Tuesday, 1 November 2016

नरेंद्र मोदींची नंदनवन सफारी!

रायपूर, दि. 1 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यादम्यान त्यांनी नवीन रायपूर येथील नंदनवन पार्कला भेट देत जंगल सफारीचा आनंद घेतला. यावेळी मोदींनी या पार्कची पाहणी करताना फोटोग्राफीमध्येही हात आजमावला. त्यावेळी छत्तीसडचे मुख्यमंत्री रमण सिंग हेही त्यांच्यासोबत उपस्थित होते. 
छत्तीसगड निर्मिती दिनाच्या निमित्ताने राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन रायपूर येथे उपस्थितांना संबोधिक करताना गेल्या 16 वर्षात छत्तीसगडने केलेल्या प्रगतीचे कौतुकही केले. तसेच पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांनी नवीन रायपूरमधील नंदनवनाला भेट दिली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...