Tuesday, 30 July 2019

देवरीच्या नगरसेवकानीं राष्ट्रवादीला ठोकला रामराम

देवरी,दि.30 - गोंदिया जिल्ह्यात भाजपमधील इनकमिगला सध्या चांगलेच सुगीचे दिवस आले असल्याचे चित्र आहे. परिणामी राष्ट्रवादीला दररोज जोरदार हादरे बसत आहेत. याच कळीचा एक भाग म्हणजे राज्याचे राज्यमंत्री डॉ. परिणय फुके हे देवरीच्या दौऱ्यावर असताना मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी स्वपक्षाला रामराम ठोकून आपल्या समर्थकांसह भाजप प्रवेश केला.
 देवरीत झालेल्या पक्षांतर सोहळ्यात देवरी नगर पंचायतीतील राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या बहुतांश नगर सेवकांनी राज्यमंत्री परीणय फुके यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या नगरसेवकांच्या जोडीला भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या काही कार्यकर्त्यांची घरवापसी सुद्धा झाली आहे. पक्ष बदल करणाऱ्या नगरसेवकांमध्ये रितेश अग्रवाल, माया निर्वाण, दविंदरकौर भाटिया,सीमा रंगारी, हेमलता कुंभारे यांचा समावेश आहे. याशिवाय बंटी भाटिया, संजय दरवडे, अंजली दरवडे, भास्कर धरमसहारे, नितेश वालोदे, प्रकाश परिहार, गणेशसिंग गहेरवार, अंतरिक्ष बहेकार यांनी सुद्धा रामराम ठोकला आहे. येणाऱ्या काळात किती जणांचे शुद्धीकरण करण्यात भाजपच्या नेतृत्वाला यश येईल, हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. या हादऱ्यांमुळे देवरी तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस समोर मात्र मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
यावेळी आमदार संजय पुराम, महामंत्री वीरेंद्र अंजनकर, तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार आणि महेश जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुपलीपार येथे तुटलेल्या वीज तारांमुळे बैलजोडी दगावली.

आमगाव.दि.30 - आमगाव तालुक्यातील सुपलीपार येथे विजेचे तार तुटून  रस्यावर पडल्याने दौन बैल  मृत्यू पावल्याची घटना आज मंगळवारी (दि.30) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर असे की, आज सकाळी साडेसहा वाजता सुपलीपार येथील शेतकरी संतोष नारायण मेंढे हे आपल्या शेतात धान पऱ्ह्याची रोवणी करण्यासाठी निघाले होते. त्यांनी आपल्या मालकीची बैलजोडी सोबत चिखलणीच्या कामासाठी घेतली होती. मात्र, शेतात जाणाऱ्या रस्त्यावरून विज वितरण कंपनीच्या वीज वाहिनीचे तार तुटून पडले असल्याने श्री मेंढे यांची बैलजोडी त्या ताराच्या संपर्कात आली . परिणामी, दोन्ही बैल जागीच गतप्राण झाले. सुदैवाने मानवहानी झाली आहे. या घटनेमुळे श्री मेंढे यांचे 50 हजाराचे नुकसान तर झालेच मात्र ऐन शेतीच्या मशागतीच्या काळात त्यांची बैलजोडी दगावल्याने मेंढे कुटुंबीयांवर शेती करण्याचे संकट ओढवले आहे.
वीज वितरण कंपनीचे गलथान कारभार ही नित्याचीच बाब बनली आहे. अभियंते आणि वीज तांत्रिक कर्मचारी हे नेहमी गैरजबाबदारीने वागत असल्याने असे अपघात घडत असतात. त्यामुळे या प्रकरणातील दोषी अभियंत्यावर सुद्धा कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, मेंढे या शेतकऱ्याचे ऐन कामाच्या दिवसात नुकसान झाल्याचे त्याची भरपाई विज वितरण कंपनीने करावी, अशी संतप्त मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


Monday, 29 July 2019

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन


हैदराबाद, (दि.29) - माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन झाले आहे. हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे त्यांची दोन मुले आणि एक मुलगी असे कुटुंब आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. 
गेल्या काही दिवसांपासून त्यांना न्युमोनिया त्रास होऊ लागला होता. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती जास्तच बिघडली. त्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते मात्र ते अयशस्वी ठरले. जयपाल रेड्डी यांचा जन्म १६ जानेवारी १९४२ रोजी तेलंगण येथील माडगूळ गावात झाला होता. एक धडाडीचे काँग्रेस कार्यकर्ते म्हणून त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली. मात्र १९७५ मध्ये जेव्हा आणीबाणी लागू झाली तेव्हा त्यांनी काँग्रेस विरोधात बंड पुकारले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि जनता दलात गेले. १९८५ ते १९८८ हा काळ ते जनता दलाचे सरचिटणीस होते. मात्र ९0 च्या दशकात ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. माजी पंतप्रधान आय. के. गुजराल यांच्या कार्यकाळात ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते. तर मनमोहन सिंग सरकारच्या काळात त्यांच्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार देऊन त्यांना १९९८ मध्ये सन्मानित करण्यात आले होते.

देवरीत मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

देवरी,दि.29- स्थानिक मनोहरभाई पटेल हायस्कूल परिसरात राहणाऱ्या एका 12 वर्षीय मुलीच्या तिच्या राहत्या घराजवळून अपहरण करण्याचा प्रयत्न काल रविवारी (दि.28) सकाळी साडे दहाच्या सुमारास करण्यात आला. मात्र, मुलीने प्रसंगावधान दाखवत स्वतःची सुटका करून घेतली.
सविस्तर असे की, काल सकाळी साडे दहाच्या सुमारास दोन  अज्ञात युवक तोंडावर फडके बांधून मोटार सायकलने मनोहरभाई पटेल हायस्कूलच्या मागील परिसरात आहे.  तेथे आपल्या घराजवळ असलेल्या एका 12 वर्षीय मुलीला बळजबरीने उचलून आपल्या दुचाकीवर बसविले आणि चिचगड मार्गावरून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. मात्र, परसटोला येथील नवविभागाच्या नाक्याजवळ पोचताच मुलीने प्रसंगावधान राखून एका युवकाच्या हाताचा चावा घेत स्वतःची सुटका करवून घेतली. सुटका होताच मुलीने परसटोला येथील आपल्या मैत्रीच्या घरी त्या पिडीत मुलीने आसरा घेवून आपल्या पालकांनी या घटनेची सूचना दिली. वडील आणि आजी पोचल्यावर सदर मुलीने तिच्या जवळील मोबाईलचे सीम  आणि इतर साहित्य हिसकावून झुडूपात फेकल्याचे सांगितले. या घटनेची तक्रार देवरी पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

शहीद पतीच्या स्वप्नपूर्तीसाठी कनिका राणे सैन्यदलात जाणार



सैन्य भरतीसाठी आवश्यक सर्व परीक्षा अव्वल गुणांनी उत्तीर्ण
Salute to the heroine! Pass the exam with top marks in the military to fulfill the dream of the martyr's husband kaustubh rane | वीरपत्नीला 'सॅल्यूट'! शहीद पतीच्या स्वप्नपूर्तीसाठी सैन्यदलात, अव्वल गुणांसह परीक्षा उत्तीर्णठाणे,दि.29 - दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका राणे यांनी सैन्यदलात भरती होण्याचा निर्णय घेतला आहे. उल्लेखनीय म्हणजे पतीला वीरमरण प्राप्त होऊन एक वर्षही होण्यापूर्वी कनिका यांनी सैन्यदलात भरती होण्यासाठीच्या परीक्षाही अव्वल गुण घेत पास केल्या आहेत. 
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या या सुपुत्राला वीरमरण आले होते. भारतीय सैन्याच्या 36 रायफल बटालियनमध्ये राणे मेजर म्हणून कार्यरत होते. 7 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी दहशतवाद्यांशी लढताना या भूमिपुत्राने देशासाठी बलिदान दिले.  आता, पुन्हा एकदा राणे कुटुबीयांचा आणि शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नीचा देशाला अभिमान वाटणार आहे. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना जाऊन अजून वर्षही झालं नाही. येत्या 7 ऑगस्टला त्या घटनेला एक वर्ष होईल. पतीच्या निधनाला एक वर्ष होण्याआधीच त्यांच्या अकाली निघून जाण्याच्या धक्क्यातून, दुःखातून स्वतःला सावरत, एका छोट्या मुलाचा सांभाळ करत शहीद मेजर राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्या पुढील ट्रेनिंगसाठी चेन्नईला जाणार आहेत. एक पती म्हणून कनिका राणे यांच्या जगण्याचा खंबीर आधार असणाऱ्या शहीद मेजर राणे यांच्या वीरमरणानंतर स्वतःला सावरणं, त्यातही पुन्हा स्वतः सैन्यात जाण्याचा निर्णय घेणं, त्यासाठी आवश्यक त्या परीक्षांची तयारी करणं, त्यातही अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होणं आणि भरती होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वर्षभराच्या ट्रेनिंगसाठी चेन्नई येथे जायला सज्ज होणं हे कनिका राणे यांचे निर्णय अजोड ध्येयवादाची साक्ष देणारे आहेत. 
देशासाठी सैन्य दलात भरती होण्याची लहानपणा पासुनच आवड होती. कौस्तुभला देशासाठी अजुन खुप काही करायचे होते. त्याचे स्वप्न लष्करात जाऊन मी पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे असं कनिका म्हणाल्या . आपलं लहान मुल आणि पत्नी मागे असताना देखील कौस्तुभने आधी देशाचा विचार केला. आपल्या वडिलांनी देशासाठी सैन्यात दाखल होऊन जे केले ते लहानगा अगस्त्य पाहु शकला नाही. पण आपली आई देशासाठी सैन्यात दाखल होऊन काय करतेय हे तो प्रत्यक्ष पाहिल तेव्हा त्याला सैनिक काय हे कळेल असं कनिका म्हणाल्या.

