Tuesday 13 December 2016

'समृद्धी महामार्गा'वर अधिकाऱ्यांची जमीन खरेदी!

नागपूर ः मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील बड्या आजी-माजी अधिकाऱ्यांनी शेकडो हेक्‍टर जमिनी खरेदी केल्याचे धक्कादायक प्रकरण नुकतेच उजेडात आले आहे. विशेष म्हणजे, या जमिनींची खरेदी मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाला परवानगी मिळण्यापूर्वीच झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यात या जमिनी खरेदी करण्यात आल्या असून, सरकारमधील बड्या अधिकाऱ्यांनी स्वतःसह नातेवाइकांच्या नावावर खरेदी केल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग आणि नवनगरविरोधी शेतकरी संघर्ष समितीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही दिले असून, त्यासोबत जमिनींच्या खरेदीची कागदपत्रे आणि सातबारा उतारेही जोडले आहेत.


माझ्यापर्यंत आतापर्यंत तरी अशी तक्रार आलेली नाही. मात्र, जरी कोणी अशाप्रकारे जमिनी घेऊन ठेवल्या असतील, तरी त्याचा त्यांना फायदा होणार नाही. कारण, आपण "लॅंड पुलिंग'मार्फत जमिनी देत असून, शेतकऱ्यांना विकसित भूखंड देणार आहोत. तथापि, सरकारी अधिकाऱ्यांनीच जमिनी खरेदी केल्या असतील, तर त्यामागच्या पैशांचा स्रोत शोधून काढला जाईल. अशाप्रकारची कोणतीही तक्रार आलेली असल्यास त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीजवळ राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचा मुलगा पीयूष, माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे यांचा मुलगा रवींद्र, ठाणे जिल्हा उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांचे भाऊ विजय पवार आदी दिग्गज आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी स्वतःसह नातेवाइकांच्या नावे शेकडो हेक्‍टर जमिनीची खरेदी केली आहे. या गैरव्यवहारांची चौकशी करा, अशी मागणी समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
बबन हरणे, समन्वयक, शेतकरी संघर्ष समिती

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...