
नवी दिल्ली, दि. 14 - विविध बँका आणि त्यांच्या अधिका-यांनी काळया पैसेवाल्यांना मदत केल्याची प्रकरणे उजेडात येत असताना आता दिल्ली करोलबाग येथील एचडीएफसी बँकेची शाखा ईडीच्या रडावर आहे. करोलबागच्या एचडीएफसीच्या शाखेमध्ये झालेले कॅश डिपॉझिटचे काही संशयास्पद व्यवहार ईडीच्या नजरेत आले आहेत.
आर्थिक गुप्तचर शाखेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ईडीने बँकेतील काही खाती तपासली. 8 ते 25 नोव्हेंबर दरम्यान काही खात्यांमध्ये प्रत्येकी 30 कोटींपर्यंत रक्कम जमा झाल्याचे आढळले आहे. बनावट कंपन्या, खोटे पत्ते देऊन बँकेत खाती उघडून त्यात बेहिशोबी रक्कम जमा केली जाते.
No comments:
Post a Comment