Sunday, 28 July 2019

मैत्रैय ग्रूपच्या पिडीतींना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना स्थापन

गोंदिया : मैत्रेय समूहाने गोंदिया जिल्ह्यात देखील जाळे विणले होते. उत्तम लाभाची हमी देत असल्यामुळे जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांनी सुमारे १० कोटी रुपये या समुहात गुंतविले. मात्र मैत्रेय समूहाने त्या पैशांची परतफेड केली नाही. शासन स्तरावर लढा लढून गुंतवणूकदारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्याकरिता संघटन तयार करण्यात आले आहे. 
संघटनेचे संयोजक म्हणून अमृत इंगळे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. नुकतीच गुंतवणूकदार आणि एजंट यांची सभा नूतन शाळेत घेण्यात आली. या समितीत ११ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. हर्षा ब्राम्हणकर, पुष्पा लेडे, गीता सलाम, अजिंता ब्राम्हणकर, वनमाला डहाके, अशोक कावळे आदी यावेळी उपस्थित होते. सभेत संघटनेच्या अध्यक्षपती हर्षा ब्राम्हणकर, सचिव गीता सलाम यांची निवड करण्यात आली. ज्या गुंतवणुकदारांचे पैसे अडकले आहेत, त्यांनी अमृत इंगळे, हर्षा ब्राम्हणकर, गीता सलाम यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांच्याशी पैसे परत मिळवून देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली असून श्री केसरकर यांनी यासंबंधी लवकरच गुंतवणुकदारांच्या बाजूने निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती अमृत इंगळे यांनी दिली. 
नांदेड,दि.28 -  वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत विविध योजना कार्यान्वित करून लागवड मोहीम सुरू करण्यात आली आहे.  वृक्षसंवर्धन व संगोपन परिवारातर्फे एक व्यक्ती एक झाड, एक विद्यार्थी झाड मोहीम हाती घेण्यात आले आहेत.
आज रविवारी (दि.28) गोदावरी नदी काठावर महापौर दीक्षा धबाले, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, उपमहापौर सतीश देशमुख, गुरुद्वारा लंगर साहेबचे अमरजीत
सिंग, तहसीलदार किरण आंबेकर, प्रभाग क्रमांक 19 चे नगरसेवक चित्रा सिद्धार्थ गायकवाड, मोरे दिपाली संतोष, गोरे शांता संभाजी, काळे राजू गोविंद, मनपाचे उपायुक्त विलास भोसीकर, सुधीर इंगोले, उद्यान अधीक्षक मिर्जा फरहतुला बेग, नांदेड नेचर क्लब चे अतींद्र कट्टी, वृक्षसंवर्धन व संगोपन परिवाराचे कैलास अमिलकंठवार, संतोष मुगटकर, केदार जाधव, किशन देशमुख, उमेश गोरकर, रामानंद तीर्थ विद्यापीठाचे उद्यान अधीक्षक भराडीया, इत्यादी सह 200 वृक्षमित्र अधिकारी पदाधिकारी व मान्यवर यांच्या उपस्थितीत गोदावरी नदीकाठावरील 10 हजार वृक्ष लागवडीचा प्रस्तावित वृक्षारोपण कार्यक्रमांपैकी आज 5 हजार वृक्ष लागवड करण्यात आली. नांदेड शहरात मागील काळात 46 अंश सेल्सिअस तापमान नोंद झाली होती त्यावर गंभीर दखल घेत विविध संस्था नांदेड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम घेऊन वृक्षसंवर्धन कामात सहकार्य करत आहेत. या अगोदरही इंदिरा गांधी मैदान, रामनगर, विविध रस्त्यांच्या कडेला, मैदानात 3 हजार वृक्ष लागवड करण्यात आली.

सत्ता निरंकुश होऊ न देण्याची भूमिका माध्यमांनी जबाबदारीने पार पाडावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यंदापासून अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार सुरु करीत असल्याची घोषणा

ज्येष्ठ निवृत्त पत्रकार सन्मान योजनेचा शुभारंभ

विविध पत्रकारिता पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

मुंबई -  सत्ता निरंकुश होऊ नये, माध्यमांनी सजग राहणे गरजेचे आहे. आपली भूमिका त्यांनी जबादारीने पार पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.27) येथे केले. यावेळी मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या हस्ते  विविध पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
राष्ट्रीयस्तरावर पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रीयन पत्रकाराना यंदापासून अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

रमेश पतंगे, पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

या कार्यक्रमात २०१७ आणि २०१८ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे आणि ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी प्रदान केला. प्रत्येकी 1 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. २०१६ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार दै. हितवादचे संपादक विजय फणशीकर यांना जाहीर झाला आहे. त्यांनी व्हीडीओ संदेशाद्वारे कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. 
पत्रकारितेच्या क्षेत्रात उच्च दर्जाची कामगिरी केलेल्या राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या प्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु करण्यात आली आहे. काही ज्येष्ठ पत्रकारांना धनादेशाचे वितरण करुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेचा शुभारंभ केला.
श्री फडणवीस म्हणाले की, शासकीय व्यवस्था शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविणे, सर्वसामान्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविणे यासोबतच समाजप्रबोधनाच्या कार्यात माध्यमांनी मोठे योगदान दिले आहे. पण आता माध्यमांचा संक्रमण काळ सुरु आहे. मुद्रित माध्यमांपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आता इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल माध्यमांपर्यंत झाला आहे. या संक्रमणावस्थेतही माध्यमांनी आपली मूल्ये कायम जपली पाहिजे. बातम्यांद्वारे अफवा पसरल्यास त्यातून समाजस्वास्थ्य बिघडते. त्यामुळे अशा संक्रमणाच्या काळात मूल्याधिष्ठीत पत्रकारिता करुन माध्यमांनी विश्वासार्हता जपावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.

पत्रकार सन्मान योजना सुरु झाल्याचा मनस्वी आनंद

तथ्य नसलेल्या बातम्यांचा खुलासा शासकीय यंत्रणेने तत्काळ करावा, यासाठी आपण सतत आग्रही राहिलो. त्याचप्रमाणे तपशील खरा असेल तर अशा बातम्यांची दखल घेऊन त्याप्रमाणे कार्यशैलीत बदल करण्याच्या सूचनाही आपण संबंधित विभागास वेळोवेळी केल्या. निर्णय घेताना अशा बातम्यांचा नेहमीच सकारात्मक उपयोग झाला, असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. पत्रकार हे दबावात काम करता कामा नयेत. पत्रकारांना सामाजिक सुरक्षाही असली पाहिजे. या भावनेतूनच शासनाने निवृत्त पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु केली. आज या योजनेची प्रत्यक्षात सुरुवात करताना मनस्वी आनंद होत आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचालक (माहिती) सुरेश वांदिले यांनी आभार मानले. 

पत्रकारिता पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस

दरम्यान, पुरस्कार मिळालेले पत्रकार कांचन श्रीवास्तव आणि राजकुमार सिंह यांनी आपल्या पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस देत असल्याची घोषणा केली. त्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले.    

