Wednesday 14 December 2016

ब्लॅकमनी पकडण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर सोडले कुत्रे

बंगळुरु, दि. 14 - आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटक आणि गोव्यात टाकलेल्या धाडीत 3.57 कोटी रुपये जप्त केले आहेत. यामध्ये 2.93 कोटी रुपयांच्या नव्या नोटा आहेत. विशेष म्हणजे, कर्नाटकामधील एका घरात काळा पैसा पकडण्यासाठी गेलेल्या आयकर विभागाच्या अधिका-यांवर एका वृद्ध महिलेने दोन कुत्रे सोडल्याची घटना घडली. 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील यशवंतपूर परिसरातील एका घरात काळा पैसा असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार त्या घरात धाड टाकण्यात आली. मात्र येथील एका वृद्ध महिलेने अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे सोडून त्यांच्या घरातील कुत्रे त्याच्यावर अंगावर सोडले. अखेर, अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने कुत्र्यांना बांधून घरात प्रवेश केला. यावेळी या घरातील एका खोलीतून 2.89 कोटींची रक्कम जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या रकमेत 2.25 कोटी रुपयांमध्ये दोन हजाराच्या नव्या नोटा आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. तर, दुसरीकडे गोव्याची राजधानी पणजी येथून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीकडून 67.98 लाख जप्त केले आहेत. 
दरम्यान, नोटबंदीनंतर सर्वत्र आयकर विभागाचे धाडसत्र सुरूच आहे. आत्तापर्यंत आयकर विभागाने वेगवेगऴ्या ठिकाणाहून जवळजवळ एक हजार कोटी रुपये जप्त केले आहेत. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...