Thursday, 3 November 2016

पाकिस्तानात भीषण रेल्वे अपघात, 16 प्रवाशांचा मृत्यू

स्लमाबाद, दि. 3 - पाकिस्तानमधील कराची येथे भीषण रेल्वे अपघात झाला असून 16 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 40 प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत. झकारिया एक्स्प्रेस आणि फरीद एक्स्पेस यांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. दोन महिन्यांमधील हा दुसरा भीषण अपघात आहे. ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
 
अपघातानंतर रेल्वे सेवा पुर्णपणे बंद करण्यात आली होती. मृतांचा आकडा सध्या 16 असून तो वाढण्याची शक्यता आहे असं जावेन अकबर रियाज या पोलीस अधिका-याने सांगितलं आहे. जखमींना कराचीमधील जिन्नाह रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आलं आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...