Tuesday 1 November 2016

ग्रामसेवकाने केला महिला ग्रा.पं.सदस्याचा विनयभंग

तिरोडा,दि.01   : मेहंदीपूर ग्रामपंचायतच्या पदाधिकार्‍यांना घेऊन डोंगरगडला देवदर्शनासाठी गेले असताना महिला सदस्याचा ग्रामसेवकाने विनयभंग केल्याची घटना समोर आली. एवढय़ावर तो ग्रामसेवक थांबला नाही तर घरी आल्यानंतर फोनवरूनही त्याने त्या महिला सदस्यासोबत असभ्य संभाषण केले. त्यामुळे त्याच्याविरूद्ध तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
बाळकृष्ण सदाशिव फटींग (४0) रा.नेहरुवार्ड तिरोडा असे त्या ग्रामसेवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मेहंदीपूरचे ग्रामसेवक फटींग ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकार्‍यांना घेऊन डोंगरगड येथे देवदर्शनासाठी गेले होते. यावेळी ग्रामसेवक फटींग याने एका २६ वर्षीय महिला सदस्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घरी घेऊन फोनवरून असभ्य संभाषण केले.
हा प्रकार त्या महिला सदस्याने आपल्या पतीला सांगितल्यानंतर तिरोडा पोलिसात दि.३0 ला तक्रार नोंदविण्यात आली. त्यानुसार गुन्हा नोंद करून सोमवारी सकाळी कलम ३५४ (अ) (ड) भादंविनुसार ग्रामसेवकाला अटक करण्यात आली. सदर ग्रामसेवक गोरेगाव पं.स.येथे कार्यरत असताना अशाच प्रकारे एक घटना घडली असल्याचे सांगितले जाते. पैशाचा तोरा दाखवत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला.ग्रामसेवक बालकृष्ण सदाशिव फटींग यांना निलंबीत करण्याची मागणी महिला सदस्य, पत्नी व गावातील नागरिकांनी तसेच सामाजिक संघटनेने केली आहे. तपास बिट अंमलदार शंकर गायधने करीत आहे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...