Wednesday 14 December 2016

आता दप्तराचे ओझे होणार कमी: सर्व विषयांचे एकच पुस्तक?

बुलडाणा, दि. 14 - दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविणा-या समितीने विविध योजनांसह तीन महिन्याचे सर्व विषयांचे एकच पुस्तक तयार करण्याची शिफारस केली आहे. सदर उपाययोजनेची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून केल्यास दप्तराचे ओझे कमी होवून भविष्यातील चिमुकल्यांच्या आरोग्यास होणारा धोका टळणार आहे.
 
शाळेत जाणा-या चिमुकल्यांचे शारीरिक वजन त्यांच्या दप्तरापेक्षा कमी असते. त्यामुळे भविष्यात चिमुकल्यांना विविध शारिरीक व्याधींचा सामना करावा लागतो. त्यामुळे येणाºया शैक्षणिक वर्षभरात लागणा-या सर्व विषयांची वर्षभराची पुस्तके तयार करण्यापेक्षा सर्व विषयांचा केवळ तीन महिन्याचा अभ्यासक्रम असलेले एक वेगळे पुस्तक तयार करण्यात यावे, असा उपाय दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीने दप्तराच्या ओझ्यावर शोधला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...