जर्मनीतील इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स अँड मेडिसीनमधील संशोधकांचा हा निष्कर्ष "स्टेम सेल रिसर्च अँड थेरपी' या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधकांनी हळदीमध्ये आढळणाऱ्या"टर्मेरोन' या घटकाचा अभ्यास केला. इंजेक्शच्या माध्यमातून हा घटक उंदरांच्या शरीरात सोडण्यात आला. उंदरांच्या मेंदूचे स्कॅनिंग केले असता त्यांच्या मेंदूतील पेशींच्या विकासासाठी आवश्यक असलेला भाग अधिक सक्रिय झालेला दिसला.
त्याचप्रमाणे, उंदरांच्या मज्जातंतूंच्या स्टेम सेल्सना टर्मेरोनच्या द्रावणात बुडविल्यावर
या पेशींमध्ये मेंदूतील कुठल्याही प्रकारच्या पेशी बदलण्याची क्षमता आल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. हळदीवरच्या या गुणकारी संशोधनामुळे अल्झायमर आणि मेंदूच्या इतर
विकारांवर औषध बनविण्यात मदत होऊ शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

उंदरांवर केलेल्या संशोधनातून हे निष्कर्ष काढले असून, मनुष्याच्या मेंदूवर हळदीच्या होणाऱ्या परिणामाबाबत अधिक संशोधनाची गरजही संशोधकांनी व्यक्त केली आहे. संशोधक मारिया एडेल रुजर म्हणाले,""मानवासह इतर विकसित प्राण्यांमध्ये मेंदूतील बिघाड दुरुस्त करण्याची क्षमता नसते. मात्र मासे व इतर छोट्या प्राण्यांमध्ये ही क्षमता तुलनेने अधिक असते. या संशोधनामुळे मानवामध्येही ही क्षमता विकसित होण्याची आशा निर्माण झाली आहे.''
No comments:
Post a Comment