Sunday 11 December 2016

ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणामुळे भारतीयांसाठी धोक्‍याची घंटा

न्यूयॉर्क- अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1 बी व्हिसावर निर्बंध घालण्याचा इशारा दिला आहे. परदेशी नागरिकांना अमेरिकन जनतेच्या नोकऱ्या घेऊ देणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांचे हे विधान अमेरिकेत एच-1बी व्हिसावर काम करणाऱ्या भारतीयांसाठी धोक्‍याची घंटा आहे.
प्रत्येक अमेरिकन नागरिकाच्या हितासाठी लढा देऊ. निवडणूक प्रचाराच्यावेळी मी अमेरिकन कामगारांसोबत वेळ घालवला आहे. अमेरिकन कर्मचाऱ्यांची जागा परदेशी नागरिक घेतात. आम्ही यापुढे हे चालू देणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. लोआमध्ये हजारो समर्थकांसमोर ट्रम्प बोलत असताना त्यांच्या या विधानांना प्रेक्षकांमधून जोरदार प्रतिसाद दिला जात होता. डिझनी वर्ल्ड आणि अन्य अमेरिकन कंपन्या एच-1बी व्हिसाच्या आधारे परदेशातून कर्मचारी आणतात, असे ट्रम्प म्हणाले. मेक्‍सिकोची सीमा अमेरिकेला लागून आहे तिथून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होते. ही घुसखोरी रोखण्यासाठी भिंत उभारणार असल्याचे ट्रम्प यांनी निवडणूक प्रचाराच्यावेळी जाहीर केले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...