
एखादा किरकोळ अपघात किंवा किरकोळ स्वरूपाच्या कौटुंबिक भांडणाची प्रकरणे पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून दोन्ही बाजूंना कायद्याची भीती दाखविली जाते.त्यानंतर एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यापेक्षा संबंधित प्रकरणे बाहेरच्या बाहेरच मिटविण्यावर पोलिस भर देतात. त्यातूनच ‘तडजोडी’ची भाषा होते आणि दोन्ही बाजूंच्या लोकांकडून ‘चिरीमिरी’ घेत संबंधित प्रकरणावर पडदा टाकला जातो. अशी छोटी-मोठी प्रकरणे अर्थपूर्ण व्यवहार करून मिटवली जातात. मात्र, काही मोठ्या प्रकरणांमध्ये हीच ‘चिरीमिरी’ थेट लाखोंच्या घरात पोचते.
जमिनींच्या संदर्भातील भांडणे, फसवणुकीची प्रकरणे, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, राजकीय, प्रतिष्ठित व्यक्तींच्या संदर्भातील प्रकरणांची दखल न घेणे, गुन्हे दाखल न करणे, गुन्हा दाखल होऊनही संबंधित प्रकरणांचा तपास न करणे, संबंधितांना अटक न करणे यांसारख्या वेगवेगळ्या कारणांसाठी लाच घेण्याचे काम पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून केले जाते. याचपद्धतीने पोलिसांकडून लाच घेण्याची २०१७ व २०१८ या दोन वर्षांत ८९ प्रकरणे उघडकीस आली. त्यामध्ये ‘क्‍लास वन’ पोलिस अधिकाऱ्यांवरील कारवाई काही प्रमाणात वाढली आहे. २०१८ मध्ये ५ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे; तर पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या ९० असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे.लाचखोर पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची वर्गवारी
वर्ष प्रकरणे प्रथमश्रेणी अधिकारी द्वितीय श्रेणी तृतीय श्रेणी खासगी व्यक्तीमार्फत
२०१७ ३५ ०१ ०२ ३६ ०७
२०१८ ५४ ०४ ०३ ४९ ०५
—————
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाअंतर्गत पुण्यातील १४ तालुक्‍यांसह चार जिल्हे येतात. या सर्व जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत महसूल विभागानंतर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाच घेण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. किरकोळ कारणापासून ते एखाद्या मोठ्या प्रकरणासाठी पोलिस अधिकारी-कर्मचारी लाच घेतात. अशा अनेक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. पोलिसांच्या लाचखोरीमध्ये मागील वर्षी काही प्रमाणात वाढ झाली आहे.
– दत्तात्रेय भापकर, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे

चिचगड येथे कृषी प्रदर्शन येत्या शनिवारी

गोंदिया,दि.29- गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत येत्या शनिवारी (दि.2) चिचगड येथे कृषी प्रदर्शन आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक श्रीराम विद्यालयात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा मडावी यांचे अध्यक्षतेत आमदार संजय पुराम यांचे हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष हमीद अल्ताफ, सभापती शैलजा सोनवाने, लता दोनोडे,रमेश अंबुले,विश्वजित डोंगरे, देवरी पंचायत समितीच्या सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेश सोनबोईर, चिचगडच्या सरपंच कल्पना गोसावी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी दयानिधी राजा, कृषी विकास अधिकारी झेड डी टेंभरे. जि.प. सदस्य दीपकसिंह पवार सरिता रहांगडाले, उषा शहारे, माधुरी कुंभरे, भास्कर आत्राम, मंदा कुंभरे,सरिता कापगते, शीला चव्हान, सुनिता मडावी, रमेश चुऱ्हे, विजय टेकाम, कैलास पटले, पंचायत समिती सदस्य देवकी मरई,संगीता भेलावे, गणेश टोपे,अर्चना ताराम, महेंद्र मेश्राम,मेहतरलाल कोराम, लखनी सलामे, नरेंद्र मडावी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनाचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी आणि नागरिकांनी घेण्याचे आवाहन देवरीचे गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर, सहायक गटविकास अधिकारी एस एम पांडे, कृषी अधिकारी समुनित चुंचुवार आणि व्ही एस बोकडे यांनी केले आहे.

