Tuesday, 2 January 2018

देवरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी

देवरी,०२- स्थानिक समाज मंदिर येथे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ४९ वी पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली. यावेळी दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
पंचशील चौकातील समाज मंदिरात आयोजित कार्यक्रमामध्ये या निमित्ताने सामुदायिक प्रार्थना, ग्रामगीता वाचन, भजन, ग्रामगीतेवर विचार प्रकटन यासह भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, गुरुकुंज मोझरी येथील प्रबोधनकार प्रशांत ठाकरे याच्या जाहीर प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी राष्ट्रसंतांच्या साहित्यावर गायन आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गुरुदेव सेवामंडळाचे तुकाराम राणे, ओमप्रकाश रामटेके, युवराज धुर्वे,नरहरी लांजेवार, डॉ. गुरू कापगते,दयाराम बनसोड, सुनीता देसाई, विना राऊत, माला पुराम,प्रभा धुर्वे, इंदू लांजेवार,चंद्रशेखर अगडे आदी पदाधिकाèयांनी सहकार्य केले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...