Sunday 11 December 2016

पाकला देण्यात आलेले 10 कॉटी डॉलर्सचे कर्ज रद्द

इस्लामाबाद - जागतिक बॅंकेकडून पाकिस्तानला नैसर्गिक वायुच्या पुरवठ्यासंदर्भात मंजूर करण्यात आलेले 10 कोटी डॉलर्सचे कर्ज रद्द करण्यात आले आहे. या कर्जासाठी ठरविण्यात आलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यात आलेले अपयश आणि वायु वितरण कंपनीचा यासंदर्भातील "अनुत्साह', या दोन मुख्य कारणांच्या पार्श्‍वभूमीवर हे कर्ज रद्द करण्यात आले आहे.
या प्रकल्पाची अंमलबजावणी "सुई सदर्न गॅस कंपनी (एसईसजीसी)' या कंपनीकडून करण्यात येणार होती. या प्रकल्पांतर्गत कराची, सिंध प्रांताचा अंतर्गत भाग आणि बलुचिस्तानला नैसर्गिक वायुचा पुरवठा करण्यात येणार होता. नैसर्गिक वायुच्या वाहिनीच्या माध्यमामधून करण्यात येणाऱ्या पुरवठ्यामधील वायुगळती व आर्थिक नुकसान टाळणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता. मात्र हा प्रकल्प अपयशी ठरल्याने बंद करावा लागला असून अद्यापी नैसर्गिक वायुची गळती सुरुच असल्याचे निरीक्षण जागतिक बॅंकेच्या यासंदर्भातील अहवालामध्ये नोंदविण्यात आले आहे. याचबरोबर नैसर्गिक वायुच्या बेकायदेशीर जोडण्यांची संख्याही प्रचंड वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे. या प्रकल्पास जागतिक बॅंकेने "असमाधानकारक' असा दर्जा दिला आहे.
एसएसजीसीने पुरेसा उत्साह न दाखविल्याचे स्पष्ट करत या प्रकल्पास मान्यता द्यावयासच नको होती, अशी संतप्त प्रतिक्रिया जागतिक बॅंकेकडून व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक बॅंकेकडून या प्रकल्पासाठी याआधीच अडीच लाख डॉलर्स निधीचे वाटप करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...