भावी अभिनेता क्षितिज मोहोड काळाच्या पडद्याआड

देवरी 29
आपल्या नृत्य कलेच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेला भागी देवरी येथील क्षितिज मोहोड याचे पिलिया आजाराने  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सर्व क्षेत्रावरून क्षितिज साठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Sunday, 27 January 2019

स्व.खे. मंडळाचे जिल्हा क्रीडा महोत्सव उद्या

सावलीच्या पटांगणावर होणार स्पर्धेला सुरवात

गोंदिया,दि.27- गोंदिया जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या चार दिवसीय जिल्हा स्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन देवरी तालुक्यातील सावली जिल्हा परिषदेच्या पटांगणावर उद्या सोमवारी (दि.28) सकाळी अकरा वाजता होणार आहे.
 या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे वित्त, नियोजन आणि वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री ना. राजकुमार बडोले हे असतील. ध्वजारोहक म्हणून गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा मडावी ह्या उपस्थित राहणार आहेत. यावेळी खासदार प्रफुल्लभाई पटेल, गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते , गोंदिया - भंडाराचे खासदार मधुकर कुकडे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून आमदार गोपालदास अग्रवाल, आमदार अनिल सोले, आमदार परिणय फुके, आमदार ना.गो. गाणार, आमदार संजय पुराम, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी कांदबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानिधी राजा, जिपचे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, जिप. सभापती शैलजा सोनवाने, विश्वजीत डोंगरे, लता दोनोडे, देवरी पंस सभापती सुनंदा बहेकार, सालेकसाच्या अर्चना राऊत, अर्जूनी मोरचे अरविंद शिवणकर, तिरोडाच्या नीता रहांगडाले, सडक अर्जूनीचे गिरीधारी हत्तीमारे, गोंदियाच्या माधुरी हरिणखेडे,गोरेगावच्या माधुरी टेंभरे, आमगावच्या वंदना बोरकर, जि.प सदस्य दीपकसिंह पवार,सरिता रहांगडाले. उषा शहारे, माधुरी कुंभरे, देवरीचे उपसभापती गणेश सोनबोईर, पंस सदस्य संगीता भेलावे, गणेश तोफे, महेंद्र मेश्राम, देवकी मरई,अर्चना ताराम, मेहतरलाल कोराम, लखनी सलामे, नरेंद्र मडावी, गोंदिया जिपचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड, राजेश रुद्रकार, शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रफुल कचवे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेडीवार, सरपंच प्रभूदयाल पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या स्पर्धेत मैदानी स्पर्धा, वैयक्तिक स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हातील आठही पंचायत समितीमधील स्पर्धक विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. या स्पर्धेला जिल्ह्यातील नागिरकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्थानिक मुख्याध्यापक संदीप तिडके यांचेसह आयोजकांनी केले आहे.

Thursday, 24 January 2019

पुन्हा मतपत्रिकेकडे वळणार नाही: अरोरा


maharashtra times
Sunil Arora: पुन्हा मतपत्रिकेकडे वळणार नाही: अरोरा
नवी दिल्ली 

ईव्हीएम हँकिंगच्या वादानंतर तीनच दिवसांनंतर, 'भारतात आता पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान घेतले जाणार नाही', असे स्पष्ट करत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी ईव्हीएम हँकिंगचा वाद बाजूला सारला आहे. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात अरोरा बोलत होते. भारतात वापरात असेलेल्या ईव्हीएम हॅक केल्या जाऊ शकतात, असा दावा लंडनमधील हॅकथॉनमध्ये एका कथित सायबर तज्ज्ञाने दावा केला होता. यानंतर ईव्हीएमद्वारेच मतदान घेतले जाईल असे स्पष्ट करत मुख्य निवडणूक आयुक्तांनी मतपत्रिकेद्वारे मतदानाची शक्यता फेटाळून लावली. 
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हँक झाल्याचा दावाही कथिक सायबर तज्ज्ञ सय्यद सुजा याने केला होता. यानंतर याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाने दिल्ली पोलिसांकडे पत्राद्वारे केली होती. संसद मार्ग पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दाखल करण्यात आली. त्यानंतर यापुढील निवडणुका मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात या विरोधी पक्षांच्या मागणीला जोर धरू लागला. 

