गोंदिया,दि. 0२ः- तालुक्यातील नंगपुरा/मुर्री येथे अनुसूचित जाती व नवबौध्द २५0 मुलांच्या शासकीय वसतिगृह बांधण्याचा निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री व सामाजिक न्यायमंत्र्याने घेतला होता. मात्र, र्मुी येथे जागा देण्यास तेथील ग्रामपंचायतीतील १२३ नागरिकांनी आमसभा घेवून नकार दिला आहे. त्यामुळे हा वसतिगृह बांधण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
नंगपुरा/मुर्री येथील हनुमान मंदिराजवळील तलावाची जागेत हे वसतिगृह बांधण्यात येणार होता. या तलावाचे नुकतेच खोलीकरण करण्यात आल्यामुळे जनावरांना व शेतीला पाणी मिळत होते. त्यासोबतच गावातील हातपंप, विहीरीची पाण्याची पातळी वाढून पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. स्थानिक ग्रामपंचायतीने नुकताच तलावाचे सौंदर्यीकरण वृक्षलागवड करण्याचाही निर्णय घेतला होता. त्यामुळे ही जागा वसतिगृहासाठी देण्यात येवून नये असा
आमसभेत ठराव घेण्यात आला. तेव्हा प्रस्तावित वसतिगृहाचे बांधकाम गोंदिया जिल्ह्यात कुठेही करण्यात यावे असे उपस्थित गावकड्ढयांनी एकमताने ठरविले आहे. जर येथे वसतिगृहाचे बांधकाम सुरू करण्यात आले तर तीव्र आंदोलनाचा इशाराही गावकर्यांनी दिला आहे. आमसभेत सरपंच हेमंत येरणे, उपसरपंच संदिप टेंभेकर, ब्रम्हानंद शहारे, ओमप्रकाश रहांगडाले, मीनाबाई टालटे,सुनंदा जांभुळकर, रामकुमार टेकाम, मीनाबाई सूर्यवंशी, पुजाबाई बिजेवार, तिर्थराज रहांगडाले, रामेश्वरी बोमचेरे, पुष्पा शरणागत व गावकरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment