Monday, 1 January 2018

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारीण्या बरखास्त



वाशिम, दि.०१ः पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारीण्याबरखास्त करण्यात येत असल्याचा निर्णय नांदेड येथे पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या नुकत्याच सम्पन्न झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नांदेड येथे जि एन नागार्जुना हॉटेल च्या सभागृहात प्रदेशाध्यक्ष गोपाळराव आटोटे यांनी राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारीण्या  बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा केली.यावेळी बैठकीला संबोधीत करतांना पक्षाध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पूर्व तयारी व पक्षाची राजकीय भूमिका,संघटनात्मक बांधणी,पक्षाची सभासद नोंदणी,सामाजिक प्रश्नावर आंदोलनासह राज्यातील लोकसभेच्या १० तर विधानसभेच्या १०० मतदार संघात लक्ष केंद्रित करून आतापासून त्या मतदार संघात पक्ष बांधणीच्या माध्यमातून मतदार संघ बांधणी साठी जोमानी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे निर्देशही यावेळी प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिलेत, १५ फेब्रुवारीला २०१८ पर्यंत नव्या जिल्हा कार्यकारीणीचे गठण केले  जाणार असून यामध्ये नव्या कार्यकर्त्याना संधी दिल्या जाणार असल्याचेही प्रदेश कार्यकारिणीने ठरविले आहे.बैठकीला उपस्थित गोपाळराव आटोटे, थाँमस कांबळे,चरणदास इंगोले,बापूसाहेब गजभारे,राजाभाऊ इंगळे,जगणभाई सोनवणे,शशिकांत उन्हवणे,प्रकाश भालेराव,प्रा.गौतम मुंढे,विनोद भरणे,राजेंद्र हिवाळे,एन डी सोनकांबळे,दिलीप भिसे,दौलत हिवराळे,डी जे खडसे,आदी प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले,अशी माहिती पक्ष प्रवक्ते चरणदास इंगोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...