'यापुढेही आम्ही ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर सुरूच ठेवू', असे अरोरा यांनी दिल्लीतील कार्यक्रमात जाहीर केले आहे. याबाबत राजकीय पक्ष किंवा इतर कुणीही केलेल्या तक्रारींचे, तसेच सूचनांचे आम्ही स्वागत करू, असेही अरोरा पुढे म्हणाले. हँकिंगसंदर्भातील चर्चेमुळे आम्ही मुळीच घाबरणार नसून, आता देशात मतपत्रिकेचा काळ पुन्हा आणणार नाही, अशा शब्दात अरोरा यांनी मतपत्रिकेची शक्यता फेटाळून लावली. 

ईव्हीएममध्ये कुणीही अफरातफर करू शकणार नाही असे अरोरा यांनी हँकिंगवादापूर्वीही स्पष्ट केले होते. तथापि, आगामी लोकसभा निवडणूक ईव्हीएमद्वारे न घेता जुन्याच मतपत्रिका पद्धतीच्या माध्यमातून घेण्यात यावी, अशी मागणी काही विरोधी पक्ष करत आहेत. मात्र, आम्ही ईव्हीएमद्वारे विश्वासार्ह, निष्पक्ष, तटस्थ आणि नीतीने निवडणूक घेण्यात नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वासही अरोरा यांनी वेळोवेळी व्यक्त केला आहे.

खजरी/डोंगरगांव येथील आदिवासी विकास विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


सडक/अर्जुनी,दि.24 :— जगत कल्यान शिक्षण संस्था साकोली द्वारा संचालीत आदिवासी विकास हायस्कुल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी/डोंगरगांव येथील वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन यश्वसी व उत्साहात पार पडले.अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी डाॅ .आकाश खुणे होते.उद्घाटन माजी विद्यार्थी डाॅ.कैलास वैद्द यांच्या हस्ते पार पडले.रंगमंच पुजन माजी विद्यार्थी मनोज गायकवाड यांनी केले.स्वागताध्यक्ष जगत कल्याण शिक्षण संस्थेचे सचिव एन.एन.येळे होते.
या प्रसंगी विशेष अतिथी माजी विद्यार्थी स.शी.घनश्याम भिवगडे,माजी विद्यार्थी प्रा.विलास आगासे,माजी विद्यार्थी प्रा.धनराज लंजे,माजी विद्यार्थी प्रा.तोषांत चौव्हाण,माजी विद्यार्थी अॅड.जितेंद्र मटाले,माजी विद्यार्थी प्रा.उत्तरा तागडे,माजी विद्यार्थी स.शि.दिनेश फदाले,माजी विद्यार्थी क.लिपीक कु.शितल फुल्लुके,माजी विद्यार्थी तथा शिक्षक पालक संघाचे सहसचिव किशोर वंजारी,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष एकनाथ मस्के,ब्लॅक ब्रिटिश अकॅडमी गोंदिया चे संचालक दिपक बहेकार,से.नि.पर्यवेक्षक ए.एम.खुणे,से.नि.शिक्षक तथा तमुस बोथली चे अध्यक्ष भुमेश्वर चौव्हाण,पालक संघाचे सिताराम लट्टे,से.नि.प्राचार्य तथा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मार्गदर्शक दिनेश रंहांगडाले,प्राचार्य खुशाल कटरे,उपप्राचार्य बी.आर.देशपांडे,पर्यवेक्षक रविशंकर कटरे उपस्थित होते.प्रास्ताविक क.महा.विद्यार्थी प्रमुख लिकंन राऊत यानी सादर केले.
प्रारंभी नागपुर बोर्डाच्या वतिने फेब्रु/मार्च 2018 मध्ये आयोजित ई.10वी.व ई.12वी.परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
मान्यवंरानी विद्यार्थी व पालक यांना विद्यार्थी कसे घडवावेत,शिक्षणा चे महत्व ,सध्याची स्पर्धा,संगणक क्रांती,परीसरातील वातावरणाचा अध्ययण प्रक्रिये वर होणारा कुप्रभाव विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावयाची दक्षता ,व्यक्तिमत्व विकास तथा व्यवसाय मार्गदर्शन बाबतीत सखोल मार्गदर्शन करण्यात आले .या दरम्यान क्रिडा प्रात्यक्षिके,देशभक्तिपर नृत्य ,लेझिम प्रात्यक्षिके उपस्थितांच्या समक्ष सादर करण्यात आले. संचालन मार्गदर्शन प्रा.सुरज रामटेके स.शि.जी.टी.लंजे,प्रा.वाय.टी.परशुरामकर यांनी केले.आभार प्राचार्य खुशाल कटरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्विते साठी स.शि. यु.बी.रंहागडाले,स.शि.एच.आय.चौधरी,स.शि.कु.व्हि.एस.राठोड,सह संपुर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तथा.विद्यार्थी प्रमुख यांनी सहकार्य केले.

