Tuesday 13 December 2016

नगरसेवक ६ व अध्यक्षाचा पदासाठी २ नामांकन दाखल


 गोंदिया:- गोंदिया नगर परिषदेच्या २१ प्रभागासाठी होत असलेल्या निवडणूकीत एकूण ४२ नगर परिषद सदस्यांच्या पदासाठी व नगराध्यक्ष पदासाठी येत्या ८ जानेवारी रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. यासाठी ९ डिसेंबर पासून नामनिर्देशन पत्र देणे व घेणे सुरू झाले. पहिल्या दिवसी एकही नामांकन अर्ज दाखल झाले नाही.  
१३ डिसेंबरला नगरसेवकासाठी ६ अर्ज नामांकन दाखल करण्यात आले तर अध्यक्षपदाकरीता २ अर्ज दाखल करण्यात आले.  अध्यक्षपदाकरीता अपक्ष म्हणून पंकज सुंदरलाल यादव व सतिश सदाराम बंसोड यांनी अर्ज नामांकन दाखल केले आहे. नामनिर्देशक पत्र स्विकारण्याची अंतिम दिनांक १७ डिसेंबर दुपारी ३ वजेपर्यंत तसेच नामदर्शक पत्र छाननी व यादी प्रसिध्दी १९ डिसेंबर सकाळी ११ वाजतापासून सुरू होणार आहे.  नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख १९ डिसेंबर दुपारी ३ वाजतापर्यंत असून निवडणूकी चिन्ह वाटप ३ डिसेंबरला करण्यात येणार आहे. मतदान केंद्रांची यादी प्रसिध्दी २ जानेवारी करण्यात येणार असून मतदानाचा हक्क बजावण्याकरीता ८ जानेवारी सकाळी ७:३० ते ५:३० वाजेपर्यंत असणार आहे. तसेच मतांची मोजणी ९ जानेवारी सकाळी १० वाजतापासून सुरू होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणूकीची धामधुम संपली असता सर्वांची नजर आता नगर परीषदच्या निवडणूकीवर आहे. यंदा शहरातील एक प्रभाग वाढवून घेत २१ प्रभाग करण्यात आले असून चार एवजी दोन सदस्यांच्या एक प्रभाग करण्यात आला आहे. शिवाय नगर अध्यक्ष आता थेट जनतेलाच निवडायचा असल्याने शहरवासीयांची उत्सुकता निवडणूकीला घेउन अधिकच वाढली आहे. यामुळे कधी निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर होतो. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. या निवडणूकीला घेउन आजी-माजी प नवसंख्यांनी आपआपली तयारी सुरू केली आहे. तर नगराध्यक्ष पदासाठीही आजी-माजींसोबतच नवसंख्यांची नावे पुढे येत आहे. आता निवडणूकीला जेम-तेम एकच महिना उरला असल्याने इच्छुकांनी धावपळ वाढली आहे. त्यात राजकीय पक्षांच्या तिकिटसाठीही सेटिंग सुरू आहे. निवडणूकीला घेवून इच्छुकांनी धावपळ सुरू असतांनाच एका राजकिय पक्षाल ४२ उमेदवार रिंगणात उतरवायचे असल्याने पक्षांचीही दमछाक होत आहे. तर यासोबतच निवडणूकीला घेउन नगर परिषद कर्मचारीही धावपळीला लागले आहेत. 

किसमे है कितना दम ... रस्सीखेच सुरू

गोंदिया नगर परिषदेमध्ये गेल्या दोन दशकापासून राष्टÑवादी काँग्र्रेस व काँग्रेस या दोन पक्षाचे र्वचस्व राहिले आहे. भाजपला नेहमीच गोंदिया नगर परिषदेच्या निवडणूकीत आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी घाम गाळावे लागले होते. परंतू सत्ताधारी भाजप पक्षाला यंदाच्या निवडणूकीत अच्छे दिन आल्याचे अनुभवास येवू लागले आहे. भाजपकडे उमेदवरांची चढाओढ पहावयास मिळत आहे. तर दुसरीकडे विपक्ष आताही अनेक प्रभागामध्ये उमेदवार शोधत आहे. उल्लेखनिय असे की, अनुसूचित जाती व जमाती या दोन प्रवर्गासाठी आरक्षीत असलेल्या प्रभागात उमेदवार सोडण्यासाठी भाजपची सुध्दा चांगलीच दमछाक होत आहे. सर्वच पक्षाचे विशेषत: भाजप, राष्टÑवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ पुढारी या निवडणूकीत आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी कार्यकर्त्यांशी विचारविमर्श करू लागले आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...