Wednesday 14 December 2016

भारतातील एकही मोबाईल पेमेंट अॅप सुरक्षित नाही - क्वालकॉम

नवी दिल्ली, दि. 14 - तुमच्या मोबाईल फोनला तुमची बँक बनवा, मोबाईल फोनमधून डिजिटल पेमेंट करा असे केंद्र सरकार सांगत असले तरी,  भारतातील एकही मोबाईल पेमेंट अॅप पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे क्यूलकॉमने म्हटले आहे. 
 
डिजिटल वॉलेट आणि मोबाईल बँकिंग अॅप्लिकेशन्सनी हार्डवेअर लेव्हलची सुरक्षा वापरली तर ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित रहातील. पण भारताच हार्डवेअर लेव्हलची सुरक्षा वापरली जात नाही असे क्वालकॉमने म्हटले आहे. 
 
जगभरातील अनेक मोबाईल आणि वॉलेट अॅप्स हार्डवेअर सुरक्षेला प्राधान्य न देता अँड्रॉइडवर चालतात यामध्ये युझर्सचा पासवर्डची चोरी होऊ शकते. भारतातील प्रसिद्ध डिजिटल पेमेंट अॅप्लिकेशनही हार्डवेअर सिक्युरिटीचा वापर करत नाही असे क्वालकॉमने सांगितले. मोबाईल चीपसेटच्या मार्केटमध्ये आघाडीवर असणा-या क्यूलकॉमचा जागतिक बाजारपेठेत एकूण वाटा 37 टक्के आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...