वर्षा फडके – आंधळे, डॉ. किरण मोघे, डॉ. सुरेखा मुळे यांना शासकीय गटातील पुरस्कार प्रदान

माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना दिला जाणारा शासकीय गटातील  २०१६, २०१७ आणि २०१८ साठीचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार (राज्यस्तर) अनुक्रमे मंत्रालयातील वरिष्ठ सहायक संचालक वर्षा फडके – आंधळे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे आणि मंत्रालयातील विभागीय संपर्क अधिकारी डॉ. सुरेखा मधुकर मुळे यांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

तसेच छायाचित्रकारांना देण्यात येणारा २०१६, २०१७ आणि २०१८ साठीचा शासकीय गटातील केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील छायाचित्रकार प्रज्ञेश कांबळी, अमरावती येथील छायाचित्रकार मनीष झिमटे आणि अमरावती विभागीय माहिती कार्यालयातील चंद्रकांत आनंदराव पाटील यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

विविध पत्रकारिता पुरस्कारांचे झाले वितरण

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते विविध पत्रकारिता पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. पुरस्कारार्थी आणि त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे     - 

वर्ष 2016 चे पुरस्कार –

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर), राजेश जोष्ठे, दै. पुढारी, रत्नागिरी.

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) - कांचन श्रीवास्तव, विशेष प्रतिनिधी, डीएनए, मुंबई

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) - विजयकुमार सिंह (कौशिक), मुख्य संवाददाता, दै. भास्कर, मुंबई

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) - महंमद अब्दुल मुख्तार (आबेद), प्रतिनिधी, दै. गोदावरी ऑब्झर्वर, नांदेड

पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) कपिल श्यामकुंवर प्रतिनिधी, एबीपी माझा, यवतमाळ

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) शैलेश जाधव, छायाचित्रकार, दै. महाराष्ट्र टाइम्स, मुंबई

सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) प्रफुल्ल सुतार, ई - सकाळ, कोल्हापूर

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) विशाल कदम, शहर प्रतिनिधी, दै. तरूण भारत, सातारा.

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग- सूर्यकांत नेटके, बातमीदार, दै. सकाळ, अहमदनगर-(51 हजार रुपये मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)

अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) डॉ. सीतम सोनवणे, उपसंपादक,  दै. लोकमत, लातूर

आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग -मारूती कंदले, प्रतिनिधी, ॲग्रोवन, मुंबई

नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग - ज्ञानेश्वर बिजले, प्रतिनिधी, दै. सकाळ, पुणे

शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग - माधव डोळे, ब्युरोचीफ, दै. सामना, ठाणे

ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग - संजय वालावलकर, प्रतिनिधी, दै. पुढारी, सिंधुदूर्ग

लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग - अनुप गाडगे, प्रतिनिधी, दै. दिव्य मराठी, अमरावती

ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग - मंगेश राऊत, वरिष्ठ वार्ताहर, दै. लोकसत्ता, नागपूर

वर्ष 2017 चे पुरस्कार - 

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) -लुमाकांत नलवडे, बातमीदार दै. सकाळ, कोल्हापूर

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) - मनीष सोनी, विशेष प्रतिनिधी, दै. हितवाद, नागपूर

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार(हिंदी) (राज्यस्तर) - राजकुमार सिंह, मुख्य प्रतिनिधी, दै. नवभारत टाइम्स, मुंबई

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर) - खान कुतुबुद्दिन अब्दुल माजीद, दै. इन्कलाब, मुंबई

पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) - कन्हैय्या खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) - दत्तात्रय खेडेकर, छायाचित्रकार, दै. लोकमत, मुंबई

सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) - संतोष आंधळे, वरिष्ठ संपादक, माय मेडिकल मंत्रा, मुंबई

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) - मल्लिकार्जुन सोनवणे, दै. यशवंत, उस्मानाबाद

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग - अमोल पाटील, वार्ताहर, दै. दिव्य मराठी , धुळे - 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, व्यतिरिक्त रुपये 10 हजारदै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)

अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) - जितेंद्र विसपुते, उपसंपादक, दै. पुढारी औरंगाबाद

आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग - जमीर काझी, वरिष्ठ बातमीदार, दै. लोकमत, मुंबई

नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग - प्रमोद बोडके, बातमीदार, दै. सकाळ, सोलापूर

शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग - जान्हवी पाटील, वार्ताहर, दै. तरूण भारत, रत्नागिरी

ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग - अभिजीत डाके, जिल्हा प्रतिनिधी, दै. ॲग्रोवन, सांगली

लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग- अनिल माहोरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. पुण्यनगरी, अकोला

ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग - खेमेंद्र कटरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. महाराष्ट्र टाइम्स,गोंदिया

वर्ष २०१८ चे पुरस्कार - 

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार – पत्रकार यमाजी मालकर

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) -  श्री. हरी  रामकृष्ण तुगांवकर, दै. सकाळ

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) - श्री. दिनेश गणपतराव मुडे, दै. लोकमत समाचार

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) -  श्री. मोहम्मद नकी मोहम्मद तकी, दै. वरक – ए - ताजा

पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) - श्री. महेश घनश्याम तिवारी, न्यूज 18 लोकमत

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) - श्री. प्रशांत सोमनाथ खरोटे, दै. लोकमत

सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) -श्री. अनिकेत बाळकृष्ण कोनकर, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) - श्री. प्रवीण श्रीराम लोणकर, दै. महाराष्ट्र टाईम्स

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग - श्री. विजय बाबूराव निपाणेकर, मुक्त पत्रकार (या पुरस्कारामध्ये शासनाच्या रकमेव्यतिरिक्त दै. गावकरीने १० हजार रुपये पुरस्कृत केले आहेत)  

आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग - श्री. संजय कृष्णा बापट, दै. लोकसत्ता
नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग  - श्री. मोहन मारूती मस्कर – पाटील, दै. पुण्यनगरी
शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग - श्री. भगवान आत्माराम मंडलिक, दै. लोकसत्ता
ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग - श्रीमती इंदुमती गणेश (सूर्यवंशी),  दै. लोकमत
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग - श्री. गोपाल जगन्नाथराव हागे, दै. सकाळ ॲग्रोवन
ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग - श्री. योगेश प्रकाश पांडे, दै. लोकमत

महाराष्ट्र माझा शेतकरी राजा लघुचित्रपट स्पर्धा 2016 -
प्रथम पारितोषिक आनंद पगारे (नाशिक), द्वितीय रोहित कांबळे (कोल्हापूर), तृतीय शशिकांत सुतार (कोल्हापूर)
उत्तेजनार्थ - महेश ढाकणे (औरंगाबाद), किसन हासे (अहमदनगर), मिलींद पानसरे (पुणे)

महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा 2017 -  
प्रथम वेदांत कुलकर्णी (कोल्हापूर), द्वितीय दीपक कुंभार (कोल्हापूर), तृतीय अंशुमन पोयरेकर (मुंबई)
उत्तेजनार्थ - प्रशांत खरोटे (नाशिक), राजेद्र धाराशिवकर (उस्मानाबाद), सुनिल बोर्डे (बुलढाणा), उमेश निकम (पुणे), सुशिल कदम (नवी मुंबई)

महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा २०१८ – 

प्रथम क्रमांक आनंद बोरा (नाशिक), द्वितीय क्रमांक कृष्णा मासलकर (कोल्हापूर), तृतीय क्रमांक राहूल गुलाणे
उत्तेजनार्थ - सचिन वैद्य(मुंबई), विरेंद्र धुरी(मुंबई), प्रशांत खरोटे (नाशिक), दीपक कुंभार (कोल्हापूर), गोपाल बोरकर (हिंगोली)

