Tuesday, 2 January 2018

दोनशेची लाच घेतांना रोजगारसेवक कापसे गजाआड

गोंदिया,दि.०१-नववर्षांच्या पहिल्याचदिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत तिरोडा तालुक्यातील काचेवानी येथील रोजगारसेवक संजयकुमार रामलाल कापसे याला २०० रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली.रोजगारसेवक कापसे यांने गैरअर्जदारास रोहयो अंतर्गत काम करण्यासाठी लागणारे जॉब कार्ड तयार करुन देण्यासाठी २०० रुपयाची मागणी केली होती.तक्रारदारास मागणी केलेली रक्कम द्यायची इच्छा नसल्याने ३१ डिसेंबररोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली.त्या तक्रारीच्या आधारे आज सोमवारला सापळा रचण्यात आले असता रोजगारसेवकांने लाच स्विकारली.कापसे विरुध्द तिरोडा पोलीस ठाण्यात कलम ७,१३(१)(ड),सहकलम १३(२) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात गोंदिया पथकातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...