ग़डचिरोली,दि.01ः-पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिसांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात २0१४ रोजी दाखल असलेल्या अप क्रमांक
३0३५/२0१४ भादवि कलम २२४ मधील नक्षल आरोपी प्रविण उर्फ चंद्रिका जेठूराम
राऊत याला ३१ डिसेंबर रोजी ५ वाजताच्या सुमारास अटक केली.
प्रविण उर्फ चंद्रिका राऊत याच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळय़ा पोलिस ठाण्यांमध्ये विविध स्वरूपातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. १९९१ मध्ये चंद्रिका हा चामोर्शी दलममध्ये भरती झाला होता. १९९३ ते १९९९ पर्यंत आरोपी हा चंद्रपूर कारागृहात एका गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता. तेथून जामिनावर सुटका झाल्यावर २000 मध्ये तो एटापल्ली दलममध्ये भरती झाला होता. २00२ मध्ये एटापल्ली दलममधून त्याची चामोर्शी दलममध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शासनाने त्याच्यावर २ लाख इतके बक्षिस जाहीर केले होते.
१ डिसेंबर २0१४ रोजी पोलिस मदत केंद्र गट्टा (फु) उपविभाग धानोरा येथील पोलिसांना नाकाबंदी दरम्यान एका संशयित इसम मिळून आला. त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव चंद्रिका जेठूराम राऊत (४२) रा. घोडसर ता. एटापल्ली असे सांगितले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याला पोलिस मुख्यालयात आणले. पोलिस मुख्यालया आणून अटक करण्यात आलेल्या नक्षल्याची विचारपूस करीत असताना रात्री ८.३0 वाजता गार्डरूम जवळील असणार्या संरक्षक भिंतीवरून पळून गेला. त्याबाबत पोलिस उपनिरीक्षक राहूल यादव यांच्या फिर्यादीवरून गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. आज पोलिसांनी त्या फरार झालेल्या नक्षल्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलिस विभागाने दिली आहे.

No comments:
Post a Comment