Saturday 17 December 2016

विश्वविक्रम करणा-या प्रणव धनावडेला पोलिसांची मारहाण

मुंबई, दि. 17 - नवोदित क्रिकेटपटू प्रणव धनावडे याला पोलिसांनी मारहाण केली असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा विश्वविक्रम केल्यानंतर प्रणव धनावडे प्रकाशझोतात आला होता. मैदानावर बांधण्यात आलेल्या हेलिपॅडला विरोध केल्याने पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार कल्याणमध्ये प्रकाश जावडेकरांच्या कार्यक्रमासाठी मैदानावर हेलिपॅड तयार करण्यात आलं होतं. ज्याला प्रणव धनावडेने विरोध केला होता. यामुळे पोलिसांनी प्रणव धनावडेला मारहाण केली. बाजारपेठ पोलिसांनी प्रणवसह त्याच्या वडिलांना ताब्यात घेतलं असून गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे.
 चौकार-षटकारांची तूफान फटकेबाजी करत अवघ्या १६ वर्षीय प्रणव धनावडेने नाबाद १००० धावा फटकावत विश्वविक्रम रचला होता. प्रणवची ही १००० धावांची खेळी म्हणजे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च खेळी आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एच. टी. भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात कल्याणच्या के.सी. गांधी शाळेतर्फे खेळणा-या प्रणवने आर्य गुरूकूल या प्रतिस्पर्धी संघाविरोधात हा विश्वविक्रम केला होता. प्रणवने ३२३ चेंडूंमध्ये १२४ चौकार आणि ५९ षटकार फटकावत हा विक्रम रचला होता. त्याच्या खेळीनंतर के.सी.गांधी शाळेच्या संघाने १४६५ धावांवर डाव घोषित केला होता.  प्रणवच्या या झंझावाती खेळानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही ट्विटरवरून त्याचे अभिनंदन करत त्याला भविष्यातील अशा खेळींसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. 
 
आंतरशालेय क्रिकेटमधील विश्वविक्रम
 *
 प्रणव धनावडे ( के.सी. गांधी शाळा) - नाबाद १००९ धावा ( वर्ष २०१६)
 * ए.ई.जे. कॉलिन्स - ६२८ धावा  (वर्ष १८९९)
 * पृथ्वी शॉ (रिझवी स्प्रिंगफिल्ड ) - ५४६ धावा ( वर्ष २०१४)

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...