Wednesday 14 December 2016

बोहल्यावर चढण्यापूर्वीच झाली पोलीस कोठडीत रवानगी

 सांगली, दि. 14 - बुधवारी दुपारी एक वाजता तो बोहल्यावर चढणार होता. घरात लगीनघाई सुरू होती... पण मंगळवारी रात्रीच त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन अटक होताच थेट पोलीस कोठडीत रवानगी झाली. शिवाय नियोजित लग्नही मोडले.
किशन शिवाजी मोहिते (वय २७, मोहिते वडगाव, ता. कडेगाव) असे त्याचे नाव. लग्नाचे आमिष दाखवून दीड वर्षे बलात्कार केल्याची तक्रार आसद येथील युवतीने पोलिसांत दिल्यानंतर किशनच्या कृष्णलीला उघड झाल्या आणि पोलिसांनी त्याला अटक केली.  
किशन मोहिते औषध विक्री प्रतिनिधी आहे. त्याचे आणि आसद (ता. कडेगाव) येथील पीडित तरुणीच्या कुटुंबाचे दूरचे नातेसंबंध आहेत. संबंधित तरुणी इस्लामपूर येथे महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ओळख असल्याने किशनने तिच्याशी सलगी वाढवली. लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. ठिकठिकाणी फिरायला नेले. दीड वर्षे सातत्याने इस्लामपूर, पेठ नाका येथील लॉजवर, तसेच मोहिते वडगाव येथील घरी नेऊन बलात्कार केला.
महिन्याभरापूर्वी किशनचा विवाह दुसऱ्या गावातील तरुणीशी निश्चित करण्यात आला. त्या लग्नासाठी त्यानेच पुढाकार घेतला होता. ते समजताच पीडित तरुणीने त्याला जाब विचारला. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. विवाहासाठी बुधवारी दुपारी एक वाजताचा मुहूर्त ठरला होता. सगळी तयारी झाली होती. घरात लगीनघाई सुरू होती. पै-पाहुणे आले होते. गावातच अक्षता टाकल्या जाणार होत्या. याची कुणकूण लागताच मंगळवारी पीडित तरुणीने त्याला पुन्हा गाठले. मात्र त्याने लग्न झाल्यानंतर पाहू, असे सांगून तिची बोळवण केली. मग मात्र तिने थेट चिंचणी-वांगी पोलिस ठाणे गाठले. किशनने लग्नाचे आमिष दाखवून दीड वर्षे बलात्कार केल्याची तक्रार तिने दिली. तिला समजावण्याचे प्रयत्न फोल ठरले. अखेर रात्री उशिरा पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून किशन मोहिते याच्यावर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
बोहल्यावर चढण्यापूर्वी काही तासच आधी त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली. त्यानंतर नियोजित वधूचं लग्नं दुस-यासोबत पार पडलं. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...