साकरीटोला :नजीकच्या भजेपार येथे खा.प्रफुल पटेल यांच्या विकास निधीतून मंजुर झालेल्या नाली बांधकामाचे भूमिपूजन प्रभारी सरपंच तुकाराम फुंडे यांच्या हस्ते करण्यात झाले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सावलराम बहेकार, शांताबाई बहेकार, निर्मलाबाई कठाणे, सरस्वताबाई बहेकार, कंत्राटदार बाळकृष्ण हेमणे, राजाराम चुटे, योगराज ब्राम्हणकर, तंमुस अध्यक्ष कृष्णकुमार चुटे, टायकराम ब्राम्हणकर, बारकु मेंढे, अर्जुन कलचार, दिलीप पाथोडे, डॉ.तरोणे आदि उपस्थित होते. खा.पटेल यांनी गावातील नाली बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

No comments:
Post a Comment