गोंदिया,दि.03ः पुणे जिल्ह्याच्या भीमा कोरेगावजवळ सोमवारी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद तिस-या दिवशीही राज्याच्या काही भागात उमटत आहेत. राज्यात बहुतांश ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असले तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात बंदला प्रतिसाद मिळत आहे. भारिप, बहुजन महासंघ, महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फ्रंट, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र लेफ्ट फ्रंटसह अनेक दलित व डाव्या संघटनांचा आजच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर यांच्यासह शरद पवार, रामदास आठवले आदी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.गोंदिया जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून गोंदिया,आमगाव व सालेकसा 100 टक्के बंद झाले आहेत.या तिन्ही शहरातील शाळा काॅलेजंस पुर्णत बंद असून एसटीसह खासगी वाहतूकही बंद असल्याने प्रवाशांना चांगलाच फटका बसला आहे.गोंदिया आगारातून सकाळी 8 वाजेनंतर एकही बस सुटलेली नाही.तर पोलीसांच्या बंदोबस्तात बसेस आगारात उभ्या केल्या गेल्या आहेत.शहराला छावणीचे रुप अाले असून प्रत्येक चौक व गल्याबोळ्यामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे.
सकाळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करुन आंदोलनाला सुरवात करण्यात आली दरम्यान आबेडकर चौकात निषेध सभा घेण्यात येत असून या सभेला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष धीरज मेश्राम,भाकपचे मिलिंद गणवीर,अमित भालेराव,एच.आर.लाडे,युवक काँग्रेसचे संदिप ठाकूर,राष्ट्रवादीचे मनोहर वालदे,ओबीसी महासंघ व ओबीसी संघर्ष कृती समितीचे खेमेंद्र कटरे यांच्यासह अनेकांनी विचार व्यक्त घटनेचा निषेध नोंदविला.यावेळी दिपेन वासनिक, रतन वासनिक,विशाल शेंडे,हंसू वासनिक,मधु बनसोड,एड.राजकुमार बोंम्बार्डे,डॉ.मिलींद राऊत,डी.एस.मेश्राम,अतुल सतदेवे,विलास राऊत,रामचंद पाटील,धनंजय वैद्य,भागवत मेश्राम,देवा रुसे,निलेश देशभ्रतार,यशपाल डोंगरे,वसंत गणवीर,शुध्दोदन शहारे, विनित शहारे,अशोक बेलेकर,श्री बोम्बार्डे यांच्यासह विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बहुजन समाज पक्षाच्यावतीने शहरात मोर्चा काढून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. बसप कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. निषेध आंदोलनात तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. भीमा कोरेगाव येथे दलित कार्यकर्त्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत आंबेडकरी नेते बोलत नाहीत, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले,महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याविरोधा घोषणा देण्यात आल्या.
खामगाव- महाराष्ट्र बंदला खामगाव येथे बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळी 10 वाजता शहरातून शांती मार्च काढण्यात आला असून शहरातील शाळा-महाविद्यालयांसोबतच खासगी प्रवासी वाहतूक धारक बंदमध्ये सहभागी झाले आहेत. एसटीसोबतच खासगी प्रवासी वाहतूकही बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर एका बसची तोडफोड करण्यात आल्यानंतर सामाजिक संघटनांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेत शांततेच्या मार्गाने आंदोलन केले.
No comments:
Post a Comment