आदिवासी तरुणांचा नक्षलविरोधात एल्गार



नक्षल बॅनरची होळी करत नक्षलवाद मुर्दाबादच्या दिल्या घोषणा

  गडचिरोली,दि.28 -  उपविभाग पेंढरी अंतर्गत येणाऱ्या पोमके जारावंडी हद्दीतील मौजा जारावंडी ते मौजा कासनसुर रोडवर ताडगुडा फाट्याजवळ नक्षलवाद्यांनी नक्षल सप्ताह पाळण्यासाठी बॅनर लावले होते. मौजा ताडगुडा व मौजा कसुरवाही येथील आदिवासी तरुणांनी एकत्र येत नक्षलवाद्यांनी लावलेले बॅनर काढून त्याची होळी केली.
  यावेळी उपस्थित तरुणांनी नक्षलवाद मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्याचबरोबर नक्षलवाद्यांनी सप्ताह पाळण्याच्या केलेल्या आवाहनाला विरोध असल्याचे तरुणांनी सांगितले.आपल्या आदिवासी बांधवावर नक्षलवादी सप्ताहाच्या नावाखाली अनन्वित अत्याचार करत असल्याचे सांगत यापुढे आदिवासी तरुण हे खपवून घेणार नाही असे तरुणांनी स्पष्ट केले.
 गडचिरोली पोलीस दलाने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून २८ जुलै ते ३ ऑगस्ट रोजी 'आदिवासी विकास सप्ताह' साजरा करण्याचे घोषित केले आहे. यामध्ये तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन, युवकांची खेळाची आवड लक्षात घेऊन त्याबाबत पाठपुरावा त्याचबरोबर आदिवासी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वोतोपरी मदत करणार आहे. नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या नक्षल सप्ताहाला न जुमानता अनेक आदिवासी तरुणांनी  घराबाहेर पडून आपल्या व आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन गडचिरोली पोलिस दल ठिकठिकाणी राबवित असलेल्या 'आदिवासी विकास सप्ताहात' सामील व्हावे, असे आवाहन मा.पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

डव्वा नजिक ट्रॅक्टर पुलावरून कोसळून चार जण ठार



गोंदिया,दि.28 : सडक-अर्जुनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या  डव्वा असलेल्या पुलावरून ट्रॅक्टर पडून चार मजुरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी सकाळी 9 वाजता घडली.

 मजूर घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टरला मागून दुसर्‍या ट्रॅक्टरने धडक दिल्याने समोरचा ट्रॅक्टर पुलाखाली पडला. सदर घटनेची माहिती मिळताच  आमदार राजकुमार बडोले  यांनी पोलीस अधिकारी व आरोग्य अधिकारी  यांच्याशी संपर्क साधून तपास यंत्रणा व रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पाठविण्याचे निर्देश दिले.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत एक लाख रुपये आणि जखमी व्यक्तींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा आमदार राजकुमार बडोले यांनी केली.

भूगावजवळ धावत्या शिवशाहीने पेट घेतला


अमरावती : अमरावतीहून परतवाड्याकडे येणाऱ्या शिवशाही बसने भूगावनजीक पेट घेतला. शुक्रवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

 शिवशाहीमधील अग्निशमनचे सिलिंडर निरुपयोगी ठरल्याने प्रवासी व चालकाने माती टाकून आग विझविली. या घटनेत ३५ प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.
परतवाडा आगाराची बस क्रमांक एम.एच. ०९- ईएम १६३३ क्रमांकाची शिवशाही बस दुपारी साडेतीच्या सुमारास ३५ प्रवासी घेऊन अमरावतीहून परतवाड्यासाठी निघाली. भूगावनजीक ती चार वाजताच्या सुमारास अचानक बंद पडली. चालकाने बस सुरू करण्याचा प्रयत्न करताच स्टेअरिंग जवळून धूर व आगीच्या ज्वाळा निघायला सुर
वात झाली. हा प्रकार पाहून चालक एम.बी. तायडे यांनी तत्काळ सर्व प्रवाशांना बाहेर काढले आणि शिवशाहीतील अग्निशमनचे सिलिंडर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न निष्फळ ठरला. प्रवासी व चालकांनी समयसूचकता ठेवत रस्त्याच्या कडेला असलेली माती टाकून पेटती गाडी विझवण्यासाठी केलेला. हा प्रयत्न यशस्वी ठरला. परतवाडा-अमरावती मार्गावर परिवहन महामंडळाच्या बस दर १० ते १५ मिनिटांच्या अंतराने धावतात. पेट घेतलेल्या शिवशाही बसपुढून दहा मिनिटांत तीन बसेस गेल्या. त्यातील दोन बसेसमध्ये अग्निशमन सिलिंडर नव्हते. तिसरी बस आली त्यात सिलिंडर होते. मात्र तोवर आग आटोक्यात आली होती. अचलपूर तालुक्यातील देवगावचे सरपंच गजानन येवले, उपसरपंच सोनूजी खडके हे या बसमधून प्रवास करीत होते. त्यांनीही आग विझवण्यास मदत केली.

Saturday, 27 July 2019

३0 वाहनचालकांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित


नागपूर, दि.27 -मद्यप्राशन करून वाहन चालविणार्‍या ३0 वाहनचालकांचे परवाने सहा महिन्यांसाठी निंलबित करण्यात आले. त्याचप्रमाणे एका वाहनचालकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश मोटर वाहन न्यायालयाचे न्यायाधीश शहजाद परवेज यांनी दिले आहेत. 
अपघातात निष्पाप लोकांचा बळी जातो. त्यात बहुतांश वाहनचालक हे मद्यप्राशन करून वाहन चालवित असल्याचे दिसून आले. मद्यपी वाहनचालकांवर जास्तीतजास्त कारवाई करून त्यांच्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक होते. या वाहनचालकांना शोधण्यासाठी विशेष कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त गुन्हे करणार्‍यांना शोधणे सुलभ झाले आहे. या वाहनचालकांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना यापूर्वीही त्यांच्यावर कारवाई झाल्याचे पुराव्यासह न्यायालयाच्या लक्षात आणून देण्यात येत आहे. 
सीताबर्डी वाहतूक शाखेतर्फे नियमितपणे विशेष मोहीम राबवून मद्यपी वाहनचालकांची धरपकड करण्यात आली. त्यावेळी या मद्यपींनी यापूर्वी केलेले गुन्हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायाधीश शहजाद परवेज यांनी यातील ४ मद्यपी वाहनचालकांना ५ हजाराचा दंड ठोठावून एका वाहनचालकाचा परवाना ६ महिन्यांसाठी निलंबित करून त्याला कोर्ट उठेपयर्ंत शिक्षा सुनावली. यानंतरही हा वाहनचालक मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळल्यास नेहमीसाठी त्याचा परवाना रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 
तर कायमस्वरूपी परवाना रद्द
शहरातील ३0 मद्यपींचा परवाना पुढील सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. चारपेक्षा जास्त वेळ एखाद्या मद्यपी मद्यप्राशन करून वाहन चालविताना मिळून आल्यास त्याचा कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याचे आदेश न्यायाधीश परवेज यांनी दिले.

जळीत मूर्तीचे विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापित करणार- खासदार सुनील मेंढे

लोकप्रतिनिधींची पाऊले पडती प्रतापगडावर

प्रशासनही पोचले महादेवाचे द्वारी


अर्जूनीमोर,दि.27 - हिंदू धर्मियांचे आराध्य आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील प्रतापगडावरील भव्य शंकराच्या मूर्तीवर वज्रापात होऊन मूर्ती जळाल्याची घटना काल शुक्रवारी निदर्शनात आली होती. परिणामी, प्रतापगडावर लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या भेटींचे प्रमाण वाढले आहे. गोंदिया-भंडाराचे खासदार सुनील मेंढे यांनी सुद्धा येथे आज भेट देऊन जळीत मूर्तीचे विसर्जन करून लवकरच त्याठिकाणी नवीन मूर्ती स्थापित करण्याचे आश्वासन उपस्थित भाविकांसह पत्रकारांनी दिले आहे.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना खासदार मेंढे यांनी पुढे सांगितले की, जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या फंडातून 20 लाख आणि खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लाख असे एकूण 30 लाखाचा निधी या कार्यासाठी खर्च करण्याच येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी तेथे उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्याकडून या प्रकोपाची माहिती खासदार महोदयांनी जाणून घेतली.  सोबतच्या त्यांनी महादेवांच्या भाविकांसह तेथे उपस्थित नागरिकांनी शांतता आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा केले.
यावेळी प्रतापगडावर गोंदियाच्या जिल्ह्याधिकारी कांदबरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षर मंगेश शिंदे, देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांच ढोले, उपविभागीय अधिकारी उषा चौधरी, जि.प. सदस्य रचना गहाणे, भाजपचे तालुका महामंत्री भोजराम लोगडे, लायकराम भेंडारकर, तहसीलदार विनोद मेश्राम, ठाणेदार महादेव तोंडले. केशोरीचे ठाणेदार दीपक जाधव, सरपंच अहिल्या वालदे यांचे सह अनेक अधिकारी-पदाधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते.

