नवी दिल्ली, दि. 2 - वन रँक वन पेन्शनच्या मुद्यावर निवृत्त सैनिक राम किशन गरेवाल यांनी आत्महत्या केल्यानंतर दिल्लीमध्ये आता खडाजंगी सुरु झाली आहे. राम किशन गरेवाल यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सुरक्षेच्या कारणास्तव राम मनोहर लोहिया रुग्णालयात कोणालाही प्रवेश दिला जात नसून कुटुंबियांना भेटण्याची परवानगी दिली जात नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. राहुल गांधींची सुटका करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी राहुल गांधी यांना पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतले.
राहुल गांधी यांना सांगूनही रुगणालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला म्हणून ताब्यात घेण्यात आलं आहे अशी माहिती विशेष आयुक्त एम के मिना यांनी दिली आहे. तसंच कुटुंबिय राजकीय नेत्यांशी संपर्क साधून निदर्शन करण्याचा प्रयत्न करत होते, हे रुग्णालय असून आंदोलनाची जागा नाही असं एम के मिना बोलले आहेत.

No comments:
Post a Comment