Tuesday, 22 January 2019

नक्षल्यांनी केली तिघांची हत्या, कसनासुरात दहशत


गडचिरोली,दि.२२: नऊ महिन्यांपूर्वी ४० नक्षली ठार होण्यास कारणीभूत असल्याच्या संशयावरुन सशस्त्र नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील कसनासूर येथील तीन नागरिकांची हत्या केल्याचे आज उघडकीस आले आहे. या घटनेमुळे भामरागड तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांमध्ये मालु दोगे मडावी, कन्ना रैनू मडावी व लालसू मासा कुडयेटी यांचा समावेश आहे. तिघांचेही मृतदेह अगदी जवळ भामरागड-आलापल्ली मार्गावरील कोसफुंडी फाट्यावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.
२२ एप्रिल २०१८ रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर-बोरिया जंगल तसेच राजाराम खांदला-नैनेर परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी ठार झाले होते. त्यात डीव्हीसी सिनू, त्याची पत्नी कमांडर शांता व पेरमिली दलम कमांडर तथा डीव्हीसी साईनाथ या प्रमुख व जहाल नक्षल्यांचा समावेश होता. या ४० नक्षल्यांच्या हत्येस उपरोक्त तिघेही कारणीभूत असून, त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यामुळेच ४० नक्षल्यांना जीव गमवावा लागला, त्यामुळे तिघांची हत्या केल्याचा उल्लेख नक्षलवाद्यांनी घटनास्थळाजवळ लावलेल्या बॅनरवर केला आहे. एप्रिल २०१८ मध्ये ४० नक्षली ठार झाल्याचा राग नक्षल्यांच्या मनात होता. त्याचा केव्हा ना केव्हा उद्रेक होईल, याची कल्पना सर्वांना होतीच. परंतु निष्पाप गावकèयांना पोलिस संरक्षण देऊ शकले नाही. त्यामुळे तीन जणांना प्राण गमवावा लागल्याची टीका होऊ लागली आहे.
तीन जणांची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर एक वेगळीच माहिती पुढे येत आहे. ङ्कशनिवारी(दि.१९) शंभराच्या आसपास सशस्त्र नक्षलवादी कसनासूर गावात गेले होते. त्यांनी सर्वांना एकत्र बोलावून ४० नक्षल्यांचा बदला घेण्याची धमकी दिली. काही जणांच्या धान्याचीही नासधूस केली. त्यानंतर सोमवारी(दि.२१) गावातील काही वृद्ध नागरिक वगळता शंभराहून अधिक गावकèयांनी आपले गाव सोडून ताडगाव येथील पोलिस मदत केंद्र गाठले. सध्या सर्वजण तेथेच आश्रयाला आहेत. विशेष म्हणजे, नक्षलवादी आपल्यासोबत ६ जणांना घेऊन गेले होते. त्यातील तिघांची त्यांनी आज निर्घृण हत्या केली. उर्वरित तिघेजण नेमके कुठे आहेत, हे समजलेले नाही.
ऑक्टोबर २०१८ अखेरपर्यंत मुप्पाला लक्ष्मणराव उर्फ गणपती याच्याकडे भाकप(माओवादी)च्या महासचिवपदाची सूत्रे होती.परंतु प्रकृती अस्वास्थाच्या कारणामुळे गणपतीने महासचिवपद सोडल्यानंतर जहाल नक्षली नंबाला केशव राव उर्फ गगन्ना उर्फ बसवराजू याची नियुक्ती करण्यात आली. नंबाला केशव राव हा अतिशय आक्रमक असल्याने आगामी काळात हिंसाचार बळावण्याची शक्यता नक्षलग्रस्त राज्यातील पोलिस व गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली होती. गगन्नाच्या नियुक्तीनंतर गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या हा पहिला मोठा हिंसाचार आहे. विशेष म्हणजे, दक्षिण गडचिरोलीवर कमांड असलेली जहाल नक्षली नर्मदाक्का हिलाही तीन महिन्यांपूर्वीच अबुझमाड भागात पाठविण्यात आले असून, आक्रमक नक्षल नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे नक्षलवादी आगामी काळात मोठा हिंसाचार घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बीजेपी पूर्व सांसद ने दिया इस्तीफा, कहा मोदी नहीं बन पाएंगे पीएम


