Tuesday, 2 January 2018

आरोग्यसेविका मंजूषा बहेकारचा सीईओंच्या हस्ते सत्कार


गोंदिया,दि.02ः-अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांत सेवेवर वैद्यकिय अधिकारी गैरहजर असतांना  २ डिसेंबर रोजी वंदना गोवर्धन कोवे (३८) रा. बोंडगाव या प्रसूतीसाठी गेल्या.मात्र त्या आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित नसतानाही कंत्राटी आरोग्य सेविका मंजूषा बहेकार यांनी त्या गरोदर महिलेची गुंतागुंंतीची प्रसूती यशस्वीरित्या केली.सोबतच प्रसूतीनंतर जन्मलेला बाळ रडत नसल्याचे लक्षात आल्यावर त्या बाळाचे सक्षम करुन त्या बाळाला रडविण्याचे प्रयत्न करुन त्या बाळाला जिवदान मिळवून देण्याचे काम केले. त्या कंत्राटी आरोग्य सेविका मंजूषा बहेकार यांना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याच काळात गौरविण्यात येणार होते.परंतु अचानक त्यांची बदली झाली अन चांगल्या कामाचे प्रशस्तीपत्र नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी एम.आर.दयानिधी यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.त्यावेळी सर्व कर्मचारी, अधिकारी,आरोग्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.विशेष म्हणजे गोठणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या मतदारसंघातले आहे.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...