धोबीसराड येथे राहत्या घरासह गुरांचा गोठा आगीत स्वाहा

देवरी,दि.27- येथून नजीक असलेल्या धोबीसराड येथे काल शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागून राहत्या घरासह गुरांचा गोठा आगीत भस्मसात झाल्याची घटना घडली. या अग्निकांडामुळे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सविस्तर असे की, धोबीसराड येथील रहिवासी असलेले लखन राऊत यांच्या राहत्या घराला सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता राहत्या घरासह गुरांचा गोठा सुद्धा जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सचिव निलेश वालोदे यांनी घटनस्थळी धाव घेत लोकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी श्री वालोदे यांनी राउत या पिडीताला शासनाने सहकार्य करण्याची मागणी सुद्धा केली आहे.
या आगीत राऊत यांच्या घरातील सर्व साहित्य, दागिने आणि अन्नधान्यासह रोख 40 हजार रुपये असे एकूण 1 लाख 56 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अग्निकांडाचे बळी ठरलेल्या कुटुंबीयांची आमदार संजय पुराम यांनी भेट घेऊन दोन हजार रुपयाची मदत केली. यावेळी प्रशासनाच्या वतीने देवरीचे तहसीलदार विजय बोरूडे यांनी  राऊत कुटुंबीयांनी 15-15 किलो गहू तांदळासह डाळ, साखर आणि 5 हजार रोख अशी मदत केली.

चक्क शालेय विद्यार्थीच झाले गावचे कारभारी...!

देवरी तालुक्यातील ओवारा ग्राम पंचायतीचा अभिनव उपक्रम

सुरेश भदाडे

देवरी,दि.27-  अतिदुर्गम आणि मागास म्हणून गणल्या जाणाऱ्या देवरी तालुक्यातील ओवारा येथील ग्राम पंचायतीचा कारभार हाकण्यासाठी चक्क शालेय विद्यार्थी हेच एक दिवसाचे कारभारी झाले. अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राज्यातील पहिला असावा, असे मत उपसरपंच कमल येरणे यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागाचा कारभार हाकण्याची जबाबदारी ही त्या गावच्या ग्रामपंचायतीवर असते. यासाठी लोकशाही पद्धतीने निवडणुक घेऊन निवडणुक आयोग लोकप्रतिनिधींची निवड करीत असते. या लोकप्रतिनिधींवर गावकऱ्यांना विचारात घेऊन गावाचा विकास करावयाची जबाबदारी असते. मात्र, स्थानिक राजकारणामुळे या लोकनियुक्त प्रतिनिधींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्या राज्यघटनेत ग्रामसभांना अनन्यसाधारण महत्त आहे. गावाच्या विकासाचा आराखडा हा लोकांच्या सहमतीने ग्रामसभेत मंजूर करावयाचा असतो. मात्र, आज देखील ग्रामीण भागात अशा ग्रामसभांना लोकांची उपस्थिती नगण्य असते. यामध्ये सुधार करण्याची गरज असल्याचे मत ओवारा येथील उपसरपंच कमल यांनी व्यक्त केली.
यासाठी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना  हा अनुभव येण्यासाठी गावचे सरपंच हिरामण टेकाम यांचे सह सर्व सदस्यांनी प्रस्ताव पारीत करून एक दिवसाचा कारभार हा शालेय विद्यार्थ्यांना सोपवून त्यांच्यामध्ये ग्राम विकासाची जाणीव निर्माण करून विकास कामात येणाऱ्या अडचणींची जाणीव निर्माण करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला..
हा निर्णय अमलात आणण्यापूर्वी शाळेत लोकशाही पद्धतीने निवडणुक घेण्यात आली. यामध्ये महिलांसाठी सुद्धा 50 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत सरपंच म्हणून निलेश कोडवते, उपसरंपच म्हणून साक्षी बिसेन या निवडून आल्या. इतर सदस्यामध्ये प्रेरणा मेश्राम, सोनल खरवडे, प्रशांत गजभिये, दिनेश तुरकर, मनिषा भिमटे,संध्या टेकाम, सोहीत ऊईके आणि दुर्गा बिसेन विजयी झाले.
या नवनियुक्त शालेय गावपुढाऱ्यांनी 24 जुलै रोजी एक दिवस ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळला. सरपंच निलेश कोडवते, उपसरपंच साक्षी बिसेन यांनी सर्व सदस्यांसह गावाची संपूर्ण पाहणी केली. यानंतर झालेल्या सभेत गावातील समस्यांवर गंभीर चर्चा करण्यात आली. या सभेच पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, ग्रामीणांचे आरोग्य, रस्ते विकास, सांडपाण्याची विल्हेवाट, गटारे आदी विषयांवर अनेक प्रस्ताव पारित केले.
गावचे सरपंच टेकाम आणि उपसरपंच येरणे यांनी एकदिवसाच्या कार्यकारिणीने गाव विकासासंबंधी घेतलेले निर्णयांवर अमलबजावणी करण्याचे आश्वासन समस्त ओवारा वासियांना दिले. या अभिनव उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

मनोहरभाई पटेल महाविद्यालयात विजय दिवस साजरा

देवरी,दि.27 -  गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे  काल शुक्रवारी (दि.26) कारगील विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण झिंगरे हे होते. यावेळी प्रा, वर्षा गंगणे, प्रा.देवेंद्र बिसेन, प्राच जे पी चव्हाण, प्रा. उमेश चव्हाण ,डॉ. अभिनंदन पाखमोडे, प्रा. शुभांगी मुनघाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कारगील विजयाच्या 1999 सालच्या घटनेला उजाळा देत प्रा. झिंगरे यांनी विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी जसवंतसिंह यांच्या शौर्याचा इतिहास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. यावेळी कारगील शहिदांनी श्रध्दांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे संचलन आणि उपस्थितांचे आभार डॉ. गंगणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रमोद जांभूळकर, राहूल जांभूळकर, अपूर्वा नेवारे, प्राची महोबीया, मुकेश शर्मा, गायत्री गुप्ता आदींनी सहकार्य केले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जहाज बुडताना पहिल्यांदा उंदीर उड्या मारतात - हसन मुश्रीफ


कोल्हापूर,दि.27 - आयुष्यभर शरद पवारांच्या उपकाराखाली रहायचे, आमदार, मंत्री म्हणून पदे भोगायची आणि पक्षाच्या अडचणीच्या काळात त्यांना दगा द्यायचा, हे योग्य नसून जहाज बुडताना पहिल्यांदा उंदीर उड्या मारतात, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पक्षांतर करणा-या नेत्यांवर शरसंधान साधले.  


राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने शुक्रवारी विधानसभेसाठी शासकीय विश्रामगृहात इच्छूकांच्या मुलाखती झाल्या, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार मुश्रीफ म्हणाले, कॉँग्रेस, राष्ट्रवादी मधून नेते भाजप-शिवसेनेत उड्यात मारत आहेत, पण तिथे अगोदरच त्यांचे उमेदवार आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. पक्ष असो की व्यक्ती प्रत्येकाचा काही कालावधी खराब असतो. पक्षाध्यक्ष शरद पवार हे ८० व्या वयातही महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांच्या उपकारामुळे अनेकांना आमदार, मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पक्षाची अवस्था वाईट असताना, या वयात पवार यांना सोडणे योग्य नाही. जहाज बुडू लागले की पहिल्यांदा भित्री उंदीरे उड्या मारतात. त्याप्रमाणे ही उंदीरे आणि सध्या पक्षांतर करणा-यांमध्ये फरक तरी काय? अशा काळात मुकाबला करायला हवा, राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यासाठी सज्ज असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

Friday, 26 July 2019

साहेब…! शिधापत्रिका दिली, आता हक्काचं राशन तरी द्या हो…!

