Tuesday, 13 December 2016

माहिती उघड केली तर, भारतात खबळबळ उडेल - लीजन ग्रुप

नवी दिल्ली, दि. 13 - भारतातील चार हायप्रोफाईल टि्वटर अकाउंट हॅक करणा-या लीजन हॅकर ग्रुपचे पुढचे लक्ष्य sansad.nic.in ही डोमेन सेवा आहे. संसद नीक इन ही सरकारी कर्मचा-यांना ईमेल सेवा पुरवते. sansad.nic.in डोमेन हॅक केल्यामुळे अनेक मोठे मासे जाळयात सापडतील असे लीजन ग्रुपच्या सदस्याने फॅक्टरडेली डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.  
 
फॅक्टरडेली डॉट कॉम ही टेक्नॉलॉजी  न्यूज वेबसाईट आहे. चॅट मुलाखतीत लीजन ग्रुपच्या सदस्याने ही माहिती दिली. भारतातील काही महत्वाच्या सर्व्हरमधील डाटा आपल्याकडे असून ही माहिती जाहीर केली तर, भारतात गोंधळ निर्माण होईल असे लीजन ग्रुपच्या हॅकरने वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 
 
भारताची डिजिटल बँकिंग व्यवस्था अत्यंत निकृष्ट दर्जाची असून त्यावर अत्यंत सहजतेने सायबर हल्ला करता येऊ शकतो असा लीजनचा दावा आहे. फॅक्टरडेली डॉट कॉमच्या मुलाखतीत लीजनला भाजपाला लक्ष्य करणार का ?असा प्रश्न विचारला. त्यावर आम्ही योग्यवेळी त्यांची सुद्धा माहिती बाहेर आणू असे उत्तर दिले. 
 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...