पटनाः शुक्रवार को आयोजित प्रेस कांफ्रेंस में पूर्णिया के पूर्व  बीजेपी सांसद उदय सिंह ने बीजेपी पर जोरदार हमला बोलते हुए  पार्टी छोड़ने का ऐलान कर दिया। प्रेस कांफेस में उन्होने बीजेपी को कमजोर बताते हुए कहा कि बिहार में केवल सरकार में रहने के कारण बीजेपी ने गठबंधन की है। जदयू से गठबंधन करके बीजेपी ने अपना समर्पण किया है। वही गठवंधन पर अपनी नाराजगी भी जताई।


सांसद ने कहा कि वो अटल जी के साथ 2004  से ही यात्रा कर रहे है। लेकिन अब पार्टी में रहना मुश्किल हो गया है। इसलिए अपना त्यागपत्र पार्टी को दे दिया है। वही गठबंधन पर हमला बोलते हुए कहा कि बीजेपी ने यह स्वीकार कर लिया है कि बीजेपी काफी कमजोर हो गई है और शायद बीजेपी को लगता है कि मोदी जी का जादू कम हो गया है। बिहार के बीजेपी के सलाहकार के कारण बीजेपी की हार तय है ,लगता है कि मोदी जी दुबारा पीएम बन नही बन पाएंगे। वही राहुल गांधी की प्रशंसा करते हुए कहा कि तीन राज्यो में चुनाव जीतकर अब राहुल गांधी की पॉपुलरिटी लोगों में बढ़ने लगी है। 

Monday, 21 January 2019

शेंडा परिसरात बिबटचा मृत्यू


गोंदिया ,दि.२१: वन्यजीवांची सुरक्षा व त्यांचे संरक्षण करण्यासाठी वन विभाग दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करते. या निधीतून वन्यजीवांच्या सुरक्षेला धोका पोहचू नये, यासाठी वन विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना सूचनाही देण्यात येतात. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील वन्यजीवांचा विचार केल्यास अपघात व शिकार ही बाब नित्याचीच झाली आहे. त्यातच या महिन्यात शेंडा परिसरात पुन्हा एका बिबटचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.२१) उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या महिन्यात एकंदरीत आजच्या घटनेला पकडून तीन बिबट अत्यवस्थेत आढळून आले व त्यापैकी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला. बिबट्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल वन्यप्रेमींसह सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