राज्यात तब्बल 28 लाख रेशनकार्ड शांत नव्हेत उपाशी

देवरी,दि. 26 -  राज्यात तब्बल 28 लाख 89 हजार 103 शिधापत्रिका (रेशनकार्ड) शांत आहेत. या रेशनकार्डावर काही महिन्यापासून स्वस्त धान्याची उचल झालेली नाही. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ई - पॉज मशिनने ही माहिती उघड केली आहे. त्यापुढे जाऊन या शिधापत्रिकाधारकांनी अन्य पात्र लाभार्थींची जागा अडवली असून अन्न सुरक्षा योजनेत इच्छा असूनही सरकारला या लाभार्थींना समाविष्ट करता येत नसल्याची स्थिती आहे. यामुळे या रेशनकार्डधारकांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घ्यावा, असे आदेश सरकारने दिले आहेत.
गरजूंना स्वस्त धान्याचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या अन्न सुरक्षा योजनेत अंत्योदय योजनेतील लाभार्थीं आणि दारिद्रय रेषेखालील कुटुंबांसोबत दारिद्रय रेषेवरील (एपीएल) कुटुंबांचाही समावेश करण्यात आला. या कुटुंबांतील प्रत्येक व्यक्तीला तीन किलो गहू व दोन किलो तांदुळ असे धान्य कमी दरात दरमहा देण्यात येत आहे. सरकारने योजनेतील लाभार्थींचे लोकसंख्येच्या प्रमाणात उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यानुसार एपीएल कुटुंबांचा योजनेत समावेश करण्यात आला. त्यानंतरही अनेक पात्र लाभार्थी योजनेच्या बाहेर राहिले. या लाभार्थींना योजनेत समाविष्ट करण्यासाठी पूर्वीच्या अपात्र लाभार्थींची संख्या कमी होण्याची गरज आहे. मात्र, वर्षानुवर्षे या अपात्र लाभार्थींच्या नावावर धान्याची उचल सुरू आहे. सरकारने मागील वर्षभरापासून स्वस्त धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी कडक पावले उचचली आहेत. यातूनच आधार क्रमांकांची नोंद केलेल्या लाभार्थींना ई - पॉज मशिनवरूनच धान्याचे वितरण केले जात आहे.
या योजनेमुळे मंजूर धान्य पात्र लाभार्थींना मिळत असून अपात्र लाभार्थींची संख्याही पुढे आली आहे. यातूनच काही महिन्यापासून धान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकाधारकांचीही संख्याही पुढे आली आहे. राज्यात तब्बल 28 लाख 89 हजार 103 शिधापत्रिकाधारकांनी मागील काही महिन्यात त्यांचे नावे मंजूर असलेल्या धान्याची उचल केलेली नाही. अशा अपात्र समजून त्या रद्द करण्याची गरज आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून काहीच कारवाई होत नसल्याने पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित रहात आहेत. या अपात्र लाभार्थींच्या जागी पात्र लाभार्थींची निवड करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
देवरी तालुक्यातही हिच स्थिती आहे. सरकारने शिधापत्रिका दिली, आता हक्काचं राशन तरी द्या हो…! म्हणण्याची वेळ आली आहे. 

दुधाळ गाई व म्हशींसाठी 8 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज आमंत्रित



गोंदिया : पशुसंवर्धन विभागातर्फे नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत दुधाळ गाई/म्हशींचे गट वाटप, शेळी/मेंढी गट वाटप व मांसल कुक्कुट पालनाची योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पध्दतीने https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर 18 वर्षावरील अर्जदारांकडून 25 जुलै ते 8 ऑगस्ट 2019 या कालावधीत अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. योजनेची संपूर्ण माहिती व अर्ज करण्याची कार्यपध्दती बाबतचा संपूर्ण तपशिल https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर व गुगल प्ले स्टोअरवरील AH MAHABMS या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
तरी इच्छुक अर्जदारांनी नमूद विहित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. अर्ज भरतांना अर्जदाराने नोंदविलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत एस.एम.एस.द्वारे संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला भ्रमणध्वनी क्रमांक योजनेअंतर्गत अंतिम निवड होईपर्यंत बदलू नये. अर्जदाराची प्राथमिक निवड अर्जदाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार संगणकाद्वारे करण्यात येणार असली तरी अंतिम निवड ही अर्जदाराने अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारेच करण्यात येईल याची नोंद घ्यावी. योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त,गोंदिया यांचेशी संपर्क साधावा.

पालकमंत्री डॉ. फुके 29 व 30 जुलै रोजी जिल्ह्यात



गोंदिया,दि.26 : पालकमंत्री डॉ.परिणय फुके हे 29 व 30 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
29 जुलै रोजी दुपारी 4.30 वाजता भंडारा येथून शासकीय वाहनाने देवरीकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता देवरी येथे आगमन व देवरी येथील एम.आय.डी.सी. जवळ स्टील प्लांटच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. 30 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता साकोली येथून शासकीय वाहनाने सडक/अर्जुनीकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता सडक/अर्जुनी येथील सार्वजनिक रुग्णालय येथे क्षयरोग मशीनच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वाजता गोंदिया येथील जयस्तंभ चौकातील नविन प्रशासकीय इतारतीचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे जिल्हास्तरीय सर्व क्षेत्रिय यंत्रणेसोबत आढावा बैठक. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात खनिकर्म विभागाच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक. दुपारी 4 वाजता आमगाव येथील तहसिल कार्यालयाच्या नविन इमारतीचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता सालेकसा येथील तहसिल कार्यालयाच्या नविन इमारतीचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. तद्नंतर सोईनुसार गोंदिया येथून शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.

सालेकसा तालुका दुष्काळग्रस्त घोषित किया जाए



सालेकसा,दि.26 - आज सालेकसा तालुका राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से सालेकसा तालुका व जिला दुष्काळग्रस्त घोषित किया जाए व किसानों की विविध मांगे मंजूर कर आवश्यक उपाय योजना प्रारम्भ की जाए इस हेतु मा. तहसीलदार  को ज्ञापन सौपा गया ।
इस अवसर पर प्रमुखता से राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीओबीसी सेल के जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे आमगाव, देवरी विधानसभा अध्यक्ष श्री रमेश तारांम, जि. प.सदस्य दुर्गा तिराले, तालुका अध्यक्ष श्री तुकाराम बोहरे, देवरी तालुका अध्यक्ष  छोटेलाल बिसेन, गोपाल तिराले, कैलास धामळे, दौलत अग्रवाल, देवेंद्र मच्छिरके निकेश गावड,अंतरिक्ष बहेकार, निदोष साखरे, संतोष अग्रवाल, रविंद्र कटरे, रघुदास नागपुरे, कमलेश लिल्हारे, देगेंद्र बघेले, बालमुकुंद शेंडे, हर्षा बघेले सह पक्ष के अन्य वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे ।

उद्यापासून दोन दिवस विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम



 नवमतदारांना नाव नोंदणीची संधी

गोंदिया,दि.26 - भारतीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणूक 2019 करीता विशेष पुन:निरिक्षण कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना तथा इतर वंचित घटक ज्यांची मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा नागरिकांच्या नोंदणीसाठी येत्या शनिवार व रविवार (दि.27 व28) रोजी  विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम आयोजित केला आहे. 
 सदर कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर विशेष मोहिमेंतर्गत पात्र नागरिकांना ज्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट झाले नाही अशा मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविता येईल. 
  सदर मोहिमेंतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 अर्ज, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अनिवासी मतदाराने नमुना 6 अ अर्ज, मतदार यादीतील नावात आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी नमुना 7 अर्ज, मतदार यादीतील नोंदीच्या तपशीलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी नमुना 8 अर्ज अथवा मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी नमुना 8 अ अर्ज सादर करता येईल. सर्व अर्जाचे नमुने संबंधित मतदान केंद्रांवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 
  दिनांक 1 जानेवारी 2019 या आर्हता दिनांकावर आधारित प्रसिध्द अंतिम मतदार यादीत नाव नसलेल्या सर्व पात्र नागरिकांनी विशेष  मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर जावून आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. तसेच जांच्याकडे मतदान ओळखपत्र आहे, त्यांनीही  आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करुन घ्यावी. मतदार यादीत नाव नसल्यास या मोहिम कालावधीत मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

आंगनवाडी सेविकाओं के हक और सम्मान के लिए जारी रहेंगा संघर्ष - विधायक गोपालदास अग्रवाल




