गोंदिया,दि.02,- अपुरा पाऊस आणि कीडीच्या आक्रमणामुळे विदर्भातील कापूस, सोयाबीन आणि धान हे प्रमुख पीक हातचे गेले. मात्र नजरअंदाज आणेवारीत दुष्काळी छाया दिसून न आल्याने संताप व्यक्त झाला. आंदोलनांच्या इशाऱ्यानंतर अंतिम आणेवारी जाहीर करण्यात आली असून यात विदर्भातील नागपूर, गडचिरोली जिल्हा वगळता आठ जिल्ह्यांमध्ये आणेवारी ५० टक्क्यांच्या आत आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विदर्भावर दुष्काळाची छाया असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता सरकारकडून आता निर्णयाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ चे कलम ७८ नुसार, पैसेवारीच्या अनुपातानुसार, जमीन महसुल तहकूब, कमी वा रद्द करण्यास समर्थन म्हणून, शासनाचा महसूल विभाग प्रत्येक गावातील कोरडवाहू, खरीप व रब्बी पिकांची पैसेवारी काढीत असतो. यालाच आणेवारी असा शब्द प्रचलित होता. ३१ डिसेंबरला गोंदिया जिल्हा प्रशासनाने काढलेल्या पैसेवारीनुसार गोंदिया जिल्ह्याची पैसेवारी ही ४४ पैसे एवढी काढण्यात आली आहे.यामध्ये ८ तालुक्यापैकी अर्जुनी मोरगाव तालुका वगळता सर्वच ७ तालुक्यांची पैसेवारी ही ५० पैशाच्या खाली आहे.यासाठी, संबंधित तहसीलदार प्रत्येक गावात एक ‘ग्राम पिक पैसेवारी समितीङ्क गठीत करतो. यावरून जर पैसेवारी ५० टक्क्याच्या खाली असेल तर संबंधित ठिकाण हे दुष्काळ ग्रस्त घोषित करण्यात येते.त्यानुसार गोंदिया जिल्हा पुर्णतः दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या यादीत आलेला आहे.गोंदिया तालुक्यातील १५३ गावापैकी १५३ गावांची पैसेवारी ५० पैसाच्या आत आहे.तालुक्याची पैसेवारी ४३ पैसे निघाली आहे.गोरेगाव तालुक्यातील ९४ गावापैकी ९४ गावांची पैसेवारी ५० पैसाच्या आत आहे.तालुक्याची पैसेवारी ४६ पैसे निघाली आहे.तिरोडा तालुक्यातील १२३ गावापैकी १२३ गावांची पैसेवारी ५० पैसाच्या आत आहे.तालुक्याची पैसेवारी ३१ पैसे निघाली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १५९ गावापैंकी १४८ गावांची पैसेवारी ५० पैसाच्यावर असून तालुक्याची आणेवारी ५९ पैसे आहे.देवरी तालुक्यातील १३५ गावांपैकी १२८ गावांची पैसेवारी ५० पैसाच्या आत असून तालुक्याची पैसेवारी ३६ पैसे आहे.आमगाव तालुक्यातील ८३ गावापैकी ८३ गावे ५० पैसाच्या आत असून तालुक्याची आणेवारी ४६ पैसे आहे.सालेकसा तालुक्यातील ९२ गावांपैकी ८६ गावांची पैसेवारी ५० पैसाच्या आत असून तालुक्याची पैसेवारी ४५ पैसे आहे.तर सडक अर्जुनी तालुक्यातील १०९ गावापैकी १०४ गावांची पैसेवारी ५० पैसाच्या आत असून तालुक्याची पैसेवारी ४५ पैसे असल्याचा अहवाल जिल्हाप्रशासनाने राज्यसरकारकडे पाठविला आहे.
भंडारा : प्रशासनाने खरीप हंगामाची अंतिम आणेवारी ४८ टक्के जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यात पाच तालुक्यांची आणेवारी ५० पैशांच्या खाली नोंदविण्यात आली आहे. तर भंडारा आणि पवनी तालुक्याची आणेवारी ५० टक्क्यांच्या वर दाखविण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने सुरुवातीला अनेक शेतकऱ्यांनी रोवण्या केल्या नाही. यातून तग धरलेल्या धानावर तुडतुड्याचे आक्रमण झाल्याने हाती आलेले पीक गेले. उत्पादन होणार नसल्याने काही शेतकऱ्यांनी शेतातील उभे पीक जाळले होते.
No comments:
Post a Comment