बुलडाणा,दि.03: बुलडाणा आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिले असून नागपूर सीआयडी विभागाच्या पोलीस अधीक्षका आरती सिंग या खामगावला भेट देणार आहेत.या संपूर्ण प्रकरणाचा तपास बुलडाण्याच्या अतिरिक्त पोलीस अधिक्षिका श्वेता खेडेकर यांच्या निदर्शनाखाली होणार आहे. दरम्यान, या बलात्कारप्रकरणी 10 जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिवरखेड पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. इतर तीन आरोपींचा शोध अद्याप सुरु आहे.बाळा शिवार परिसरातील कोकरे आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव आहे. शाळेतील कर्मचाऱ्यांनीच हे कृत्य केल्याचा आरोप मुलीने केला आहे. विशेष म्हणजे ही घटना दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी घडली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच आरोपींवर अॅट्रासिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्या...
No comments:
Post a Comment