Wednesday, 2 November 2016

उद्यापासून पेट्रोलपंप धारकांचे राज्यव्यापी आंदोलन

सोलापूर, दि. 02 - पेट्रोलियम डिलर्सच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे़ या दुर्लक्षपणामुळे पेट्रोल डिलर्सचे नुकसान होत आहे़ या शासनाच्या विरोधात उद्यापासून (३ व ४ नोव्हेंबर रोजी)पेट्रोल खरेदी न करण्याचा, ५ नोव्हेबर रोजी फक्त एकाच शिफ्टमध्ये विक्री करण्याचा तर ६ नोव्हेंबर पासून रविवार व बँक हॉलीडेजच्यास दिवशी सर्वच व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय ताटे-देशमुख व फामपेडा संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अपूर्वचंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल डिलर्सच्या अडचणीबाबत कमिटी गठीत करण्यात आली होती़. या समितीचा अहवाल येथुन ३ वर्ष झाला तरी कार्यवाही झाली नाही. सध्या डिझेलला १ रूपया ४८ पैसे तर पेट्रोलला २ रूपये ४५ पैसे इतके कमिशन मिळते.पेट्रोलपंपाचा व्यवस्थापन खर्च, कायदे नियम, सुविधा पाहता हे कमिशन अत्यंत अपुरे असून व्यवसाय चालविणं कठीण झालं आहे,  असेही संजय ताटे-देशमुख यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...