२ हजार रुपयाची लाच घेणारा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया,दि.२१ – पिकाची नुकसान भरपाई दिल्याचा मोबदला म्हणून २ हजार रुपयाची लाच मागणार्या वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. किशोर धोंडु पटले असे अटक झालेल्या वनरक्षकाचे नाव आहे. पिकाची नुकसान भरपाई ७,३५० रुपये मिळवून दिल्याचा मोबदला म्हणून त्याने २ हजार रुपयाची लाच मागितली होती.
तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटाच्या शेतकऱ्याने खरीप हंगामात भाताचे पीक लावले होते. मात्र, ऑक्टोंबर २०१८ मध्ये त्यांच्या शेतात रान डुक्करांनी पिकाची नासधूस केली. तक्रारदार शेतकऱ्याने याबाबत तिरोडा वनक्षेत्र अधिकारी कार्यालय तक्रार केली होती. त्यांनी पिकांच्या भरपाईसाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केला. मात्र, किशोर धोंडू पटले, वनरक्षक, बीट क्षेत्र तिरोडा यांनी शेताची पाहणी केली. त्यानंतर वनरक्षक यांनी तक्रारदारास नुकसान भरपाईची रक्कम ७,३५० रुपये काढून दिल्याचा मोबदला म्हणून २ हजार रुपयाची लाच मागतली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीवरुन आज २१ जानेवारीला किशोर धोंडु पटले यांना २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. आरोपी पटले याच्यावर तिरोडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संख येथे आर के पाटील महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम

संख (ता.जत),दि.21-  स्थानिक आर के पाटील महाविद्यालयात येथे काल रविवारी (दि.20) विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा  आणि मार्गदर्शन शिबीर  घेण्यात आले. 
या  कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. श्री.शिवराज पाटील उपस्थीत होते. .यावेळी बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करून योग्य दिशेने प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. विद्यार्थ्यानी अभ्यासाचे नियोजन कसे करावे याचे ऊत्तम मार्गदर्शन त्यानी केले. 
 या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना  आर के पाटील म्हणाले कि, विद्यार्थ्यानी ध्येय बाळगले पाहिजे. ध्येय पूर्ण करण्यासाठी ध्येयाशी एकनिष्ठ राहून प्रयत्न केले पाहिजे. 
 सुत्रसंचालन प्रा. पी.व्ही वठारे यानी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य के.  एस. बिरादार, प्रा.ए एच. बिरादार, एम जे रानगर, मनूर, कोळी, कोरी, हळदकी, माळी,एस एम पाटील तसेच सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

