Thursday, 4 January 2018

बिलोलीत सावित्री बाईं फुले यांची जयंती साजरी

नांदेड,दि.03ः  भारताच्या प्रथम शिक्षिका तथा मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघटना बिलोली  व तुकाराम सुर्यवंशी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोणार ता.कंधार जि.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने बिलोली येथील देशमुखनगर मैदानात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गायकवाड.एस.एन यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन  करण्यात आले.यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे,पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल कदम,संस्थेचे सचिव तथा पुरोगामी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष डी.टी.सुर्यवंशी, यादव लोकडे,सुनिल जेठे, मुन्ना पोवाडे,विठ्ठल देवाले, कुडकेकर चंद्रकांत,कुलदीप सुर्यवंशी गोणारकर,केशव रानवळकर,शुभम निदाने यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...