गोंदिया दि- 26:- राज्य विधानसभा के बजट सत्र में पुरक बजट पर चर्चा के दौरान लोकलेखा समिती प्रमुख एवम् गोंदिया के विधायक गोपालदास अग्रवाल ने जिले की अनेकों समस्याओं की ओर सरकार का ध्यान खींचा। चर्चा के दौरान आंगनवाडी सेविकाओं के संदर्भ में विधायक गोपालदास अग्रवाल के वक्तव्य का सेविकाओं द्वारा गलत अर्थ समझने से सेविकाओं में कुछ नाराजगी देखी गई। 
इस संदर्भ में विधायक अग्रवाल ने बताया कि महिला बाल कल्याण विभाग को आवंटित बजट पर सदन में चर्चा के दौरान उन्होंने आंगनवाडी सेविकाओं कि समस्याओं पर प्रमुखता से संज्ञान लेने की मांग सरकार से की। एवम् जिले के 4 तालुकाओॆ में बंद पड़ी सेविका भर्ती प्रक्रिया को पुरा करने, भाजपा सरकार के वादेनुसार सेविकाओं का मानधन बढ़ाए जाने तथा सेविकाओं के सेवानिवृत्ती बकाया वेतन को सेवानिवृत्ती के साथ ही भुगतान करने की व्यवस्था सरकार करें,ऐसी मांग की।
इस पर चर्चा करते मानधन बढौतरी के साथ आंगनवाडी में पोषण आहार वाटप में अनियमित्ता का भी जिक्र अनेक सदस्यों ने किया था। उसी संदर्भ में मैंने सेविकाओं का पक्ष रखते हुए सरकार आवश्यक समझे तो सीसीटीवी  कॅमरे लगाने की बात कहीं। इसके पीछे मेरी यह भावना थी कि जो सेविका, इमानदारी से काम कर रही है, उन्हें भी गलत ना समझा जाये और अपनी व्यवस्था मजबूत कर जहां अनियमितता हो रहो हो, उसे रोका जा सकें। मैं आंगनवाडी सेविका एवम् मदतनीस द्वारा अत्यंत कठिण एवम् परिश्रम से पूर्ण बाल संगोपन जैसे महत्वर्पूण कार्य का सम्मान करता हूॅं । 
उक्त चर्चा का विडीयों मेरे कार्यालय द्वारा ही वायरल किया गया है। अगर आंगनवाडी सेविकाओं के संदर्भ में हमने कोई गलत टिप्पणी की होती तो हम स्वंय उक्त विडीयों को प्रचारित नही करते।
हम आंगनवाडी सेविकाओं के परिश्रम और त्याग का पूरा सम्मान करते है। उनकी समस्याओं को लेकर हमेशा संघर्ष करने का हमने ईमानदार प्रयत्न किया है और आगे भी करते रहेंगे ।विधानसभा चुनाव आते देख विपक्ष ने विडीयो का गलत पहलू बताकर आंगनवाडी सेविकाओं कि भावनाओं को भडकाने का कार्य किया है ।
मैंने हमेशा विधानसभा के भीतर एवम् बाहर खुले मंच से आंगनवाडी सेविकाओं के संघ्रष में उनका समर्थन किया है। चाहे वेतन वृध्दी का मुद्दा हो या अन्य मुद्दे मैं हमेशा उनके संघर्षो में साथ रहा हूॅं। मैं विश्वास दिलाना चाहता हूॅं कि हम आंगनवाडी सेविकाओं के प्रतिनिधी के रूप में कार्य करते हुए उनके हक्क और सम्मान के लिए सरकार से संघर्ष करते रहेंगे।

अर्जुनी मोरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा- राष्ट्रवादी काँग्रेस

अर्जुनी मोरगाव,दि.26 -  गोंदिया जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. शासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांना दिलासा देणारे कुठलेही प्रयत्न शासन यंत्रणेमार्फत अजून तरी सुरु झालेले नाहीत. यावर उपाय म्हणून लगेचच तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून उपाययोजना कार्यान्वित कराव्यात, अशा मागणीचे निवेदन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
पत्रात म्हटले आहे की, अर्जुनी मोरगाव तालुक्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजच हजारो एकर क्षेत्रावरील झालेली पेरणी पार नष्ट  झाली असून दुबार पेरणीची वेळ आली आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे.
 उन्हाळी धानपिकाला ५०० रुपये बोनस द्यावा,सरसकट कर्जमाफ करावे,शेतीसाठी कृषिपंपाचे विद्युत बिल माफ करा,म ग्रा रो ह योजनेची कामे सुरू करा, कृषिपंपाचे नवीन कनेक्शन त्वरीत द्या,युवकांसाठी गाव तिथे व्यायामशाळा राबवा, ग्रा पं च्या कुशल कामाचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, गॅस डिझेल व पेट्रोलचे दर कमी करा, स्वामिनाथन आयोगाचे शिफारसी लागू करा,विजेचे घरगुती वीज शुल्क माफ करा, मच्छीमार तलावांचे लीज माफ करा, झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्पातील गावांना सिंचनासाठी त्वरित पाणीपुरवठा सुरू करा,प्रलंबित वनहक्क कायद्याअंतर्गत जमिनीचे पट्टे त्वरित निकाली काढा,वाढलेले रासायनिक खताचे दर कमी करा, सोलर कृषी पंपाचे कनेक्शन त्वरित द्या या मागण्यांचा समावेश आहे
तातडीने काही उपाययोजना केल्या नाहीत तर विदारक परिस्थिती निर्माण होईल. सततच्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.राज्यातील अल्पभूधारक शेतकरी, आदिवासी दलित शेतकरी याचा गांभिर्याने विचार करावा असे पत्रात म्हटले आहे.
निवेदन देताना जि.प.सदस्य किशोर तरोणे,अविनाश काशिवार, तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे,तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सुशिला हलमारे,दीपक सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांसह  शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

ऐतिहासिक प्रतापगडावरील भगवान शंकराची विशाल मूर्ती जळाल्याची घटना



प्रतापगड,दि 26 - अर्जुनी मोर तालुक्यातील ऐतिहासिक प्रतापगड येथील उच पहाडावर स्थित हिंदूचे आराध्य दैवत भगवान शंकराची विशाल मूर्ती जळाल्याची घटना आज दि.26 रोजी निदर्शनात आली आहे.
नवेगाव बांध परिसरात दौ-यावर असलेले अर्जूनीमोर  विधानसभा क्षेत्राचे आमदार ईंजि.राजकुमार बडोले यांना या घटनेची माहिती प्रतापगड येथील भोजराज लोगडे यांनी तत्काळ दिली. श्री. बडोले यांनी त्वरित या घटनेची माहिती गोंदियाचे जिल्हाधिकारी यांना दिली. परिणामी, शासकीय यंत्रणा खळबळुन जागी झाली असुन तालुक्याचे तहसीलदार घटनास्थळी रवाना झाले आहेत. तसेच आमदार  बडोले सुद्धा आपले नियोजित कार्यक्रम रद्द करून घटनास्थळी रवाना झाले.
वीज पडून मूर्ती जळाली- तहसीलदार विनोद मेश्राम
 या संदर्भात तहसीलदार विनोद मेश्राम व केशोरीचे ठाणेदार यांना विचारणा केली असता दि २५ जूलैच्या सायंकाळी अर्जुनी/मोर तालूक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. भगवान शंकराची मुर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची आहे. मूर्ती ही वरुन जळाली आहे .विज पडल्यानेच मुर्ती जळाल्याचे तहसिलदार विनोद मेश्राम व केशोरीचे ठाणेदार जाधव यांनी सांगितले. पोलिस स्टेशनचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून गडावर जाणारा मार्ग अडविण्यात आला आहे. दरम्यान, श्वानपथकाला पाचारण करण्यात आल्याची माहिती आहे.



Thursday, 25 July 2019

हिरालाल तुळशीकर वकील संघाचे अध्यक्ष




अर्जुनी मोरगाव,दि.25 : तालुका विधी सेवा समिती ची सभा आज दिवाणी न्यायालयाचे सभागृहात पार पडली. सभेमध्ये सन २0१९-२0२१ या काळासाठी नवीन कार्यकारिणी तयार करणे या विषयावर चर्चा झाली. या वर्षी बिनविरोध निवड करून कार्यकारिणी तयार करण्याचे सवार्नुमते ठरले. विधी सेवा समिती अध्यक्ष म्हणून अँड. हिरालाल बाजीराव तुळशीकर यांची एक मताने बिनविरोध निवड झाली. तर वकील संघाचे उपाध्यक्ष अँड. राजेश पालिवाल, सचिव पदि टी. डी. कापगते व कोषाध्यक्ष पदाकरिता अँड. एस. एम. बनपूरकर यांची व कार्यकारनी सदस्य म्हणून अँड. बी. अवचटे, अँड. ए. पी. परशुरामकर, अँड. पोमेश एस. रामटेके यांची एकमताने अवीरोध निवड सन २0१९ ते २0२१ कालावधी करिता निवड करण्यात आली.

देवरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा-तालुका काँग्रेस

देवरी,दि.25(सुभाष सोनवाणे) : तालुक्यातील ८० टक्के शेतामधील धानाचे पऱ्हे पूर्णत: नष्ट झाले. परिणामी तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने देवरी तालुका तत्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी देवरी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने २३ जुलै रोजी माजी आ. रामरतन राऊत, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप भाटिया यांच्या नेतृत्वात देवरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. .
निवेदनात सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामात देवरी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे रोवणी होऊ शकली नाही व शेतातील ८० टक्के पऱ्हे नष्ट झाले आहेत. आता हंगामाचा वेळ निघून गेल्यामुळे तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे. शासनाने तत्काळ देवरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत द्यावी, पीकविम्याची रक्कम शासनाने स्वत: भरावी, रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करावी, शासकीय रुग्णालयात औषधी व डॉक्टरांची सोय उपलब्ध करावी, पिण्याच्या पाण्याची सोय करावी या मागण्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह देवरी तालुक्यातील ग्रामीण भागात दौरा करून शेतपिकाची पाहणी केली. या चमूत सहषराम कोरोटे यांच्यासह माजी सभापती वसंत पुराम, तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, धनराज चुटे, मोहन वाढई, राकेश मेंढे, योगराज चुटे, दिलीप सिरसाम, भोजराज पटले यांचा समावेश होता.शिष्टमंडळात संगीता भेलावे, माधुरी राऊत, कविता वालदे, धनपत भोयर, अविनाश टेंभरे, अमित तरजुले, चैनसिंग मडावी, माणिकबापू आचले, कमलेश पालिवाल, सुरेंद्र बन्सोड, सुभाष कोचे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी, शेतमजूर व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Wednesday, 24 July 2019

गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष शितल तिरालेंचा राजीनामा

गोंदिया,दि.२४: गोंदिया जिल्हा युवती राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष व सालेकसा ग्रामपंचायतच्या माजी सदस्य शितल तिराले (रहांगडाले)यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ट नेते तसेच माजी आमदार राजेंद्र जैन व महिला प्रदेशाध्यक्ष यांना सादर केला आहे.

१२ तास वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील-ऊर्जामंत्री बावनकुळे

भंडारा,दि.24ः-भंडारा गोंदिया मतदारसंघात पावसाच्या अभावामुळे धानशेतीवर संकट ओढवलेले आहे. तसेच कडक उन्हाळा आणि कमी पाऊस पाणी यामुळे सध्या उपलब्ध असलेला विजेचा ८ तासाचा अवधी शेतकर्‍यांना सिंचनासाठी कमी पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन विजेची उपलब्धता सध्याच्या ८ तास ऐवजी वाढवून ती १२ तास करण्यासंबंधी सकारात्मक प्रयत्न करणार असून त्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत देखील चर्चा करणार असल्याची ग्वाही ऊजार्मंत्री चंद्र शेखर बावनकुळे यांनी दिली असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी कळविले आहे.
वीजेचा पुरवठा १२ तास करण्याची मागणी खासदार सुनील मेंढे यांनी एका पत्राद्वारे राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना केली होती. तसेच या विषयाची तत्परता लक्षात घेऊन आज दिल्लीत संसदीय अधिवेशनात असताना ऊजार्मंत्री बावनकुळे यांचेशी भ्रमणध्वरून संपर्क झाल्याचे देखील मेंढे यांनी सांगितले.
दरम्यान, शेतकरी सिंचनाच्या सोयीमुळे पिक वाचवू शकतात ही बाब लक्षात घेऊन विहीरी, गोसे, बावनथडी, पेंच या धरणाच्या व इतर सिंचन योजनेमुळे पिकाला नियोजनबद्ध पध्दतीने पाणी देणे सुरू आहे, अशी माहिती देखील खासदार मेंढे यांनी दिली आहे.

लाखनीत ४० किलो गांजा जप्त

लाखनी, दि.24:: गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत दुचाकीस्वारांच्या ताब्यातून ४० किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई लाखनी पोलिसांनी मंगळवारला सकाळच्या सुमारास केली. पवन उपाध्याय (२४), बालाराम डुंभरे (२७), सोनू दुबे (२८) व किशोर उईके (१९) सर्व राहणार सानेगाव जि. देवांश (मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या इसमांची नावे आहेत.
माहितीनुसार, लाखनी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील निराळे व पोलीस नायक धनराज भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली की, छत्तीसगड येथून दोन दुचाकीच्या माध्यमातून गांजाची तस्करी करण्यात येत आहे. या माहितीच्या आधारावर पोलीस ठाणे समोरच नाकाबंदी करण्यात आली. यात दोन विना नंबरच्या दुचाकींना अडवून इसमांची विचारपूस करण्यात आली. यावेळी त्यांच्या ताब्यातून ४० किलो गांजाही जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत ४ लाख रुपये सांगण्यात येते. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी गांजा जप्त करण्याची कारवाई असल्याचे सांगण्यात येते.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मंडलवार, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील निराळे, सहाय्यक फौजदार देवानंद संतापे, हवालदार भगवान थेर, विजय हेमणे, पठाण, धनराज भालेराव, प्रकाश तांडेकर, उमेश शिवणकर, निशांत माटे, हरिश्चंद्र देवदाते, सुभाष हटवार आदींनी केली.

गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करा-राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाèयाना निवेदन

गोंदिया,दि.२३ः- जिल्ह्यात १ लाख ९० हजार हेक्टरवर धानपिकाची लागवड होत असून जून महिन्यात शेतकरी धानाची नर्सरी टाकण्याचे काम करते.मात्र यावेळी समाधानकारक पाऊस न झाल्याने ज्या शेतकèयांनी धानाची नर्सरी टाकली होती,ती वाळण्याच्या स्थितीत आली आहे.तर पावसाअभावी अध्र्याहून अधिक शेतकèयानी पाऊन न झाल्याने नर्सरीच लावली नसल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.दरवर्षी पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकèयांना बसत असल्याने सध्याच्या परिस्थितीकडे लक्ष देता जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्यात यावे,या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
जिल्ह्यात आजपर्यंत ५३६.६४ मिमी पावसाची गरज असताना २५२.८६ मिमी पाऊस पडलेला आहे.ही टक्केवारी अत्यंत कमी आहे.यामुळे धान उत्पादक शेतकरी संकटात सापडला असल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन,सरसकट कर्ज माफ करणे,हेक्टरी ५० हजाराची नुकसान भरपाई देणे,जिल्ह्यात धान नर्सरी व शेतीचे संबधित विभागाच्यावतीने सयुंक्त सर्वेक्षण करण्यात यावे,पिक विम्याचा मोबदला देण्यात यावे,पुढील हंगामाकरीता बियाणे उपलब्ध करुन देण्यात यावे,जनावरासांठी चारा छावण्या सुरु करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.निवेदन देतेवेळी माजी आमदार राजेंद्र जैन,दिलीप बनसोड,जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,नरेश माहेश्वरी,गंगाधर परशुरामकर,मनोहर चंद्रिकापुरे,राजलक्ष्मी तुरकर,जितेश टेंभरे,केतन तुरकर,किशोर तरोणे,मनोज डोंगरे,प्रभाकर दोनोडे,रमेश ताराम,कमल बहेकार,सी.के.बिसेन,राजेश भक्तवर्ती,दुर्गा तिराले,कैलास पटले,विणा बिसेन,सुखराम फुंडे,विनोद बोरकर,रौनक ठाकूर उपस्थित होते.

ओबीसी वस्तीगृहाच्या जमिनीचे प्रस्ताव सादर करण्याचे पालकमंत्र्याचे निर्देश




गोंदिया,दि.24: राज्य सरकारने ३६ जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी वस्तीगृहाची घोषणा केली आहे. गोंदिया जिल्ह्यातही ओबीसींची वस्तीगूह व्हावे यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ, गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून अनेकदा निवेदन देवून वस्तीगृह सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीचे संदर्भ घेत व मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीच्या संदर्भानुसार गोंदिया येथील जुन्या क्षय रुग्णालयाच्या जागेवर ओबीसी विद्याथ्र्यांचे वस्तीगृह सुरु करण्यात यावे तसेच सामाजिक न्याय विभागाच्या मुर्री स्थित निवासी शाळेत किंवा भाड्याच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरुपात ओबीसींचे वस्तीगृह सुरु करण्यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम, वन व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्याशी चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे यांनी पालकमंत्री फुके ायांची स्थानिय विश्रामगृहात भेट घेत वस्तीगृहाच्या जागे संदर्भात चर्चा केली. त्या चर्चेत ना. फुके यांनी भंडारा येथील ओबीसी वस्तीगृहाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला असून गोंदिया येथील सुचविलेल्या ाजागेच्या प्रस्तावावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन देत समाज कल्याण विभागाकडून ओबीसी वस्तीगृहाच्या जागेचा प्रस्ताव व अहवाल मागविण्याचे निर्देश दिले.यावेळी माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, गौरव बिसेन,माजी जि.प.सदस्य राजेश चतुर,नगरसेवक बंटी पंचबुध्दे,नरेंद्र तुरकर उपस्थित होते.

24 ते 30 जुर्ले 2019 बेरार टाईम्स अंक व बातम्यासाठी क्लिक करा berartimes.com





देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...