संगठन ही राजनैतिक प्रगती का मूलाधार है- प्रदीप जायसवाल

गोंदिया,दि.21- समूचे भारतवर्षमें कलार समाज का विशाल अस्तित्व है। किंतू, विभिन्न उपजातियोंमें बटा होने के कारण इस समाज का राजनैतिक प्रभाव काफी कम दिखाई पडता है। जो समाज संगठित है, वह समाज प्रगतिशील समाज कहलाता है। उद्योग, व्यापार, शिक्षा व समाजिक क्षेत्रमें उन्नत होने के कारण सभी राजनैतिक संगठन का ध्यान वह समाज अपनी ओर आकृष्ठ करता है। किसी भी समाज का संगठन ही उस समाज की राजनैतिक प्रगती का मूलाधार होता है। यह विचार मध्यप्रदेश शासन के खनिजमंत्री ना. प्रदीप (गुड्डा) जायसवाल इन्होने गोंदिया में कल रविवार (दि.20) व्यक्त किये। दरम्यान, स्थानिक विधायक निधीसे निर्मित समाज भवन का भूमिपुजन विधायक गोपालदास अग्रवाल इन्होने किया।
ना. प्रदीप जायसवाल स्थानिक पिंडकेपार मार्गस्थित जैनकलार समाज भवन में आयोजित जैनकलार समाज संमेलन के उपलक्षपर अपने अध्यक्षीय संंबोधनमें बोल रहे थे। इस समारोह का उद्घाटन भारत सरकार के भारतीय जीवजंतू कल्याण बोर्ड के सदस्य मोहनसिंग आहलुवालिया इनके करकमलोद्वारा किया गया। विशेष अतिथी के रूप मे स्थानिक विधायक गोपालदास अग्रवाल, जैन कलार समाज जिलाध्यक्ष तेजराम मोरघडे, गोंदिया जिला परिषद सभापती शैलजा सोनवाने,  जिप सदस्य दुर्गा तिराले,  अखिल भारतीय कलार समाज के गोंदिया जिलाध्यक्ष मुकेश शिवहरे, राष्ट्रीय कलचुरी एकता महासंघके अध्यक्ष दीपक जायसवाल, गोंदिया एअर पोर्टके विमान पत्तन निदेशक सचिन खंगार,  गोंदिया पंचायत समिती के माजी सभापती प्रकाश रहमतकर, भंडारा से मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय के प्राचार्य प्रल्हाद हरडे, अशोक लिचडे, काशिनाथ सोनवाने, नागपुरसे सामाजिक कार्यकर्ता दीपक जायसवाल आदी मान्यवर मंचपर उपस्थित थे। इस अवसर पर स्थानिक विधायक निधी से निर्मित समाज भवन का भूमिपूजन विधायक गोपालदास अग्रवाल इनके हस्ते किया गया।
 अपने संबोधन में मंत्रिमहोदय ने आगे कहा, कलार समाज भारतीय इतिहास में गौरव का स्थान रखता है। संख्या की तादाद काही बडी होने पर भी अपने समाज की राजनैतिक पृष्ठभूमि काफी कमजोर है। कारण अपना विशाल समाज 27 विभिन्न उपजातियोंमे बटा होने से हमारी संगठनात्मक शक्ती कमजोर है। इस विशालतम समाज को एकसंघ करने के कार्य राष्ट्रीयस्तर पर विशेष रूप से जारी है। अलग अलग मंचपर कार्यक्रम आयोजित करना बंद कर हम सभी को अपना मंच साजा करते हुए अपनी उपस्थिती दर्ज करानी होगी। 
श्री आहलुवालियाजीने जोर देकर कहा हमें अलग अलग उपजातियोंसे उपर उठकर अपनी एकता का परिचय देना होगा। शिक्षा, व्यापार एवम शासकीय नोकरीओंमें स्थान पाकर अपना राजनैतिक कद उॅंचा करना हो तो हमे एक मंचपर आने की नितांत आवश्यकता है। अन्यथा गौरवमयी कलार समाज को हमेशा दुसरोंकी सहायता पर निर्भर रहना पडेगा। यह समाजहित में कतई नही होगा।
प्रास्ताविक गोंदिया जिला जैनकलार समाज ते सचिव सुखराम खोब्रागडे इन्होने किया। संचालन उमेश भांडारकर एवम आभार वरून खंगार इन्होने व्यक्त किये।
दरम्यान, महिलाओके लिए हलदीकुंकू व महिला संमेलन का आयोजि किया गया था। इस कार्यक्रम का संचालन यशोधरा सोनवाने एवम प्राजक्ता रणदीवे इन्होने किया. इस अवसर पर रंगोली, मेहंदी और नृत्य स्पर्धा का आयोजन भी किया गया था। विजेता एवम समाज के होनहार छात्र- छात्राओ का भी उचित सम्मान मान्यवरोंके हस्ते किया गया।
इस समारोह को सफल बनाने हेतू शालिकराम लिचडे, अशोक इटानकर, मोहन रामटेक्कर, ओंकार लिचडे, मुकेश हलमारे,  शीला इटानकर, प्राजक्ता रणदीवे, अर्चना तिडके, गीता दहिकर, साधना मुरकुटे, हर्षा आष्टीकर, चेतना रामटेक्कर, चंंद्रशेखर लिचडे,लालचंद भांडारकर,वशिष्ठ खोब्रागडे,रेखा कावळे, राजेश पेशने,दिलीप हजारे, श्याम लिचडे,मनेज भांडारकर, वीना सोनवाने,ज्योती किरनापुरे, मनिष ठवरे, रोशन दहिकर, देवानंद भांडारकर,सचिन भांडारकर,शिवाजी सोनवाने,उल्हास सोनवाने, राजकुमार पेशने, सचिन पालांदूरकर, राजकूमार पेशने, पुरुषोत्तम भदाडे, अतुल खोब्रागडे,मनोज किरनापुरे, संजय मुरकुटे आदी ने सहकार्य किया।

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...