बस्तरचे पोलिस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी वृत्तसंस्थेला
सांगितले की, आतापर्यंत शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात
आणण्यासाठी त्यांना घर-नौकरी आदी सोयी देण्यात येत होत्या. प्रथमच शरणागती
पत्करलेले नक्षलवादी रिव्हर्स वॅसेक्टॉमी शस्त्रक्रियेनंतर माता-पिता झाले
आहेत. बस्तर येथे काही वर्षांपूर्वी एक हजारांहून अधिक नक्षलवाद्यांनी
शरणागती पत्करली आहे. यातील निम्म्याहून अधिक नक्षलवाद्यांनी सांगितले,
आम्ही कौटुंबिक सुखाला पारखे झालेलो आहोत. हे सुख मिळावे म्हणूनच शरणागती
पत्करत आहोत.सिन्हा म्हणाले, २००१ मध्ये मी पोलिस अधीक्षक होतो. तेव्हा
शरणागत आलेल्या एका नक्षलवाद्याने मला सांगितले, नक्षलवाद्यांनी माझी
नसबंदी केलेली होती. त्यामुळे मी खूप परेशान होतो. मला माझी लेकरेबाळे हवी
आहेत. यासाठी शरणागती पत्करण्यास तयार झालो. त्यावेळी शरणागत येण्यासाठी
काही धोरण आखलेले नव्हते. आम्ही सरकारकडे विनंती केली. तेव्हा आम्हाला
विशेष परवानगी देण्यात आली.
Monday, 1 January 2018
छत्तीसगडमध्ये शरणागत 21 नक्षलींची नसबंदी उघडली
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment